शहरं
Join us  
Trending Stories
1
“जो शब्द दिला तो पाळतात, अजित पवार मर्द माणूस”; नवाब मलिकांनी केले तोंडभरून कौतुक
2
"145 उमेदवार उभे केले म्हणजे..."; रामदास आठवलेंचा राज ठाकरेंना खोचक टोला
3
"ते खटा-खट म्हणत राहिले, आम्ही महिलांच्या खात्यात पटापट पैसे टाकले"; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांना टोला
4
बंद पडलेल्या जेट एअरवेजची मालमत्ता विकण्याचे आदेश; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
5
सदाभाऊंची जीभ पुन्हा घसरली; संजय राऊतांना म्हणाले, "कितीही साबण, शाम्पू लावला तरी..."
6
यासीन मलिकच्या पत्नीचं राहुल गांधींना पत्र; "जम्मू काश्मीरातील शांततेसाठी..."
7
इगतपुरी - त्र्यंबकेश्वर मतदारसंघ : चौरंगी लढतीत कोण निवडून येणार राव?
8
सरकारी भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत,सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
9
१२ बेरोजगार तरुणांच्या खात्यात अचानक १२५ कोटींची उलाढाल, नाशिकमध्ये काय घडलं?
10
नवरा बायकोचं भांडण, एका 'OK' नं रेल्वेला ३ कोटींचा फटका; कोर्टातील अजब प्रकरण काय?
11
"जे मविआच्या उमेदवारांविरोधात उभे, त्यांना..."; काँग्रेसने बंडखोरांबद्दल घेतला निर्णय
12
Shah Rukh Khan :"जीव वाचवायचा असेल तर कोट्यवधी रुपये द्या, अन्यथा..."; सलमाननंतर शाहरुख खानला धमकी
13
"मला धमकावलं जातंय...", साक्षी मलिकचं PM मोदींना कुस्ती वाचवण्याचं आवाहन
14
Girnar Parikrama 2024: 'या' पाच दिवसांतच गिरनारच्या जंगलात मिळतो प्रवेश; जेवढ्या यातना तेवढाच आनंद!
15
शरद पवारांवरील टीका 'मानसपुत्रा'च्या जिव्हारी; निषेध व्यक्त करत वळसे पाटलांनी खोतांना दिला इशारा
16
सदाभाऊंना कुत्रा म्हणणाऱ्या संजय राऊतांना नितेश राणेंनी दिली अशी उपमा, म्हणाले... 
17
विरोध डावलून नवाब मलिकांना उमेदवारी दिली, आता प्रचारही करणार का? अजित पवारांचे सूचक विधान
18
धनंजय मुंडे यांच्या संगनमताने करोडोची जमीन अल्प किंमतीत विकून फसविले: सारंगी महाजन
19
Maharashtra Election 2024: देवेंद्र फडणवीस, बावनकुळेंसह दिग्गजांची परीक्षा! काँग्रेसचे आव्हान कसे पेलणार?
20
सदाभाऊ खोतांच्या विधानावर संजय राऊतांचा संताप; देवेंद्र फडणवीसांवर टीका करत म्हणाले...

उद्योगात कसे यश मिळवू शकतो? उद्योगातील नवशक्तीचे नवयुक्तीत रूपांतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 01, 2017 2:53 AM

ऊर्जा हे प्रत्येक गोष्टीच्या सजीवतेचे प्रमुख लक्षण आहे आणि ही असीम ऊर्जा निर्माण होते, शक्तीच्या विविध स्वरूपाने. आताच नवरात्री संपली आणि सर्वांनी या शक्तीच्या स्वरूपाचे मनापासून स्मरण केले असणारच.

- शिवांगी झरकरऊर्जा हे प्रत्येक गोष्टीच्या सजीवतेचे प्रमुख लक्षण आहे आणि ही असीम ऊर्जा निर्माण होते, शक्तीच्या विविध स्वरूपाने. आताच नवरात्री संपली आणि सर्वांनी या शक्तीच्या स्वरूपाचे मनापासून स्मरण केले असणारच. या मिळालेल्या नवशक्तीला नवयुक्तीत रूपांतरित करून, आपण उद्योगात कसे यश मिळवू शकतो? याचा अभ्यास आपण करणार आहोत...आज आपण उद्योगातील विविध शक्ती स्वरूपांची संपूर्ण माहिती घेणार आहोत...१. श्रुती (ज्ञान) : माता सरस्वतीचा ज्ञानाचा आशीर्वाद नेहमीच फलदायी ठरतो. कोणताही उद्योग करताना त्या उद्योगाची कमीतकमी २५ टक्के माहिती तुम्हाला हवी. येणाºया एका वर्षात तुम्ही या ज्ञानात २५ टक्के भर पाडायला हवी, तरच तुम्ही उद्योगात पुढे टिकू शकता. पुढील तीन वर्षांत उर्वरित ५0 टक्के माहिती मिळविणे गरजेचे आहे. म्हणून तर म्हणतात ना, प्रत्येक उद्योगासाठी पहिले एक हजार दिवस महत्त्वाचे असतात.२. रचना (कल्पना) : योजनेला वास्तवात रूपांतरित करायचे असेल, तर त्याला योग्य कल्पना देणे गरजेचे आहे. कल्पनेचे वास्तविक स्वरूप नेहमी रचना असते आणि रचनेला ध्येय प्राप्त झाले, तर त्यातून योजना बनते, म्हणून जास्तीतजास्त कल्पनांना जागृत करा. दररोज आपल्याला कमीतकमी १०० कल्पना येतात. त्यातील १० कल्पना तुमच्या रचना बनतात आणि त्यातील एका रचनेला तुम्ही तुमची योजना बनविता.३. प्राप्ती (स्रोत) : उद्योगासाठी सर्वात महत्त्वाचा स्रोत असतो, तुमच्या ओळखी आणि लोकांचा तुमच्यावर असलेला संपूर्ण विश्वास. यासाठी काही मूलभूत स्रोत असणे आवश्यक आहे. हे स्रोत तुमच्या उद्योगात सतत ऊर्जा देण्याचे काम करतात. त्यामुळे उद्योग नेहमीच सशक्त राहतो. स्रोत हे कोणत्याही प्रकारचे असू शकतात. काही स्रोत हे वस्तुमय असतील, तर काही गुणांच्या, माणसांच्या स्वरूपात असतील. आपण आपल्या उद्योगाचा प्लॅन म्हणून आपले स्रोत सक्षम ठेवणे गरजेचे आहे.४. मुद्रा (संपत्ती) : मी बहुतेक वेळा हे ऐकते की, ‘मला पैसा नको. मी पैशांसाठी उद्योग करत नाही,’ असे बोलणारे नेहमीच देवी लक्ष्मीचा अनादर करतात. उद्योग आला की, व्यवहार आला आणि व्यवहार आला की, पैशांची उलाढाल आली, गुंतवणूक आली. म्हणून शक्तीचे हे स्वरूप प्रमुख मानले जाते. त्यामुळे पैशांचा आदर करा. उद्योग हा व्यवहाराचा पैसे कमविण्याचा मार्ग आहे. त्याचा उद्देश हा संपत्ती कमविणे हा असलाच पाहिजे. उद्योगात आपण समाजसेवा नाही करू शकत नाही. लोक म्हणतात की, लक्ष्मी आणि सरस्वती एकत्र नांदत नाही. याचे कारण लक्ष्मी म्हणजे व्यवहार, जो अतिशय पारदर्शक हवा आणि सरस्वती म्हणजे समाजकल्याण, ज्यात देणे जास्त हवे घेण्यापेक्षा. त्यामुळे उद्योगात तुम्हाला स्वार्थात परमार्थ करणे जमले पाहिजे, जेणेकरून तुम्ही समतोल साधू शकाल.५. मोहिनी (योजना) : प्रत्येकाला ‘मोहिनी’ हा शब्द अतिशय रुचतो. उद्योगात याचे फार महत्त्व आहे. कारण जर उद्योग मोहक नसेल, तर तुम्ही लोकांना मोहित करू शकत नाही, ना कोणते प्रलोभन देऊ शकत. लोकांना तुमच्या वस्तुंमध्ये किंवा सेवेत रस वाढवायचा असेल, तर उद्योगात मोहिनी या शक्तीला जागृत ठेवणे अत्यंत गरजेचे असते, तरच तुम्हाला आणि तुमच्या उद्योगाला ग्राहक पसंत करतात. त्यासाठी ३६५ दिवसांच्या उद्योगात कमीतकमी ३0 टक्के सेवेत, वस्तूंत विविध आॅफर असणे आवश्यक आहे. तुमची जाहिरात, मार्केटिंग, प्रमोशन मोहक करणे आवश्यक आहे. त्यामुळे तुमचा उद्योग नेहमीच एव्हरग्रीन राहतो.६. कृती (क्रिया) : Action speaks More than words !..याचप्रमाणे, प्रत्येक उद्योगासाठी फक्त ज्ञान असणे आवश्यक नसते, तर त्या ज्ञानाला अनुभवात रूपांतरित करणे आवश्यक असते. म्हणून कृती हा एक महत्त्वाचा शक्तीचा भाग आहे, जो ज्ञानाच्या स्थिर ऊर्जेला कृतीच्या गतीज ऊर्जेत रूपांतरित करतो. जोपर्यंत आपण कृती करत नाही, तोपर्यंत आपल्याला उद्योगात दिशा मिळत नाही. ९० टक्के उद्योजक फक्त विचार करतात, ध्येय साधतात, प्लॅनिंग करतात, पण जेव्हा वेळ येते निर्णयाची, किंबहुना पाऊल उचलायची, तेव्हाच कच खातात आणि रिस्क घ्यायला घाबरतात व कृती करत नाहीत.७. अनुश्री (अनुभव) : अनुभवासारखा मोठा गुरू कोणताच नाही. आज कोणत्याही गुरूला मान हा फक्त त्याच्या ज्ञानामुळे नाही, तर त्याला आलेल्या अनुभवामुळे मिळतो. तुम्हाला उद्योगातील किती माहिती आहे, यापेक्षा जे माहीत आहे, ते योग्यरीत्या कसे वापरता येईल, याचा अभ्यास म्हणजे अनुभव. अनुभवासाठी वयाची मर्यादा नसते, तर विविध गोष्टींचा योग्य आणि योग्य वेळी वापर हा असतो.८. रक्षा (संरक्षण) : शक्तीचे हे स्वरूप तुम्हाला सर्व चुकीच्या गोष्टींपासून वाचविते. जशी काली माता आपले रक्षण करते, त्याचप्रमाणे आपण आपल्या उद्योगाचे संरक्षण करणे गरजेचे आहे. कोणतीही घटना घडण्याचा अंदाज असणे आवश्यक आहे, म्हणून संरक्षण महत्त्वाचे ठरते. संरक्षण म्हटले की, ढाल आणि तलवार दोन्ही आली. याचा अर्थ, उद्योगात नेहमी ३ पर्याय हवेत.पहिला पर्याय (मुख्य प्लॅनिंग) - जसे ठरविले आहे, तसेच कृतीत आणायचे.दुसरा पर्याय (पर्यायी प्लॅनिंग) - जर पहिला प्लॅन फसला किंवा यशस्वी नाही झाला, तर त्याला जोड म्हणून वेळेचे नुकसान नको, म्हणून घेतली जाणारी स्पेप्स.तिसरा पर्याय (बाहेर येण्याचे प्लॅनिंग) - जर पर्याय एक व दोन फसले आणि आता स्वत:ला वाचवायचे असेल, तर योग्य प्रकारे नुकसान न होऊ देता घेतला जाणारा पर्याय, ज्याला एक्झिट प्लॅन म्हणतात.पर्याय पहिला हा मुख्य उद्योग असतो, पण पर्याय दोन आणि तीन संरक्षक म्हणून माता कालीसारखे आपले रक्षण करतात.९. प्रबोधिनी (उत्क्रांती) : उद्योगात वृद्धी हवी, तर त्याला योग्य असे संवर्धन आणि जोपासणी हवी. एखादा उद्योग वाढवायचा म्हटला, तर सर्वात महत्त्वाचा भाग येतो, तो म्हणजे उत्क्रांतीचा! कारण वाढ ही योग्य दिशेला निर्माण झाली की, उत्क्रांती घडून येते. जर तुम्हाला तुमच्या उद्योगात प्रबोधन हवे, तर उत्क्रांतीची ज्योत लावायला हवी. त्यासाठी आपल्याला प्रत्येक गोष्टीचे मूल्यांकन करणे आवश्यक आहे. त्यामुळे तुमचे मागचे पाऊल आणि पुढचे पाऊल यात तुम्ही योग्य मोजणी करून, स्वत:चा वेग ठरवून घेऊ शकता. उत्क्रांती नेहमी नवीन गोष्टींना, कल्पनांना आणि नवीन ध्येयांना जन्म देते, ज्यामुळे तुम्ही उद्योग सृजनाचे कार्य करता.१०. उद्यश्री (ध्येय) : उद्योगात जर लक्ष्य निश्चित नसेल, तर कधीच ध्येय गाठता येत नाही. उद्योगात लक्ष्यपूर्ती तेव्हाच होते, जेव्हा तुमच्या ध्येयाला लक्ष्य प्राप्त होते. उद्यश्री शक्ती तुम्हाला तुमच्या उद्योगाचे लक्ष्य प्राप्त करून देण्यासाठी उद्युक्त करते. उद्यश्री म्हणजे, तुमच्या नवशक्तीची खºया अर्थाने विजयादशमी असते. जेव्हा उद्योगात तुमच्या नवशक्ती एकत्र येतात, तेव्हा खºया अर्थाने उद्योगात दसºयाचे तोरण लागले जाते.उद्योगात सरस्वती (ज्ञान), लक्ष्मी (संपत्ती) आणि काली (कृती व संरक्षण) यांचा समभुज त्रिकोण आखून घ्या, ज्यानुसार उद्योगाचा आराखडा बनून मिळेल.