शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या ₹1500 चे लवकरच ₹2100 होणार, मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा!
3
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
4
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
5
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
6
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरल्या होत्या 363 महिला, किती जिंकल्या? असा राहिला महायुतीचा स्ट्राइक रेट
7
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
8
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
9
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
10
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
11
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
12
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
13
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
14
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
15
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
16
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
17
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
18
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
19
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान

नव्या सरकारकडून हवा राज्यहिताचा विचार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2019 3:11 AM

राज्यातील विधानसभा निवडणुकांचा निकाल काहींना अपेक्षित, तर बऱ्याच जणांना अनपेक्षित असा लागला आहे.

- अ‍ॅड. उज्ज्वल निकमराज्यातील विधानसभा निवडणुकांचा निकाल काहींना अपेक्षित, तर बऱ्याच जणांना अनपेक्षित असा लागला आहे. जागांच्या आकडेवारीत फरक झाला असला आणि अनेकांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला असला तरी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांच्या हातातच पुन्हा एकदा सत्तेची किल्ली आलेली आहे. ‘तुझं-माझं जमेना आणि तुझ्याशिवाय करमेना’ या उक्तीप्रमाणे या दोन्हीही पक्षांचं राजकारण गेल्या पाच वर्षांत पाहायला मिळालं असलं तरी आता येणाºया काळात नव्यानं सत्तेत आल्यानंतर दोन्हीही पक्षांना पक्षहितापलीकडे जाऊन राज्याचं हित लक्षात घेऊन वाटचाल करावी लागणार आहे. राजकीय पक्ष म्हणून एकमेकांच्या महत्त्वाकांक्षा वेगवेगळ्या असतीलही; पण त्यापेक्षा जनहिताला प्राधान्य द्यावं लागेल.

मागील काळात सत्तेत एकत्र असूनही या दोन्हीही पक्षांकडून परस्परांवर टीकाटिप्पणी मोठ्या प्रमाणावर केली गेल्याचे जनतेने पाहिले आहे. आगामी काळात या टीकेपेक्षा राज्याचा विकास केंद्रस्थानी ठेवून त्यादृष्टीने आवश्यक उपाययोजनांना गती देण्यासाठी दोन्ही पक्षांनी विचारमंथन करून कृती करायला हवी. विशेषत:, राज्यामध्ये असलेला बेरोजगारीचा प्रश्न सोडवण्यासाठी उद्योगधंदे वाढीला लागले पाहिजेत. कोणताही उद्योजक कोणत्याही राज्यात गुंतवणूक करताना त्या राज्यात राजकीय आणि सामाजिक स्थैर्य आहे का याचा विचार करत असतो. त्यामुळे या दोन्ही पक्षांनी सत्तेत आल्यानंतर आमच्यामध्ये एकवाक्यता आहे, दोघांचेही ध्येय एक आहे, उद्दिष्ट एक आहे, विचार एक आहे हे प्रत्यक्ष कृतीतून दिसून आले पाहिजे. यासाठी दोन्हीही पक्षांना आचारसंहितादेखील ठरवावी लागेल आणि तिचे पालन करावे लागेल. यासाठी समजूतदारपणा दाखवावा लागेल.

निकालांनंतर एक गोष्ट स्पष्ट झाली ती म्हणजे एक्झिट पोलचे काहीही म्हणणे असले तरी जनतेच्या मनात वेगळे होते. पण एक गोष्ट चांगली घडली की वाहणाºया वाºयाला भुलून आयत्या वेळी कुंपणावरून उडी मारणाºया बहुतांश नेत्यांना जनतेने धुडकावून लावले आहे.विशेषत:, एकदा निवडून आल्यानंतरही काही महिन्यांतच त्या पक्षाला रामराम करून पुन्हा निवडणुकीची वेळ आणणाऱ्यांनाही जनतेने योग्य तो संदेश दिला आहे. एक निवडणूक पार पडण्यासाठी सरकारचा बराच पैसा खर्च होत असतो. त्यासाठी बरीच यंत्रणा कामाला लागत असते. हा सर्व खर्च जनतेकडून कररूपातून गोळा केलेल्या पैशातूनच होत असतो. असे असताना केवळ एखाद्या नेत्याच्या निर्णयामुळे पुन्हा निवडणूक लादली जात असेल तर ते योग्य नसून त्यासंदर्भात काही मार्गदर्शक तत्त्वे किंवा कायदेशीर धोरणे ठरवण्याची गरज आता निर्माण झाली आहे.

रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स अ‍ॅक्ट अर्थात लोकप्रतिनिधी कायद्यानुसार निवडून येणाºया लोकप्रतिनिधीचा कार्यकाळ पाच वर्षांचा असतो. पण हा कार्यकाळ पूर्ण करण्यापूर्वीच म्हणजे साधारण तीन वर्षांच्या आत जर एखादा उमेदवार संधीसाधू राजकारणासाठी आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा देऊन पक्ष बदलून पुन्हा रिंगणात उतरत असेल तर त्याच्याकडून होणाºया पोटनिवडणुकीचा संपूर्ण खर्च वसूल केला जाणे आवश्यक आहे. यासाठी कायद्यात तरतूद करावी लागेल. जेणेकरून करदात्यांच्या पैशाचा अपव्यय टाळला जाईल आणि स्वत:विषयी असलेल्या अहंकाराला धक्का देता येईल. तसेच हा सामाजिक स्वरूपाचा गंभीर गुन्हा का मानला जाऊ नये, असा प्रश्न कुणी विचारला तर तो गैरलागू म्हणता येणार नाही.

रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स अ‍ॅक्ट अर्थात लोकप्रतिनिधी कायद्यानुसार निवडून येणाºया लोकप्रतिनिधीचा कार्यकाळ पाच वर्षांचा असतो. पण हा कार्यकाळ पूर्ण करण्यापूर्वीच साधारण तीन वर्षांच्या आत जर एखादा उमेदवार संधीसाधू राजकारणासाठी आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा देऊन पक्ष बदलून पुन्हा रिंगणात उतरत असेल तर त्याच्याकडून होणाºया पोटनिवडणुकीचा संपूर्ण खर्च वसूल केला जाणे आवश्यक आहे. (लेखक विशेष सरकारी वकील आहेत.) 

टॅग्स :BJPभाजपाMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019