शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
5
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
6
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
7
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
8
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
9
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

मोठी धरणं असताना महाराष्ट्र तहानेला कसा? शेतकऱ्यांसाठी ‘तेलंगणा पॅटर्न’ राबवा!

By नंदकिशोर पाटील | Published: May 22, 2023 7:59 PM

छत्रपती संभाजीनगरात झालेल्या सभेत तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी महाराष्ट्रातील जितक्या नद्यांची नावं घेतली तेवढी या राज्यातील एकाही नेत्याला सांगता येणार नाहीत. कोयना, जायकवाडी, उजनी, गोसेखुर्दसारखी मोठी धरणं असताना महाराष्ट्रातील शेतकरी तहानलेला कसा?

मराठवाडा, विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी आजवर अनेक उपाययोजना करण्यात आल्या. सरकारी पातळीवर अनेक धोरणं राबविण्यात आली. सामाजिक संघटनांनी पुढाकार घेऊन समुपदेशनासारखे अनेक उपक्रम राबविले. मानसोपचार तज्ज्ञ, कीर्तनकारांच्या माध्यमातून सामाजिक प्रबोधनाचे कार्यक्रम हाती घेण्यात आले, परंतु या सर्व उपाययोजना केल्यानंतरही आत्महत्यांचे सत्र थांबले नाही. किंबहुना, जीवनयात्रा संपविणाऱ्या शेतकऱ्यांचा आकडा दरवर्षी वाढतोच आहे. याचे कारण, समस्येच्या मुळापर्यंत न जाता, आजाराचे योग्य निदान न करता केवळ लक्षणे पाहून वरवर केलेला औषधोपचार! कोणालाच आपला जीव गमवावा वाटत नाही. सगळी धडपड जगण्यासाठीच असते; पण परिस्थिती हाताबाहेर गेल्यानंतर दुसरा तरणोपाय नसतो. बहुतांश आत्महत्यांमागे आर्थिक विवंचना हेच प्रमुख कारण असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. शेतकऱ्यांवर ही आर्थिक विवंचनेची परिस्थिती का ओढवते, याची कारणं जगजाहीर आहेत. ती नव्याने सांगण्याची गरज नाही. प्रश्न एवढाच आहे की, मूळ प्रश्नाची सोडवणूक करण्याची सरकारची इच्छाशक्ती आहे का?

तेलंगणा हे मराठवाडा आणि विदर्भाला लागून असलेले राज्य. २ जून २०१४ रोजी हे नवे राज्य स्थापन झाले. पूर्वीच्या आंध्र प्रदेशात तेलंगणाचा समावेश होता. संयुक्त राज्य असताना या प्रदेशातही मोठ्या प्रमाणात शेतकरी आत्महत्या होत. मात्र, स्वतंत्र राज्य झाल्यानंतर अवघ्या नऊ वर्षांत ते चित्र बदलले. तेलंगणातील आत्महत्यांचे सत्र थांबले. हा चमत्कार कसा घडला? तेलंगणा सरकारने शेतीविषयक मूलभूत समस्येवर शाश्वत उपाय योजले. वीज, पाणी, पतपुरवठा आणि बाजारपेठ या चार मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करून शेतीसाठी चोवीस तास वीज, तीही फुकट, मूबलक पाणी, खरीप आणि रब्बी अशा दोन्ही हंगामांत पेरणीपूर्व आर्थिक मदत आणि ‘रयतू बाजार’च्या माध्यमातून शेतमालाची विक्री व्यवस्था केली. ३० लाख शेती पंपांना मोफत वीज दिली गेली. आत्महत्या रोखण्यासाठी शेतकऱ्यांना कर्जमुक्त केले. मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी सिंचन क्षेत्रात क्रांती करत ८३ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. त्यामुळे २० लाख एकर क्षेत्र बागायत झाले आहे. परिणामी, कृषी माल उत्पादनामध्ये ५ पटीने अधिक वाढ झाली आहे. गतवर्षी सुमारे तीन लाख कोटी रुपयांचा शेती माल तेलंगणाने निर्यात केला. 

भविष्यात कर्जबाजारी होणार नाहीत, यासाठी शेती विकासावर भर देतानाच शेत माल खरेदीची हमी त्यांना दिली. तेलंगणामधील शेतकऱ्यांना हंगामपूर्व १० हजार रुपये बिनपरतीची मदत दिली जाते. यासह पीक विमा शासनाकडून उतरला जातो. शेतकऱ्याचा मृत्यू झाल्यानंतर पुढील आठ दिवसांत पाच लाख रुपये रोख स्वरूपाची मदत दिली जाते. शेतीसाठी पथदर्शी सिंचन प्रकल्प राबविले गेले आहेत. मुख्यमंत्री राव यांनी तलाठी पद रद्द करून धरणी पोर्टल विकसित केले. या पोर्टलवरूनच जमिनीच्या नोंदी व महसुली कामकाज केले जाते. तीन दिवसांत नोंदीची कामे पूर्ण करण्याचे प्रशासनावर बंधन आहे. यामुळे शेतकऱ्यांची अडवणूक थांबली. या शिवाय, तेलंगणात अनेक सामाजिक योजना राबविण्यात येत आहेत. विशेषत: बालविवाह रोखण्यासाठी प्रोत्साहन म्हणून पात्र वयोमर्यादेच्या मुलींच्या लग्नासाठी १ लाख १३ हजार रुपये देण्याचे महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.

तेलंगणा राज्याला जेे जमले ते महाराष्ट्राला का जमू नये? या दोन्ही राज्यांची कोणत्याच बाबतीत तुलना होऊ शकत नाही. महाराष्ट्र हे प्रगतिशील राज्य म्हणून ओळखले जाते. औद्योगिकदृष्ट्या तेलंगणाच्या कितीतरी पुढे; पण शेती आणि सिंचनाकडे केलेल्या अक्षम्य दुर्लक्षाचे परिणाम आज आपण भोगत आहोत. छ. संभाजीनगरात झालेल्या सभेत तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी महाराष्ट्रातील जितक्या नद्यांची नावं घेतली तेवढी या राज्यातील एकाही नेत्याला सांगता येणार नाहीत. महाराष्ट्राचे वीज मंडळ कधीकाळी देशात अग्रगण्य समजले जात होते. आपल्या राज्यकर्त्यांनी ते खिळखिळे करून टाकले. शेतीसाठी आपण किमान सलग आठ तास वीज देऊ शकत नाही. सिंचनासाठी धरणं बांधली; पण शेतीला पाणी नाही. राष्ट्रीयीकृत बँका शेतकऱ्यांना दारात उभे करत नाहीत. महाराष्ट्राने किमान शेजारच्या तेलंगणातून प्रेरणा घेऊन तो पॅटर्न राबविला तर बळीराजाचे आणि पर्यायाने राज्याचे कल्याण होईल.

पेरणीपूर्वी दहा हजार द्याराज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखायच्या असतील तर खरीप आणि रब्बी दोन्ही हंगामातील पेरणीपूर्वी अल्पभूधारक शेतकऱ्यांना एकरी दहा हजार रुपये देण्याची शिफारस महसूल खात्यातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने केेली आहे. या शिफारसीबद्दल बक्षिसी देण्याऐवजी या ‘आगाऊपणा’बद्दल संबंधित अधिकाऱ्याची वरिष्ठ पातळीवरून कानउघाडणी करण्यात आल्याचे समजते!

टॅग्स :MarathwadaमराठवाडाagricultureशेतीFarmerशेतकरीAurangabadऔरंगाबादWaterपाणी