- दिलीप फडके(ग्राहक चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते)आपला आयडी आणि पासवर्ड हॅक होऊ नये म्हणून आपण काळजी घेतो. पण आपला आयडी आणि पासवर्ड किती सुरक्षित आहे हे आपल्याला कसं कळणार ? - एक वाचकइंटरनेटच्या जमान्यात अनेक कारणांसाठी सोशल मीडिया किंवा ई - मार्केटिंग पोर्टल्सवर आपल्याला नाव, पत्ता मोबाईल नंबर असा तपशील नोंदवावा लागतो. त्यामुळे आपला आयडी हॅक होण्याची शक्यता पूर्णतः नाहीशी करता येत नाही. मुळातच संशयास्पद साईट्सवर वैयक्तिक तपशील उघड करणे चुकीचे ठरते. फेसबुकवरदेखील अकाऊंट लॉक करु शकता. आलेली प्रत्येक फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारलीच पाहिजे, असे नसते. पासवर्ड भक्कम ठेवा, तो वरचेवर बदला. भरवशाचे अँटी व्हायरस वापरा आणि ते वरचेवर अपडेट करत राहा. ज्या साईट्स संशयास्पद वाटतील त्या सरळ ब्लॉक करा. ग्राहकाला अधिकृत ई - मेलवरूनच आल्यासारखा वाटणारा बनावट ई-मेल पाठवला जातो. त्यातल्या हायपर लिंकवर क्लिक केलं की, खऱ्या अधिकृत इंटरनेट बँकिंग साईटसारखी दिसणारी पण प्रत्यक्षात बनावट वेबसाईट उघडते. सामान्यत: या ई - मेलमध्ये काही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर बक्षीस देण्याची किंवा प्रक्रिया पूर्ण न केल्याबद्दल दंड आकारण्याची सूचना दिलेली असते. ग्राहकाला लॉग-ईन किंवा प्रोफाईल किंवा पासवर्ड तसेच बँक खाते क्रमांक इत्यादी गोपनीय माहिती देण्यास सांगितलं जातं. ग्राहक विश्वासाने ‘सबमिट’ बटणावर क्लिक करतो आणि जाळ्यात अडकतो. इंटरनेट वापरताना नेहमी ॲड्रेस बारमध्ये योग्य यूआरएल टाईप करुन साईटवर लॉग ऑन करावं. आपला अधिकृत आयडी आणि पासवर्ड देण्यापूर्वी, लॉग ईन पेजचे युआरएल (URL) ‘https: //’ यापासून सुरू होत असल्याचं आणि ‘http: //’ नसल्याची खात्री करून घ्या. यातील ‘एस’चा (s) अर्थ पेज ‘सुरक्षित’आहे, असा होतो. या पेजसाठी एन्क्रीप्शनचा वापर केलेला आहे, असं यावरून स्पष्ट होतं. नेहमी, ब्राउझरच्या खाली आणि व्हेरीसाईन प्रमाणपत्राच्या उजवीकडे आणि सर्वांत खाली असलेलं लॉक चिन्ह शोधा. बँक आपल्या खात्याच्या माहितीसाठी कधीही ई-मेलद्वारे संपर्क साधत नाही, हे लक्षात ठेवा.(तुमचे प्रश्न / अडचणी पाठवण्यासाठी ई-मेल पत्ता : tarkaikaral@gmail.com)
आयडी आणि पासवर्ड हॅक झाला, तर...? तर काय कराल?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2022 6:39 AM