विजय बाविस्कर
वाघांच्या अधिवासात पर्यटन सुरू करण्यास आणि प्राणिसंग्रहालये उभारण्यास सर्वोच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या समितीने विरोध दर्शवला. प्राणिसंग्रहालये आणि सफारींना परवानगी देणारी केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाची मार्गदर्शक तत्त्वे मागे घेण्यात यावीत, अशी सूचनाही या समितीने केली. उत्तराखंडमधील जिम कॉर्बेट नॅशनल पार्कने डिसेंबर २०२० मध्ये वाघांसाठी राखीव असलेल्या मुख्य भागामध्ये खासगी बसला परवानगी देण्याचा निर्णय घेतला होता. त्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाच्या समितीने ही सूचना केली, ती 'जिम कॉर्बेट' च्या बाबतीत असली, तरी देशातील कमी-अधिक सर्वच व्याघ्र प्रकल्पांना लागू पडते. व्याघ्र पर्यटन व्हायलाच हवे. मात्र, ते करीत असताना भविष्यात जंगलात वाघ पाहायचे असतील, तर काही मर्यादाही पाळायला हव्यात, असा जाते का? व्याघ्र प्रकल्पांच्या आत मर्यादा पाळल्या जातात संदेश सर्वोच्च न्यायालयाच्या या समितीने व्याघ्र प्रकल्पांना दिला आहे.
वाघ हा आपला राष्ट्रीय प्राणी. तो जगला तर जंगल जगेल आणि तरच आपणदेखील जगू हा राष्ट्रीय प्राणी आपण समजून घेतला नाही तर जनजागृती कशी होईल? त्यामुळे विरोध व्याघ्र पर्यटनाला नाही, तो आहे व्याघ्र पर्यटनाच्या बाजाराला.
गेल्या आठवड्यात एक व्हिडीओ व्हायरल झाला. कॅमेरा घेऊन वाघाच्या मागे धावत सुटलेला पर्यटक त्यात दिसतो. तो व्हिडीओ कुठला आणि कधीचा हे ठाऊक नाही, पण हे चित्र योग्य नव्हे. वाघाच्या जवळ जाण्याची आणि त्याचा पाठलाग करण्याची हिंमत येते कोठून ? व्याघ्र प्रकल्पांमध्ये एखादा वाघ दिसला की, सर्व बाजूंनी पर्यटकांची वाहने घेरून येतात आणि फोटोसेशन सुरू होते, हे चित्र नवे नाही. देशात वाघ वाढले याचा आनंद आहेच, पण म्हणून असा वाघाच्या पर्यटनाचा बाजार आपल्याला परवडेल का? एका व्याघ्र प्रकल्पामध्ये वाघ किती ? त्यांना पाहण्यासाठी दिवसभरात किती सफारी असायला हव्यात? व्याघ्र प्रकल्पाच्या साधारण २० टक्के परिसरापर्यंत सफारी करता येऊ शकते. ती मर्यादा पाळली का? प्रकल्पाच्या शेजारी काय चालते, त्यावरही नियंत्रण आहे का? यातील अनेक प्रश्नांचे उत्तर नाही, असे आहे. व्याघ्र प्रकल्पांच्या बाजूला होणाऱ्या हॉटेल रिसॉर्टची गर्दी पाहिली की, या बाजाराचे स्वरूप लक्षात येते. व्याघ्र प्रकल्पांच्या गेटवर लग्न पार्त्या होऊ लागल्या, तर वाघांचा अधिवास सुरक्षित कसा राहील?
वाघाच्या अधिवासात आपण आक्रमण केले आहे. मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानासह राज्यातील अनेक भागांत लोकवस्ती वाढते आहे. परिणामी अभयारण्यातील जागा वाघांना कमी पडत आहे आणि ते लोकवस्तीत शिरून श्वानांची व लोकांचीही शिकार करत आहेत. हिंस्त्र श्वापदांच्या क्षेत्रात माणसांची घुसखोरी वाढली तर त्यांचे लोकवस्तीत येणे, लोकांवर हल्ले करणे वाढतच जाईल. महाराष्ट्रात वाघ पाहायचा असेल, तर ताडोबा व्याघ्र प्रकल्पात जा, असा सल्ला दिला जातो. इथे वाघ दिसतोच. तो कोअर भागात दिसतो. बफरमध्येही दिसतो आणि बफरच्या बाहेर तर जास्त दिसतो. कारण वाघांची संख्या वाढली आहे. वन विभाग आणि स्थानिकांनी हातात हात घालून काम केल्याने हे शक्य झाले. वाघ वाढल्याने काही प्रश्नही निर्माण झाले आहेत. क्षेत्र तेवढेच. मात्र, वाघ वाढल्याने त्यांचा वावर आता वाढला, परिणामी, वाघांचे हल्ले वाढले. २०२१ च्या तुलनेत वाघांच्या हल्ल्यात मृत्यू घरात डोकावू लागला तर काय होईल ? झालेल्यांची संख्याही वाढली. एकीकडे वाघांची संख्या वाढेल याची काळजी घ्यायची आहे आणि हल्लेही रोखायचे आहेत, अशी दुहेरी कसरत करावी लागणार आहे. जंगलात आणि जंगलाशेजारी राहणाऱ्या माणसांचा विचार करतानाच वाघांसह वन्यजीवांना जपायचे आहे. यात हुल्लडबाज पर्यटकांचे आव्हान वेगळेच.
२६ जानेवारीची सुटी साजरी करण्यासाठी असाच एक ग्रुप 'ताडोबा'च्या बफरमध्ये गेला. गाडीतून उतरून या महाभागांनी जोरजोरात गाण्यांवर धिंगाणा घातला. पाच हजारांचा दंड ठोठावून त्यांना जंगलाबाहेर काढण्यात आले. डीजे लावून डान्स करण्यासाठी 'ताडोबा'त कशाला त्याच्या घरात मुक्तपणे वावरण्याचा अधिकार आहेच ना ! जायचे? हे गांभीर्य पर्यटक समजून घेणार आहेत की नाही? जंगलाबाहेरचे पर्यटन आणि जंगलातील पर्यटन यात प्रचंड फरक असतो आणि ते प्रत्येकाने समजून घ्यायला हवे. प्राणिसंग्रहालयात जाऊन वाघाचा रुबाब समजू शकत नाही. तो समजून घेण्यासाठी जंगलातच जायला हवे, पण त्यासाठी शिस्तदेखील पाळायला हवी. ती पाळली जात नाही म्हणून बंधने येतात. ही बंधने सध्या 'जिम कॉर्बेट वर आली आहेत. उद्या ही बंधने 'ताडोबा'पर्यंत यायला वेळ लागणार नाही. त्यामुळे व्याघ्र पर्यटन शिस्तीत करणे हाच यावरील उत्तम मार्ग ही शिस्त पाळायची की वाघाच्या तळघरापर्यंत त्याचा पाठलाग करायचा, हा ज्याचा त्याचा प्रश्न. एका मर्यादिनंतर घरात पाळलेली मांजरही शांत राहत नाही. वाघ हा तर जंगलाचा राजा! माणसांच्या बेशिस्तीमुळे तोदेखील त्याच्या घरात सुरक्षित राहिलेला नाही. आपण माणसे हल्ली शेजाऱ्यालादेखील आपल्या घरात डोकावू देत नाही. उद्या हाच वाघ गावात घुसून तुमच्या आमच्या ्घरात घुसू लागला तर काय होईल?
(लेखक लोकमतमध्ये समूह संपादक आहेत)