शहरं
Join us  
Trending Stories
1
सलग दोन स्फोटांनंतर लेबनान 'सावधान'! आता विमान प्रवासात पेजर, वॉकी-टॉकीवर बंदी
2
VIDEO: क्रिकेट मॅचमध्ये तुफान राडा! खेळाडूंमध्ये हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी झाली तुडवातुडवी
3
"हिंदूंसोबत विश्वासघात, देव..."; तिरुपतीच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी प्रकरणावरून भाजपची प्रतिक्रिया
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विदर्भातील स्वागतासाठी भाजपाची जय्यत तयारी, तर काँग्रेसचे १० सवाल
5
सातारा: अल्पवयीन मुलाचा ४ वर्षीय मुलीवर अत्याचार; घराच्या टेरेसवर घडला किळसवाणा प्रकार
6
हातात खराटा अन् स्वच्छतेचा मंत्र... नागपुरात रेल्वे व्यवस्थापकांनी केली स्थानकावर साफसफाई
7
"इस्रायलने लेबनानमध्ये नरसंहार केला, आता परिणाम भोगा"; हिज्बुल्ला प्रमुखाचा इशारा
8
रशियासोबतची मैत्री तोडण्याचं कटकारस्थान...! युक्रेनला शस्त्रास्त्र पुरवल्याची खोटी बातमी पसरवली; भारतानं सुनावलं
9
तिरुपती मंदिराच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी? चंद्राबाबूंनी दिला लॅब रिपोर्टचा हवाला, झाली अशी पुष्टी
10
महायुतीतील ८० टक्के जागावाटप निश्चित, भाजपची १६० च्या जवळपास जागा लढविण्याची भूमिका
11
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये सामील; विधानसभा निवडणूक लढवणार?
12
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
13
विरोधी पक्ष राज्याची बदनामी करतायत, लोकसभेतही खोटं बोलून मतं मिळवली, मुख्यमंत्री शिंदे बसरले 
14
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
15
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
16
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
17
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
18
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
19
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
20
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश

मानव जीवन

By admin | Published: September 27, 2016 5:18 AM

भारतीय धारणेनुसार जगात असलेल्या चौऱ्यांशी लक्ष योनींमध्ये मनुष्ययोनी सर्वश्रेष्ठ आहे. कारण मनुष्याला बुध्दी प्राप्त झाली आहे व तिचा वापर करून तो योग्यायोग्यतेचा निर्णय घेत

- डॉ. भूषणकुमार उपाध्यायभारतीय धारणेनुसार जगात असलेल्या चौऱ्यांशी लक्ष योनींमध्ये मनुष्ययोनी सर्वश्रेष्ठ आहे. कारण मनुष्याला बुध्दी प्राप्त झाली आहे व तिचा वापर करून तो योग्यायोग्यतेचा निर्णय घेत असतो, तसेच मनुष्य योनीपेक्षा श्रेष्ठ अशा देव योनीतही जाऊ शकतो. तो ज्ञान, भक्ती व कर्म यांच्या साधनेने जन्म व मृत्युच्या फेऱ्यातून मुक्तसुध्दा होऊ शकतो.आहार, निद्रा, भय आणि भोग हे सर्व प्राणीमात्रात सर्वसाधारण रूपात आढळतात. माणसांत एकच विशेष आहे, जे प्राण्यांत आढळत नाही, ते म्हणजे ज्ञान किंवा बुध्दी.जगातील सर्व धर्म मनुष्याच्या याच ज्ञानाला सुरक्षित करण्याचे काम करतात व त्याला परमतत्वाशी जोडण्याचा प्रयत्न करतात. परमतत्त्वाचा साक्षात्कार जीवनाचे अंतिम उद्दिष्ट असते व ही अशी अवस्था आहे की, जेव्हा मनुष्याचे द्वंद्व संपते व त्याचे रूपांतर सच्चिदानंदात होते. याच परम अवस्थेचे वर्णन संत महात्म्यांनी वेगवेगळ्या प्रकारे केले आहे. संत मीराबाई म्हणते,‘लाली देखन मैं गई, मै भी हो गई लाल।’ संत तुळशीदास म्हणतात,‘जानत तुमही तुमही होई जाई।’ भारतीय दार्शनिक परंपरेचे मानणे आहे की मनुष्य जीवनातच मोक्ष प्राप्ती होऊ शकते. त्यामुळेच मनुष्य जीवनाला एवढे महत्व दिलेले आहे. संत तुळशीदास म्हणतात, बडे भाग्य मानुष तन पावा।सुर दुर्लभसद्ग्रन्थन गावा।। म्हणजेच मनुष्य जीवन मोठ्या भाग्याने मिळते. असे हे मानव जीवन देव देवता यांना सुध्दा दुर्लभ आहे, असे अनेक ग्रंथात वर्णन केले आहे. थोडक्यात, या जीवनाचा उपयोग परम तत्त्वाच्या प्राप्तीसाठीच व्हावा.या उलट काही जण हिंसा-अपराध असे कृत्य करून या अमूल्य जीवनाचा दुरूपयोग करतात. या नकारात्मक कृत्यांचा त्यांच्या स्वत:च्या जीवनावरही विध्वंसकारी असा परिणाम होतो आणि ते स्वत: नष्ट होतात. तरी या जीवनाचा उपयोग वेळीच परमतत्त्व शोधण्यासाठी व्हावा. भारतीय ऋषींनी परम तत्त्वाच्या प्राप्तिसाठी फारच स्पष्ट व अचूक मार्ग सांगितले आहेत. त्याच्या अंतर्गत अनेक उपासना पध्दती विकसित झाल्या आहेत. अतिशय शुध्द अंत:करणाने जेव्हा व्यक्ती स्वत:मध्ये दुसऱ्याला किंवा दुसऱ्यामध्ये स्वत:ला पाहते, तेव्हा ती परमतत्त्वाशी जोडली जाते. या अवस्थेत मनुष्याला विविधतेत एकतेचा अनुभव होतो आणि तो पूर्ण ब्रम्हांडचा नागरिक होतोे. वैश्विक नागरिक होण्याची ही कल्पना भारतीय चिंतन परंपरेची बहुमोल देणगी आहे.