शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'दगडा पेक्षा वीट बरी' प्रमाणे महाविकास आघाडी पेक्षा महायुती बरी; लक्ष्मण हाकेंनी स्पष्टच सांगितलं
2
'आप'ला मोठा धक्का, मंत्री कैलाश गेहलोत यांनी दिला पदाचा राजीनामा, पक्षालाही ठोकला रामराम 
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : बारामतीमध्ये शरद पवारांच्या बॅगांची तपासणी; अधिकाऱ्यांनी हेलिकॉप्टरमधील साहित्याची केली तपासणी
4
अजित पवार प्रचंड जातीवादी माणूस, त्यांनी कायम...; जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप
5
"मणिपुर ना एक है, ना सेफ है", हिंसाचारावरून मल्लिकार्जुन खरगेंचा PM नरेंद्र मोदींवर निशाणा
6
मुंबईमध्ये अपक्षांना थारा नाहीच! ३६ मतदारसंघांतील आकेडवारी काय सांगते?
7
मुंबई : अभिनेत्याच्या पत्नीला आला एक मेसेज; सायबर ठगाने कसा घातला गंडा?
8
मुंबईवरून आलेल्या ट्रॅव्हल्समध्ये सापडली कोट्यवधीची रक्कम, मोजदाद सुरू; पोलिसांनी ठेवला पहारा
9
Amit Shah : चार नियोजित सभा सोडून अमित शाह तातडीने दिल्लीकडे रवाना; नेमकं कारण काय?
10
"मला जेलमध्ये टाकण्याची भाषा करू नका"; एकनाथ शिंदेंनी थोपटले दंड
11
Chalisgaon Vidhan Sabha: जुन्या पक्क्या मित्रांमध्ये रंगली आहे कट्टर लढत!
12
निष्काळजीपणा की कट? रुग्णालयातील NICU वॉर्डमध्ये कशी लागली आग; समोर आला रिपोर्ट
13
देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेले हे निर्णय विधानसभा निवडणुकीत ठरू शकतात गेमचेंजर
14
Indian Players Injured, IND vs AUS 1st Test: टीम इंडिया संकट में है! पहिल्या कसोटीआधी भारतीय संघातील ४ स्टार खेळाडू दुखापतग्रस्त
15
नाशिकमध्ये राज ठाकरेंचा विरोधकांवर घाव, तर अजित पवारांनी ताईंचा वाढवला भाव
16
Bachchu Kadu : "लोकसभेच्या निकालाची पुनरावृत्ती करा"; बच्चू कडू यांचं आवाहन
17
"आता मी थोड्याच दिवसांचा पाहुणा’’, मनोज जरांगे पाटील भावूक; समर्थकांना केलं असं आवाहन
18
शादी मुबारक! पापाराझींच्या कमेंटवर तमन्ना भाटियाची अशी रिॲक्शन; विजय वर्माला हसू आवरेना
19
Ashish Shelar : "स्टेज खचला! संकेत कळला?, भाषण संपताच खचते पायाखालची माती"; शेलारांचा ठाकरेंना टोला
20
"लष्कर-ए-तैयबाचा सीईओ बोलतोय...", रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला धमकीचा फोन

CBI आणि NIA यांची बोलती सध्या बंद का?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2022 9:43 AM

ईडी आणि आयकर विभाग सकाळ-संध्याकाळ छापे टाकून बातम्यांमध्ये झळकत असताना एनसीबी, सीबीआय, एनआयए मात्र मौनात कसे?

हरीश गुप्ता, नॅशनल एडिटर, लोकमत, नवी दिल्ली -मुंद्रा बंदरावर २१ हजार कोटींचे हेरॉइन पकडले गेले. सप्टेंबर २०२१ च्या या घटनेने माध्यमांमध्ये मोठे मथळे मिळवले होते. महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) अदानी यांच्या गुजरातमधील बंदरावर हे २९८८.२१ किलो हेरॉइन पकडले. याचा दहशतवादाशी काही संबंध नसूनही हे प्रकरण गृहमंत्रालयाच्या अखत्यारीतील एनआयएकडे देण्यात आले. गुजरात पोलीस, डीआरआय, एनसीबी यांना दूर ठेवले गेले. जूनमध्ये  प्रक्रिया केलेले टाल्क स्टोन्सचे साठे या बंदरातून मार्गस्थ झाल्याचेही डीआरआयने कळवले होते. डीआरआयकडून ते प्रकरणही काढून घेण्यात आले; परंतु या सर्वांत मोठ्या स्मगलिंग प्रकरणामागचे मोठे मासे शोधण्यात एनआयएला अपयश आले. १० जणांना या प्रकरणात अटक झाली इतकेच. अगदी अहोरात्र सरकारवर टीका करणारे राजकीय पक्षही यावर काही बोलले नाहीत. नॉयडातील आशी ट्रेडिंग कंपनीच्या आवारात एनआयएला जे सापडले ते धक्कादायक होते. काही आक्षेपार्ह कागदपत्रे, वस्तू आणि अन्य गोष्टी तेथे सापडल्या, असे एनआयएच्या  अधिकाऱ्यांनी पत्रक काढून सांगितले. इराण, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानातून जहाजातून आलेला माल आम्ही हाताळणार नाही, असे अदानी बंदरातर्फे सांगण्यात आले. सप्टेंबरमध्ये जप्त झालेल्या मालाची किंमत होती २१ हजार कोटी रुपये. जून २१ मध्ये आयात केला गेलेला माल बेपत्ता झाला. कुठे? कसा? - याचे उत्तर कोणाकडे नाही. चौकशी एनआयएकडे का देण्यात आली? - उत्तर नाही. मौनम् सर्वार्थ साधनम! सीबीआयमध्ये काय शिजतेय? महाराष्ट्र केडरमधले आयपीएस अधिकारी सुबोधकुमार जयस्वाल सीबीआयचे संचालक झाल्यापासून नियम बदलले आहेत. जयस्वाल यांच्यासाठी गप्प बसणे सुवर्णमोलाचे आहे. कोणतीही विशेष ओळख, नाव नसलेले असे ते अधिकारी असून त्यांनी सीबीआयभोवती जणू तटबंदी बांधून एक किल्ला केला आहे. महत्त्वाच्या  विषयांवर चर्चेसाठी एकेकाळी अधिकारी पत्रकारांना भेटत असत. ते दिवस आता गेले. कसलीही माहिती अनधिकृतपणे बाहेर फुटू नये यासाठी हा खटाटोप. संस्थेचे मुख्यालय आणि कार्यालयांची सुरक्षितता हाही एक हेतू त्यामागे आहे. सीबीआयने आपली सुरक्षितता वाढवली असून, गुजरात केडरच्या अधिकाऱ्याला त्यासाठी डीआयजी श्रेणीवर नेमण्यात आले आहे. सर्व अधिकाऱ्यांना पेन ड्राइह, चीप बेस्ड ॲक्सेस कार्डस् वापरायला मनाई असून, बाहेरच्यांशी फोनवरही बोलायचे नाही, असा नियम आहे. महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरुद्ध चाललेल्या चौकशीची माहिती बाहेर फुटल्याने हे पाऊल उचलावे लागल्याचे जयस्वाल सांगतात; परंतु वास्तवात २०२० साली सूत्रे हाती घेतल्याबरोबर जयस्वाल यांनी हे केले होते. अधिकृत वापरासाठी संस्था अधिकाऱ्यांना एक्स्टर्नल हार्ड डिस्क देईल, प्रत्येक गोष्ट रेकॉर्ड केली जाईल, असेही ठरवण्यात आले. भ्रष्टाचाराविरुद्ध लढून सीबीआयने माहिती द्यायची आहे; पण एजन्सी काय करते आहे, हे सध्या कोणालाही कळत नाही. वेबसाइटवर अधूनमधून पत्रके तेवढी टाकली जातात. जयस्वाल यांच्यासाठी सीबीआय म्हणजे भ्रष्टाचारविरोधी पहारेकरी नव्हे! एखाद्या गुप्तचर संस्थेसारखी ते सीबीआय चालवतात, असे अंतस्थ सूत्रे सांगतात.जॅकलीन फर्नांडिसचे पुढे काय झाले?खनन प्रकरणात अंमलबजावणी संचालनालय भले पंजाब मुख्यमंत्र्यांच्या पुतण्याच्या मागे लागले असेल, अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस प्रकरणात मात्र तपास संथगतीने चालला आहे. २०० कोटींची लूट करणाऱ्या सुकेश चंद्रशेखर प्रकरणात बेकायदा पैसे दिल्याबाबत जॅकलीन फर्नांडिसचे नाव आले. चंद्रशेखरने तो तुरुंगात असताना या अभिनेत्रीला १० कोटींची भेटवस्तू पाठवली, असे सांगण्यात येते. नंतर तो खटपटी करून तुरुंगाबाहेर आला. जॅकलीनला मुंबईहून चेन्नईला नेण्यासाठी खास विमान उपलब्ध करून दिले. तिथल्या हॉटेलात दोघे दोन दिवस राहिले. एका उद्योगपतीच्या बायकोकडून लुटलेली प्रचंड मोठी रक्कम जॅकलीनकडे देण्यात आली असावी, असा संशय ईडीला आहे. जॅकलीनची तीनदा चौकशी झाली; पण काहीच हाती लागले नाही. ‘मी या प्रकरणात बळी असून चौकशीत सहकार्याला तयार आहे’ इतकेच ती म्हणत राहिली. जॅकलीन फर्नांडिसला गतवर्षी देश सोडून जाताना मुंबई विमानतळावर अडवण्यात आले होते. मात्र, अटक झाली नव्हती. बनावट सॉफ्टवेअर वापरून हा लफंगा सुकेश आपण बडा सरकारी अधिकारी असल्याची बतावणी एका महिलेकडे करत असे. या महिलेच्या पतीला कायद्याच्या कचाट्यातून सोडवण्याचे आमिष दाखवून त्याने पैसे उकळल्याचा आरोप आहे. सुकेशची पत्नी लीना मारिया आणि त्याच्या दोन सहकाऱ्यांना अटक झाली आहे. जॅकलीन फर्नांडिसबाबत मात्र मौन पाळण्यात येत आहे. 

टॅग्स :CBIगुन्हा अन्वेषण विभागNIAराष्ट्रीय तपास यंत्रणाEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालय