शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपची मोठी घोषणा! मुंबईत मनसेच्या या उमेदवाराला पाठिंबा; पूर्ण ताकदीने प्रचार करणार
2
लाडक्या बहि‍णींना महिन्याला ₹2100, शेतकऱ्यांना कर्जमाफी अन्..CM शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
3
मुंब्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर उभारा; फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना आव्हान
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला; सतेज पाटलांसमोर शाहू महाराजांची घोषणा
5
IPL २०२५ च्या मेगा लिलावाचे शहर ठरले; या तारखांना सौदीत २०४ खेळाडू निवडले जाणार
6
Uddhav Thackeray: शिंदेंना वाटले तर चिन्ह द्या, पण शिवसेना माझीच राहणार; उद्धव ठाकरेंचे मोठे वक्तव्य
7
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
8
गुजरातच्या आणंदमध्ये बुलेट ट्रेनचा पूल कोसळला; दोन मजुरांचा मृत्यू, एक जखमी
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "महायुतीची लाडकी बहीण योजना तात्पुरती, आम्ही योजना कायम ठेवणार"; विश्वजीत कदमांचा विरोधकांवर हल्लाबोल
10
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
11
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिला बॉक्सरकडून फसवणूक; गोल्ड जिंकलं पण पुरुष असल्याचे उघड झालं
12
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
13
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
14
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
15
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
16
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
17
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
18
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
19
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
20
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या

... पण पैशाचे सोंग कसे काढणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 06, 2020 4:07 AM

कर्ज काढण्याचा सल्ला देणारे चंद्रकांत पाटील आणि सुधीर मुनगंटीवार यांच्याच पक्षाचे सरकार केंद्रात आहे. केंद्राने महाराष्ट्राला मदत केली पाहिजे, अशी मागणी करण्याऐवजी कर्ज काढून शेतकऱ्यांना द्या, असा सल्ला देणे म्हणजे केवळ राजकारण करणे होय.

‘सगळी सोंगं काढता येतात, पण पैशाचे सोंग काढता येत नाही,’ अशी ग्रामीण भागात म्हण आहे. लॉकडाऊननंतर राज्य सरकारची अशीच अवस्था झाली आहे. तिजोरीत पैसा येणे थांबले आहे आणि अत्यावश्यक खर्च थांबविता येत नाही. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार आणि निवृत्त कर्मचारी वर्गाचा निवृत्तीचा पगार यासाठीच दरमहा बारा हजार कोटी रुपये लागतात. मार्चअखेरीस लॉकडाऊन सुरू झाला. सर्व व्यवहार ठप्प झाले. परिणामी सरकारी तिजोरीत महसूल जमा होण्याची गतीच ठप्प झाली. एप्रिलमध्ये १० हजार कोटी, मेमध्ये ७ हजार कोटी, तर जूनमध्ये १५ हजार कोटी महसूल जमा झाला. कर्मचा-यांचे पगार भागविण्याइतकाही महसूल जमा होत नसेल तर शेतक-यांचे तिस-या टप्प्यातील कर्जमाफीचे ८ हजार २०० कोटी कोठून देणार, हा प्रश्न आहे. अद्याप, सुमारे ११ लाख शेतकरी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेपासून वंचित आहेत. त्यासाठी ८ हजार २०० कोटी रुपये लागणार आहेत, अशी माहिती सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली आहे. उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार म्हणतात की, शेतकºयांच्या कर्जमुक्तीसाठी दोन हजार कोटींची तरतूद केली आहे. दरमहा दोन हजार कोटी बाजूला काढले तरी सर्व शेतक-यांना लाभ मिळण्यासाठी चार महिने लागतील. दरम्यान, महसुलात वाढ होईल, ही अपेक्षा ठेवूनच हा अंदाज बांधता येईल. राज्य सरकारची आर्थिक कोंडी झाली आहे, हे मान्यच करावे लागेल.कोरोनाशी जगायला शिका, असे म्हणताना मग लॉकडाऊनची गरज कितपत राहिली आहे व लॉकडाऊन असतानाही जूनअखेरीस बाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते आहे. या सर्वांचा एकत्रित विचार करायला हवा आहे. सावळागोंधळ उडाला आहे. रात्र कमी आणि सोंगं फार, अशीच ही अवस्था आहे. राज्य मंत्रिमंडळातील सहका-यांनी देखील अधिक जबाबदारीने बोलायला हवे. अजित पवार जे म्हणतात ते अधिक वास्तववादी चित्र आहे. व्यवहार बंद असतील तर तिजोरीत पैसा कोठून येणार, असा थेट सवाल त्यांनीच उपस्थित केला आहे. तो खरा आहे. कर्ज काढा, पण शेतकºयांना पुन्हा कर्ज द्या, अशी मागणी माजी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील करतात, तर माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राज्य सरकारकडे एक लाख कोटींच्या ठेवी असल्याने एक लाख ६५ हजार कोटींचे कर्ज काढता येते, असा मार्ग सुचविला आहे. अशा गोंधळाच्या परिस्थितीत जबाबदारीने बोलावे लागणार आहे. अनेक मंत्री राज्याचा दौरा करताना वेगवेगळी विधाने करून प्रसिद्धी मिळवून जातात. त्या विधानांना आधार काहीच नसतो. अद्याप ८ हजार २०० कोटी शेतक-यांच्या कर्जमुक्तीसाठी लागणार असतील, तर ते कोठून उभे करणार, याचेही उत्तर द्यावे लागेल. गेल्यावर्षी कृष्णा आणि भीमा नद्यांच्या खो-यात महापुरामुळे शेतक-यांचे जे नुकसान झाले, त्याचे पैसे द्यायचे राहून गेले आहेत. त्यावेळी चंद्रकांत पाटील महसूलमंत्री होते. नुकसानीच्या अंदाजाची कागदेच रंगली, प्रत्यक्षात नुकसानभरपाई मिळालेली नाही.

गेल्या महिन्यातळकोकणाला चक्रीवादळाचा तडाखा बसला. त्याची नुकसानभरपाई जाहीर केली. ती कधी मिळणार याचाही पत्ता नाही. देतो, देऊया, दिले असे सांगत सोंग आणणे सोपे आहे; पण पैशाचे सोंग करता येत नाही. जोपर्यंत महानगरातील व्यवहार पूर्वपदावर येत नाहीत, तोवर व्यवहार चालू होऊनही काही उपयोग नाही. मुंबई, ठाणे, नवी मुुंबई, कल्याण, पुणे, नागपूर, औरंगाबाद, आदी महानगरांत कोरोनाचा कहर वाढतोच आहे. परिस्थिती नियंत्रणाखाली नसताना व्यवहार सुरू करता येत नाही. व्यवहार सुरू झाल्याशिवाय तिजोरीत पैसा येत नाही. हे दुष्टचक्र भेदण्याचे आव्हान आहे. अशा कठीण परिस्थितीत केंद्र सरकारने मदतीचा हात दिला पाहिजे. कर्ज काढण्याचा सल्ला देणारे चंद्रकांत पाटील आणि सुधीर मुनगंटीवार यांच्याच पक्षाचे सरकार केंद्रात आहे. केंद्राने महाराष्ट्राला मदत केली पाहिजे, अशी मागणी करण्याऐवजी कर्ज काढून शेतकºयांना द्या, असा सल्ला देणे म्हणजे केवळ राजकारण करणे होय. अशा कठीण परिस्थितीत मग सत्तेवर कोणीही असो, महाराष्ट्राच्या मागे उभे राहायला पाहिजे. राज्य सरकारला मदत केली पाहिजे आणि जनतेला दिलासा देता येईल, अशी भाषा वापरली पाहिजे. कोरोनाचे संकट नसतानाही महापुराच्या नुकसानीचे पैसे का दिले नाहीत, याचा तरी जबाब द्यावा, केवळ राजकीय सोंगं पांघरण्याचे सोडून द्यावे, ती परवडणारी नाहीत.

टॅग्स :Maharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसEconomyअर्थव्यवस्थाCoronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉक