शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस कोल्हापुरात कुकर चिन्हावर लढणार? राजू लाटकर यांचे चिन्ह जाहीर, उद्या पुढची दिशा ठरणार...
2
Satej Patil: सतेज पाटलांच्या डोळ्यांत अश्रू तरळले; "दुपारी २.३६ मिनिटांनी मालोजीराजेंचा फोन आला"
3
अटकेपार झेंडे फडकावले आमच्या मराठे शाहीने अन् इथे व्यासपीठावर मुली नाचवतायत? राज ठाकरे कुणावर संतापले?
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी नॉट रिचेबल नव्हतो, सतेज पाटीलच..."; मधुरिमाराजेंच्या माघारीनंतर राजेश लाटकरांनी थेटच सांगितलं
5
कोलकाता बलात्कार प्रकरणी ८७ दिवसांनी आरोप निश्चित,दररोज सुनावणी होणार
6
धक्कादायक! मावशी गंगा स्नानाची रील बनवत राहिली अन् 4 वर्षांची चिमुकली बुडत रहिली! 2 तासांनंतर सापडला मृतदेह 
7
...तर रोहित कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होईल, केवळ एकदिवसीय सामने खेळेल; दिग्गज क्रिकेटरची मोठी भविष्यवाणी
8
कॅनडामध्ये हिंदू मंदिरावरावरील हल्ल्याचा मोदींकडून निषेध; 'ट्रुडोंनी कायद्याचे राज्य राखावे अशी अपेक्षा' 
9
AUS vs PAK : "ऑस्ट्रेलियाला नशिबाने साथ दिली...", पाकिस्तानच्या पराभवानंतर कर्णधार रिझवानचं विधान
10
सात राज्यांत कांटे की टक्कर, एकात ट्रम्प आघाडीवर; अमेरिकेच्या मतदानावर जगाच्या नजरा खिळल्या
11
video: लाईव्ह सामन्यादरम्यान कोसळली वीज; एका खेळाडूचा मृत्यू, तर अनेकजण गंभीर जखमी
12
त्याला १२ भाऊ आणि ४ बहिणी आहेत; पाकिस्तानी खेळाडूचा परिचय करुन देताना अक्रम भलतंच बोलला
13
दापोलीत सहा कदम, पर्वतीत तीन अश्विनी कदम! नावं, आडनावं 'सेम टू सेम', कुणाचा होणार 'गेम'
14
उपमुख्यमंत्री बनवून भाजपानं अन्याय केला का?; देवेंद्र फडणवीसांनी आभारच मानले, कारण...
15
राज ठाकरेंचा पहिला घणाघात; पक्ष फोडीवरून एकनाथ शिंदे-अजित पवारांवर बरसले
16
सदा सरवणकरांचा प्रचार करणार की अमित ठाकरेंचा? नारायण राणे म्हणाले...
17
"...तर मीही मुख्यमंत्री व्हायला तयार"; CM महायुतीचाच होणार म्हणत, रामदास आठवले बोलून गेले 'मन की बात'!
18
...तर उद्धव ठाकरे ५ वर्षांसाठी मुख्यमंत्री झाले असते; देवेंद्र फडणवीसांनी मांडलं समीकरण
19
सतेज पाटील भडकण्यापूर्वी कोल्हापुरात मोठे नाट्य घडले, शाहू महाराजांनीच मधुरिमाराजेंना सहीचे आदेश दिले
20
Sanjay Roy : "मी निर्दोष आहे, मला फसवण्यात आलं"; आरोपी संजय रॉयने सरकारवर केला गंभीर आरोप

बस्स् कर यारऽऽ अब कितना रुलायेगा ?

By सचिन जवळकोटे | Published: November 23, 2017 12:05 AM

एकदा अमेरिकन शेतकरी, चिनी शेतकरी अन् मराठी शेतकरी एकत्र आले.

एकदा अमेरिकन शेतकरी, चिनी शेतकरी अन् मराठी शेतकरी एकत्र आले. अमेरिकन शेतकरी बढाया मारू लागला, ‘मी एकाच दिवसात अवाढव्य यंत्रानं ५०० एकर शेत नांगरतो. पेरतो.’ तेव्हा चिनी शेतकरी म्हणाला, ‘माझं फार्महाऊस तर टोटल रिमोट कंट्रोलवर. तिकडं सॅटेलाईट थ्रू अ‍ॅटोमॅटिक पेरणी सुरू असताना मी इकडं चायना मेड मोबाईलवर व्हिड’ओ गेम खेळतो.’ मराठी शेतकरी उत्तरला, ‘मी आभाळाकडं बघत एकाच महिन्यात तीन-तीन वेळा शेत पेरतो; तरीही पाऊस पडला नाही तर पुन्हा चौथ्यांदा तयारीला लागतो.’मराठी माणसाची जिद्द पाहून अचंबित झालेल्या अमेरिकन शेतकºयानं विषय बदलला, ‘माझ्या फॅमिलीचा डाटा मी लॅपटॉपमध्येच सेव्ह केलाय.’ चिनी शेतकरी म्हणाला, ‘मी तर प्रत्येकाचीच मायक्रोचीप बनविलीय.’ मराठी शेतकरी उत्तरला, ‘केवळ माझ्याच घरातल्या नव्हे तर माझे काका, मामा, आजोबा, पणजोबा, खापर पणजोबा अन् त्यांच्या आजीची पणजी यांचीही माहिती मी आॅनलाईन भरलीय. कुणाच्या पायाला तीळ इथंपासून कुणाच्या नातवानं गावच्या यात्रेत इवलीशी कार विकत घेतली, याचीही खडान्खडा माहिती मी त्यात टाकलीय.’ हे ऐकताच समोरचे दोघे अवाक् झाले. अमेरिकन शेतकरी शेवटचं बोलला, ‘मी शेतात तीन-तीन तास उभारतो. अ‍ॅटोमॅटिक स्पे्र करताना कधीच थकत नाही.’ लगेच चिनी म्हणाला, ‘मीही माझ्या डुप्लिकेट कोंबड्या थेट कुरिअरनं जगभरात पाठवतो. खरं-खोटं कळू देत नाही.’ मराठी शेतकरी मात्र शांतपणे सांगू लागला, ‘मी सलग १५ दिवस रोज दहा तास आॅनलाईन फॉर्म भरायला रांगेत उभारतो. बाजारात दर नाही म्हणून शेतातलं उभं पीकही स्वत:च्याच हातानं जमीनदोस्त करतो. विषारी औषधाला न घाबरता फवारतो; कारण निराशेत ते औषध पिऊन-पिऊन म्हणे आम्ही आमच्या शरीराची प्रतिकारशक्ती वाढवितो.’बोलता-बोलता मराठी शेतकरी निघाला, ‘चला, मला जाऊ द्या. कर्जमाफी फॉर्म भरण्याच्या नादात माझा अख्खा दीड महिना वाया गेला. कामधंदे सोडून बँकेत हेलपाटे मारत बसल्यामुळं यंदाचं पीकही वाया गेलं. आता पुन्हा कर्ज काढण्यासाठी नवीन बँक हुडकू द्या !’ हे ऐकताच मात्र समोरच्या दोघांनी त्याच्या पायावर डोकं ठेवत एकच वाक्य उच्चारलं ‘बस्स्ऽऽ कर यार.. अब कितना रुलायेगा?’ 

टॅग्स :Farmerशेतकरी