शहरं
Join us  
Trending Stories
1
'पंतप्रधान नरेद्र मोदी यांना अयोध्येतून निवडणूक लढवायची होती, पण...'; राहुल गांधींचा लोकसभेत मोठा गौप्यस्फोट?
2
VIDEO : राहुल गांधी यांनी भगवान शिव शंकरांचा फोटो दाखवताच कॅमेरा फिरला! काँग्रेस म्हणाली, बघा 'जादू'!
3
पंकजा मुंडेंना विधानपरिषदेची उमेदवारी जाहीर; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
4
मेधा पाटकरांना 5 महिने कारावास अन् 10 लाखांचा दंड, 23 वर्षे जुन्या प्रकरणात शिक्षा
5
विधानपरिषदेत शिवीगाळ! अंबादास दानवे आणि प्रसाद लाड यांच्यात हमरीतुमरी; माझ्यावर बोट केलं, तर....
6
विधान परिषद निवडणुकीसाठी काँग्रेसकडून प्रज्ञा सातव यांना उमेदवारी 
7
पंकजा मुंडेंना विधान परिषदेची उमेदवारी; मनोज जरांगेंची स्पष्ट शब्दांत प्रतिक्रिया, म्हणाले...
8
'सिंचन घोटाळ्यातील आरोपी भाजपसोबत', AAP खासदाराच्या टीकेवर प्रफुल्ल पटेलांचा पलटवार
9
राजस्थानमध्ये भीषण अपघात! बोलेरो-ट्रकची धडक; ९ जणांचा मृत्यू
10
“गर्व है कि हम हिंदू हैं!”; राहुल गांधी यांच्या विधानावरुन योगी आदित्यनाथ यांचे प्रत्युत्तर
11
“उद्धव ठाकरेंच्या काळात महाराष्ट्र उद्ध्वस्त झाला, २ वर्षांत FDIमध्ये अव्वल”: उदय सामंत 
12
"मला गप्प बसवायला गेले अन् भाजपच्या ६३ खासदारांना जनतेने कायमस्वरुपी बसवलं", महुआ मोईत्रांचा हल्लाबोल
13
"माझा भाऊ कधीच हिंदूंचा अपमान करू शकत नाही’’, राहुल गांधींच्या बचावासाठी प्रियंका गांधी सरसावल्या  
14
'लिहून देतो, तुमचा गुजरातमध्ये पराभव करणार...', लोकसभेतून राहुल गांधींचे BJP ला थेट आव्हान
15
“खऱ्या अर्थाने वंचित, दलितांना न्याय देण्याचे काम भाजपा करते”; अमित गोरखेंची प्रतिक्रिया
16
Maharashtra Vidhan Parishad Election 2024 विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपाकडून उमेदवार जाहीर, पंकजा मुंडेंसह या पाच जणांना संधी
17
शेकडो कर्मचाऱ्यांसाठी रतन टाटा बनले संकटमोचक; नोकरीवरुन काढण्याची नोटीस घेतली मागे
18
आफ्रिकन 'सफाई'!! टीम इंडियाच्या पोरींची कमाल, वनडे पाठोपाठ कसोटी मालिकाही जिंकली!
19
७ वर्षात ७० वेळा पेपर फुटला, नीट व्यावसायिक परीक्षा बनवली - राहुल गांधी
20
Success Mantra: आळस तुमच्या प्रगतीच्या आड येत असेल तर 'हे' दहा उपाय करा आणि यशस्वी व्हा!

'एनटीए'ने एवढ्या मोठ्या घोडचुका कशा केल्या? 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2024 5:47 AM

नॅशनल टेस्टिंग एजन्सीने अनेक चुका केल्या. त्याची उत्तरे त्यांच्याकडे आहेत का? त्यामुळे 'एनटीए'ची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहेत.

हरीश बुटले, संस्थापक, 'डिपर' आणि संपादक, 'तुम्ही आम्ही पालक'

पेपरफुटीचे प्रकरण किंवा सॉल्व्हर गँगचे कृत्य हे समाजकंटक आणि नतद्रष्ट वृत्तीच्या लोकांचे काम आहे आणि तो प्रश्न नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या (एनटीए) अखत्यारीबाहेरचा आहे असे जरी गृहीत धरले तरी ज्या बाबतीत 'एनटीए'ची स्वतःची जबाबदारी होती त्या ठिकाणी त्यांनी एवढ्या घोडचुका कशा केल्या? ही चुकांची मालिका न संपणारी असल्याने एनटीएची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहेत. NEET UG बाबतचा संपूर्ण घटनाक्रम बघता पुढील प्रश्नांची कोणती उत्तरे एनटीए देऊ शकेल याबाबत शंकाच आहे.

१. ऑक्टोबर महिन्यामध्ये अचानकपणे २२ ते २५ टक्के अभ्यासक्रम कमी करण्यात आला. अभ्यासक्रम कमी झाल्याने विद्यार्थ्यांना पेपर सोपे जातील आणि त्यांना मोठ्या प्रमाणावर गुण मिळतील याची जाणीव असतानादेखील अंतिम पेपर साधारण का काढला? हे नेमकं का आणि कशासाठी केलेलं होतं याचं कोणतंही कारण दिलेलं नाही.२. एनटीएने फॉर्म भरून घेताना एक महिन्याची मुदत संपून गेल्यानंतरही दोन दिवसासाठी (एप्रिल ९ व १०) पोर्टल पुन्हा सुरू करण्यामागे काय उद्देश होता? ते कोणाच्या परवानगीने आणि कशासाठी सुरू करण्यात आले? दुसऱ्या टप्प्यात नेमक्या किती विद्याथ्यर्थ्यांची नोंदणी झाली आणि या वाढलेल्या गुणांमध्ये यापैकी किती विद्यार्थी समाविष्ट आहेत याची कोणतीही आकडेवारी जाहीर केली नाही.३. परीक्षेसाठी रजिस्ट्रेशन करताना केवळ विद्यार्थ्यांचे नाव, ज्यामध्ये त्याच्या आई-वडिलांचा कोणताही उल्लेख नसलेले फॉर्म्स एनटीएने स्वीकारले तरी कसे ? त्या दोन दिवसांत भरलेल्या फॉर्म्समधील काही विद्यार्थ्यांना एकच केंद्र कसे व का देण्यात आले? त्या त्या राज्यात केंद्र असताना विद्यार्थ्यांना इतर राज्यातून परीक्षा देण्याची मुभा का देण्यात आली? असे नियम ठेवण्यामागे नेमका उद्देश काय होता?४. एनटीएने कोणतीही पूर्व सूचना न देता १४ जूनला लागणारा निकाल ४ जूनला सायंकाळी जाहीर केला. दहा दिवस शिल्लक असताना एवढी घाई करण्याचे कारण काय? त्याच दिवशी लोकसभेचे निकाल जाहीर होत होते. एकाच केंद्रावरील आठ विद्यार्थी, ज्यापैकी सहा विद्यार्थ्यांना ७२० गुण मिळाले आणि त्यामुळेच शंका निर्माण झाली, त्या शंकेचं निरसन त्यांनी सुरुवातीलाच का केलं नाही? दोन विद्यार्थ्यांना ७२० पैकी ७१८ आणि ७१९ गुण मिळाले. NEET च्या प्रक्रियेत असे गुण मिळूच शकत नाहीत हे माहीत असूनसुद्धा त्याकडे दुर्लक्ष करून निकाल का जाहीर केला?

५. निकाल जाहीर करताना असे गुण विद्यार्थ्यांना मिळालेले आहेत ते 'ग्रेस' गुण दिल्यामुळे मिळालेले आहेत, ते निकाल जाहीर करताना का सांगितले नाही? ग्रेस मार्क्स देण्यासाठी जे सूत्र वापरले, ते सूत्र CLAT परीक्षेच्या वेळी २०१८ सालचे होते. मात्र ती परीक्षा ऑनलाइन होती आणि NEET परीक्षा ऑफलाइन ! त्याचप्रमाणे ते सूत्र मेडिकल किंवा इंजिनिअरिंगसाठी वापरायचे नाही असे निर्देश असताना ते वापरले ही सर्वांत मोठी घोडचूक होती. ती का करण्यात आली?६. ग्रेस मार्क्स केवळ १५६३ विद्यार्थ्यांनाच दिले आहेत, हे कोणत्या आधारावर सूचित केले? ७२० ते ६२० या गुणांच्या दरम्यानचा फुगवटा एवढ्या मोठ्या प्रमाणावर कसा निर्माण झाला आणि तोच ६२० ते ५२० या १०० माकांच्या दरम्यान त्या प्रमाणात का नाही या विषयी कोणतेही समाधानकारक विश्लेषण का दिले नाही?

या आणि अशा अनेक प्रश्नांची एनटीएकडे समाधानकारक उत्तरेच नाही. याशिवाय पेपर फुटी आणि केंद्र पातळीवर विद्यार्थ्यांना पेपर सोडवून देणाऱ्यांच्या टोळ्या निर्माण झालेल्या आहेत. त्यांच्यावर वचक निर्माण करणे हादेखील एक महत्त्वाचा विषय आहे. त्यातच भरीस भर म्हणजे थेट डार्क वेबवर पेपर उपलब्ध झाल्याने UGC-NET आणि त्यापुढील दोनच दिवसांत NEET-PG देखील कॅन्सल करावी लागल्याने एनटीएची पुरती नामुष्की झाली आहे. एनटीएचे महासंचालक सुबोधकुमार यांची तडकाफडकी उचलबांगडी करून नवीन कमान कर्नाटक कॅडरचे प्रदीप सिंग खरोला यांच्याकडे सोपवली आहे. मात्र NEET-UG चा आक्रोश बघता RE-NEET घेण्यावाचून कोणताही पर्याय दिसत नाही.            

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र