शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
2
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
3
Maharashtra Vidhan Sabha 2024:  उमेदवार किती कोट्यधीश, किती शिकलेले?
4
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
5
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
7
'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याचं शुभमंगल सावधान! लग्नाचे फोटो आले समोर
8
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
9
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
10
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
11
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
12
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
13
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
15
विधानसभा निवडणुकीत पुन्हा महत्त्वाचा मुद्दा; कांद्यामुळे गावाकडे शेतकरी तर शहरात ग्राहक बेजार
16
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
17
मालेगाव जिल्हा निर्मितीचा प्रश्न निकाली काढणार; एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
18
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
19
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
20
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर

विखेंचा घरचा अहेर

By admin | Published: July 10, 2017 12:05 AM

राजकारणात कोणीच कोणाचा कायमचा मित्र अथवा शत्रू नसतो हे खरंच.

राजकारणात कोणीच कोणाचा कायमचा मित्र अथवा शत्रू नसतो हे खरंच. राजकारणातील हा खळाळ परस्परविरोधी ओंडक्यांना एकत्र आणतो, तसा समविचारी ओंडक्यांची ताटातूटही करतो. सगळ्यांनाच सत्तेची ओढ असते. विरोधी पक्षनेतेपदावर बसलेल्या व्यक्तीचा तर एक डोळा कायम मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर असतो. आजचा विरोधी पक्षनेता उद्याचा मुख्यमंत्री, असे म्हटले जाते. पण मुख्यमंत्रिपदापर्यंत पोहोचण्यासाठी विरोधी पक्षनेत्याने सरकारच्या चुकीच्या धोरणांवर रान उठवून सरकारला सळो की पळो करून सोडायला हवे. जनतेच्या मनात सरकारप्रति रोष उत्पन्न करून विरोधी पक्षाबद्दल विश्वास निर्माण करायला हवा. आजवरच्या विरोधी पक्षनेत्यांनी हेच केले. पण राधाकृष्ण विखे-पाटील त्यास अपवाद आहेत. विखे-पाटलांचा जीव विरोधी पक्षात रमत नाही, ते ‘टिळक भवन’ऐवजी ‘वर्षा’वरच अधिक असतात, सरकारवर तुटून पडण्याऐवजी ते सरकारला सांभाळून घेतात, अशी आजवर दबक्या आवाजात चर्चा होती. पण परवा शिर्डीत विखे यांनी स्वत:च खुलासा करून टाकला की, त्यांना हे सरकार अगदी घरच्यासारखे वाटतं!खरं तर विखेंनी हा खुलासा करण्याची गरज नव्हती. त्यांच्या कृतीतूनच ते दिसून येत होते. कर्जमाफीचे आंदोलन उभे राहू नये, यासाठी विखेंनी केलेला खटाटोप जगजाहीर आहे. पुणतांब्यातील तथाकथित पुढाऱ्यांना हाताशी धरून शेतकऱ्यांचा संप मोडित काढण्याचा त्यांनी कसा प्रयत्न केला, हे सर्वांनीच पाहिले. एवढी तत्परता तर सत्ताधाऱ्यांनीही दाखविली नव्हती. नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरू असताना विखे गावी होते. एकनाथ खडसे, पंकजा मुंडे, विनोद तावडे यांच्यावर आरोप झाले तेव्हा विरोधी पक्षनेता म्हणून विखेंनी ब्र उच्चारला नाही. जिल्हा परिषद निवडणुकीकडे तर ते फिरकलेच नाहीत, हा काँग्रेस आमदारांचा आरोपही खोटा नव्हता. थोडक्यात, विखे विरोधी पक्षनेते पदावर राहून सत्ताधाऱ्यांशी सलग वाढवत आहेत, हे त्यांच्या उक्ती आणि कृतीवरून दिसून येते. विखेंसारखा विरोधी पक्षनेता आपण राज्याच्या इतिहासात आजवर पाहिला नाही, हे मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलेले प्रशस्तीपत्र बरेच बोलके आहे. या अगोदरच्या युती सरकारच्या काळात विखेंनी काँग्रेस सोडून शिवसेनेशी घरोबा केला होताच. आताही त्यांचे पाऊल भाजपाच्या दिशेने पडत आहे का? की बंधू अशोक विखे यांनी केलेल्या आरोपांच्या चौकशीची फाईल सरकारने उघडू नये म्हणून चाललेली ही धडपड आहे? या साऱ्या प्रश्नांची उत्तरे लवकरच मिळतील. मुख्यमंत्र्यांनी तसे सुतोवाच केले आहे.