शहरं
Join us  
Trending Stories
1
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
2
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
3
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
4
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
5
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
6
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
7
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
8
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
9
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
10
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
11
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
12
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
13
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
14
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
15
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
16
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
17
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
18
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
19
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
20
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू

छाननीच्या धोक्याची तपासणी कशी करावी?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2019 4:37 AM

कृष्णा, इन्कम टॅक्स आॅडिटची अखेरची तारीख ३0 सप्टेंबर आहे आणि सर्व करदाते आयकर रिपोर्टला अंतिम रूप देण्यात व्यस्त आहेत,

- उमेश शर्मा । सीएअर्जुन (काल्पनिक पात्र) : कृष्णा, इन्कम टॅक्स आॅडिटची अखेरची तारीख ३0 सप्टेंबर आहे आणि सर्व करदाते आयकर रिपोर्टला अंतिम रूप देण्यात व्यस्त आहेत, तर छाननीच्या धोक्याची तपासणी करदात्याने कशी करावी?कृष्ण (काल्पनिक पात्र) : अर्जुना, आयकर विवरणपत्र भरताना करदात्याने लक्षपूर्वक काळजी घ्यावी आणि टॅक्स आॅडिट रिपोर्ट दाखल करतानासुद्धा लक्षपूर्वक माहिती द्यावी. दोन कोटींपेक्षा जास्त उलाढाल असलेल्या करदात्यास हा नियम लागू होतो. नुकतेच आयकर विभागाकडून कॉम्प्यूटराइज असेसमेंट आणि छाननीचे धोरण लागू करण्यात आले आहे.अर्जुन : कृष्णा, टॅक्स आॅडिट रिपोर्ट भरताना छाननीच्या धोक्याची तपासणी कशी करावी?कृष्ण : अर्जुना, करदात्यांनी आयकर लेखा परीक्षण आणि आयकर रिटर्न भरताना खालील काही बाबी लक्षात घेतल्या पाहिजेत.च्फॉर्म २६ एएसमध्ये दाखवलेल्या रिसिप्ट अथवा टीडीएस आणि खात्यांमधील रिसिप्ट्स/टीडीएसशी अचूक जुळले पाहिजेत. तीच माहिती आयटीआरमध्ये अचूक दर्शवली पाहिजे. आयटीआर आणि २६ एएसमध्ये दिलेल्या तपशिलांमध्ये काही जुळत नसल्यास अशा गैरसमजुतीबद्दल एखाद्यास नोटीस प्राप्त होऊ शकते.आयटीआरमध्ये जीएसटी उलाढालीची माहिती देणे आवश्यक आहे, परंतु जीएसटीची उलाढाल आणि पुस्तकानुसार उलाढाल जुळत नसेल तर एखाद्याला नोटिसीला उत्तर द्यावे लागेल. करदात्यांनी उलाढालीतील फरकांचा तपशील नोंदवून ठेवावा.आयटीआरमध्ये माहिती देताना करदात्यांना स्वतंत्रपणे ट्रेडिंग आणि मॅन्यूफॅक्चरिंग खाते सादर करावे लागेल. ही एक नवीन माहिती देण्याची आवश्यकता आहे आणि अशा प्रकारे जर चालू वर्षाचे ग्रॉस प्रॉॅफिट/नेट प्रॉॅफिट प्रमाण मागील वर्षाच्या तुलनेत खूप कमी झाले तर एखाद्याला त्या नोटिसीचा सामना करावा लागू शकतो.

खात्याच्या पुस्तकात आणि आयसीडीअनुसार नफ्यात तफावत झाल्यास किंवा त्याची योग्य माहिती न दिल्यास त्यास नोटीस प्राप्त होऊ शकते.आयटीआरमध्ये इतर खर्चाची रक्कम देताना इतर खर्चांमध्ये जास्त रक्कम नोंदविल्यास कर अधिकारी अशा प्रकारच्या खर्चाच्या प्रकाराबद्दल प्रश्न विचारू शकतात.जर करदात्याने कर माफ उत्पन्नाच्या संपत्तीत गुंतवणूक केली असेल तर करदात्याने आयकर कायदा १९६१ च्या कलम १४ (अ)अनुसार खर्च वजावटीची काळजी घ्यावी.आयकर लेखापरीक्षण अहवालाच्या कलम २३ मध्ये करदात्याने संबंधित नातेवाइकांना दिलेल्या खर्चाचा तपशील सादर करावा लागतो. मागील वर्षाच्या तुलनेत संबंधित व्यक्तींना दिलेली देय रक्कम जास्त प्रमाणात कमी झाल्यास एखाद्याला नोटीस येऊ शकते.प्राप्तिकर लेखापरीक्षण अहवालाच्या कलम ३१ मध्ये करदात्यास असुरक्षित कर्जाची माहिती द्यावी लागेल. मागील वर्षाच्या तुलनेत रक्कम जास्त प्रमाणात कमी-जास्त झाल्यास करदात्याने याची काळजी घेतली पाहिजे.च्व्यवसायाचा कोड आयटीआरमध्ये योग्यरीत्या नमूद केलेला असावा आणि नफा व तोटा खात्यात नोंदविल्यानुसार उत्पनाशी व्यवसायाचा कोड जुळत नसल्यास नोटिसीचा सामना करावा लागेल.३१ मार्चनंतर भरलेल्या विविध कायद्याच्या कराची पावती ज्याचा अहवाल कायदा ४३(ब) नुसार ठेवला पाहिजे. करदात्यास केलेल्या कर भरणाचा तपशील देण्यास पुढे सांगितले जाऊ शकते.अर्जुन : कृष्णा, करदात्याने यातून काय बोध घ्यावा?कृष्ण : अर्जुना, मोठ्या करदात्यांकडे अद्याप टॅक्स आॅडिट रिपोर्ट आणि आयकर रिटर्न देण्यास वेळ आहे. म्हणून वरील मुद्दे लक्षात ठेवले पाहिजेत. छाननीत, एकदा अडकल्यास त्यातून सुटणे कठीण होते. म्हणून योग्य काळजी घेतली पाहिजे.

टॅग्स :Income Taxइन्कम टॅक्स