शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय शिरसाट यांच्या लेकाच्या वाहनावर हल्ला; उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारावर आरोप
2
बारामतीत हाय व्होल्टेज सामना: अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क, मताधिक्याविषयी म्हणाले...
3
मुंबईत घरभाड्याचे दर देशात सर्वाधिक; दिल्ली दुसऱ्या क्रमांकावर, ठाण्यात किती भाडेवाढ?
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : अजित पवारांसह अनेकांनी बजावला मतदानाचा हक्क; अनेक ठिकाणी ‘ईव्हीएम’मध्ये बिघाड!
5
A.R.Rahman divorce: "आम्हाला वाटलं होतं ३० वर्ष पूर्ण करू, पण...", ए. आर. रहमानचा २९ वर्षांचा संसार मोडला
6
केवळ शॉपिंग नाही, आता कमाई पण करून देणार 'ही' कंपनी; येणार ₹८००० कोटींचा बहुप्रतीक्षीत IPO
7
मुंबई, ठाण्यात ठाकरे, शिंदेंची प्रतिष्ठा पणाला! ठाकरे बंधूंच्या मतदारसंघांकडे लक्ष
8
पराभव दिसू लागल्यानेच मविआकडून तावडेंवर हल्ला; देवेंद्र फडणवीसांचा आरोप
9
जनसुराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार पादेश्वर महाराजांच्या गाडीवर दगडफेक; महाराज जखमी
10
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
11
जगभर : मुजतबा खामेनेई : ‘शांत’ डोक्याचा ‘सुप्रीम लीडर’!
12
Vaibhav Suryavanshi: १३ वर्षांच्या मुलाला उघडेल आयपीएलचं दार?
13
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!
14
टक्का वाढला पाहिजे..! सर्वोच्च अधिकार नाकारून कसे चालेल...?
15
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
16
विशेष लेख: ‘अर्बन नक्षल’- भाजपच्या मानगुटीवरचे भूत 
17
नरेंद्र मोदी, राहुल गांधी, ठाकरे करणार कोथरुडात मतदान; नामसाधर्म्यामुळे प्रशासनाची धावपळ
18
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
19
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
20
वाशिम येथे मतदानास सुरुवात; मतदारांना मिळतेय सहकार्य

...तर सत्तेवर पुन्हा येऊ शकते काँग्रेस

By admin | Published: September 08, 2014 9:05 AM

नेहरू-इंदिरा परिवाराच्या रूपाने काँग्रेसकडे एक मजबूत आधारस्तंभ आहे. संकटात असतानाच सत्तेवर येण्याची क्षमता वाढवण्याची अद्भुत शक्ती काँग्रेसमध्ये आहे.

सुरेंद्र किशोर, राजकीय विश्लेषकभाजपाची काही मंडळी सध्या काँग्रेसची दुर्दशा पाहून खूश आहे. काँग्रेस पक्ष संपणार असल्याची भविष्यवाणी ते करीत सुटले आहेत. लोकसभा निवडणुकीत काँग्रेस अवघ्या ४४ जागांमध्ये गुंडाळल्या गेल्याने, त्यांनी असे बोलणे स्वाभाविक आहे. पण इतिहास असा आहे, की आतापर्यंतच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसच्या अपयशाचा फायदा विरोधी पक्ष आणि विरोधकांच्या अपयशाचा फायदा काँग्रेस पक्ष घेत आला आहे. यापुढे असे होणारच नाही, असे म्हणता येणार नाही. नरेंद्र मोदी सरकार येत्या सहा महिन्यांत कसे काम करते, त्यावरच काँग्रेसचे संपणे-नसंपणे अवलंबून राहील, असे तटस्थ राजकीय समीक्षकांना वाटते. फक्त १०० दिवसांत कुण्या सरकारबद्दल काही मत बनवणे, अंदाज बांधणे अवघड आहे. सहा महिन्यांत सरकारचा आवाका लक्षात येतो. सहा महिन्यांतील मोदींचे अपयश काँग्रेससाठी यशाचा राजमार्ग तयार करील, पण मोदी यशस्वी झाले, तर मात्र काँग्रेससाठी ते नुकसानकारक राहील. यंदा प्रथमच काँग्रेस निवङणूक हरली अशातला भाग नाही. काँग्रेसने याआधीही पराभव चाखला आहे. १९६७ मध्ये देशातील नऊ राज्यांमध्ये बिगरकाँग़्रेसी पक्षांचे सरकार आले होते. सात राज्यांमध्ये निवडणुकीच्या मार्गाने काँग्रेसेतर पक्ष सत्तेत आले, तर दोन राज्यांत आमदार फोडून. म्हणजे पक्षांतर करवून. तेव्हाच्या बिगरकाँग्रेसी सरकारांचे शिल्पकार होते समाजवादी नेते आणि विचारवंत डॉ. राम मनोहर लोहिया. किमान कार्यक्रमाच्या आधारावर त्यांनी जनसंघ आणि कम्युनिस्ट पक्षांना एकत्र आणले होते. त्या काळात विरोधी पक्षांमध्ये संपूर्ण निवडणूक ऐक्य झाले असते, तर तेव्हाच केंद्रातील काँग्रेसचा एकाधिकार संपला असता. निवडणुकानंतर लगेच लोहियांनी आपल्या राज्य सरकारांना सांगितले होते, ‘‘सहा महिन्यांत जनहिताची अशी कामे करा, की लोकांना तुमच्यातला आणि काँग्रेसमधला फरक स्पष्टपणे लक्षात येईल आणि तसे झाले, तरच लोक काँग्रेसला विसरून जातील. तुम्हाला हे जमले नाही, तर काँग्रेस पुन्हा एकदा सत्तेत येईल. काँग्रेस हा मोठा वस्ताद पक्ष आहे,’’ या शब्दांत लोहियांनी त्या वेळी आपल्या माणसांना ठणकावले होते. डॉ. लोहियांची भविष्यवाणी खरी ठरली. काँग्रेस सत्तेत परतली. कारण संयुक्त सरकारांना सत्ता राबवणे जमले नाही. ते प्रामाणिक होते, पण लहानसहान कारणावरून त्यांच्यात आपसातच बेदिली माजली. एक एक करीत सारी राज्य सरकारे इतिहासजमा झाली. अहंकार आणि सत्तालोलुपता या दोन मोठ्या शत्रूंनी बिगरकाँग्रेसी नेत्यांना खाल्ले. काँग्रेसला आता लुप्त करायचे असेल,तर मोदी सरकार आणि भाजपाला डॉ. लोहिया यांची ती भविष्यवाणी लक्षात ठेवावी लागेल. मोदी सरकारला सहा महिन्यांत ठोस कामे करून दाखवावी लागतील. लोकांना आश्चर्यचकित करणारी कामे मोदी सरकार करील तेव्हाच लोक काँग्रेसला विसरतील. मोदी सरकारने खेळाची सुरुवात तर चांगली केली आहे. सरकारचे सुरुवातीचे काम लोकांना आवडले आहे. भ्रष्टाचार आणि राजकारणाचे गुन्हेगारीकरण याविषयी मोदी सरकारचे निर्णय लोकांना भावले आहेत. सांप्रदायिक मामल्यामध्ये या सरकारची निर्णायक परीक्षा अजून व्हायची आहे. पण, एकूणच प्रवास सोपा नाही. भाजपा आणि मित्र पक्षांची कामाची शैली, राजकारणाची शैली कित्येक प्रकारचे अपशकूनही करीत आहे. मोदी सरकार सुरुवातीची ही गतीे टिकवू शकेल का, असा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे. पुढच्या सहा महिन्यांत इतर काही गोष्टी पाहिल्या जातील. त्यानंतरच म्हणता येईल, की काँग्रेस संपेल की पुन्हा मुसंडी मारील. आणीबाणीच्या पार्श्वभूमीवर १९७७ मध्ये झालेल्या निवडणुकीत उत्तर भारतात काँग्रेस भुईसपाट झाली तेव्हाही काही लोक असेच बोलत होते. पण ते चुकले. कारण काँग्रेसविरोधी पक्षांच्या अपयशाने पुढच्या निवडणुकीत काँग्रेसला परत सत्तेत आणले. १९७७ च्या निवडणुकीनंतर मोरारजीभाई देसाई यांचे सरकार चांगले काम करीत होते. महागाई आणि भ्रष्टाचारावर बराच लगाम होता. बहुसंख्य लोक सरकारवर खूश होते. पण जनता दलाच्या नेत्यांमधील आपसांतील भांडणे आणि काही मोठ्या नेत्यांची राजकीय महत्त्वाकांक्षा काँग्रेसला पुन्हा सत्तेत घेऊन आली. जनता पक्षाची वाईट कामगिरी सरकारला घेऊन बुडाली. तीन वर्षांच्या आत इंदिरा गांधी पुन्हा पंतप्रधान बनल्या. सत्तेत येण्याआधी इंदिराजींनी आपली कार्यशैली बदलली होती, अशातला भाग नव्हता. जनता पक्षातील नेत्यांची आपसातील लठ्ठालठ्ठी काँग्रेसच्या पथ्यावर पडली. मोरारजी सरकारने केलेली चूक मोदी सरकारने केली, तर याही खेपेला काँग्रेसला जीवदान मिळू शकते. सोनिया गांधी, राहुल गांधी यांना आपली कार्यशैली बदलविण्याचीही आवश्यकता पडणार नाही.संकटात असतानाच सत्तेवर येण्याची क्षमता वाढवण्याची अद्भुत शक्ती काँग्रेसमध्ये आहे. विरोधी पक्षांकडूनच काँग्रेस ही शक्ती मिळवत आली आहे. नेहरू-इंदिरा परिवाराच्या रूपाने काँग्रेसकडे एक मजबूत आधारस्तंभ आहे. भाजपाकडेही असा एक आधारस्तंभ नागपुरात आहे. आज स्थिती अशी आहे, की भाजपा आणि मोदी सरकारने काँग्रेसची चिंता करण्यापेक्षा स्वत:च्या कामांची चिंता करावी. आपल्या जनहिताच्या कामांनी भाजपा लोकांना तोंडात बोेटे टाकायला भाग पाडते की, चुकीची पावले टाकून काँग्रेसला पुन्हा सत्तेत बोलावण्यासाठी लोकांना भाग पाडते, ते सर्वस्वी भाजपावर अवलंबून आहे. बहुसंख्य लोकांनी काँग्रेसच्या चुकांकडे काणाडोळा केला आहे. मात्र, काँग्रेसेतर सरकारांची लहानशी चूकही माफ केली नाही. या देशात हेच घडत आले आहे. कारण काँग्रेसेतरांकडूनच लोकांना अधिक अपेक्षा आहे. त्यामुळे काँग्रेस संपल्याचे भाकीत करणे आज घाईचे होईल.