शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
8
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
9
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
10
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
11
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
12
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
13
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
14
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
15
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
16
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
17
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
18
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
19
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
20
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?

आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिल्यास अधिक ऊर्जाबचत शक्य

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2019 4:39 AM

सन १९६९ मध्ये सॅन फ्रान्सिस्कोमधील युनेस्को परिषदेत २२ एप्रिल १९७0 रोजी जागतिक पृथ्वी दिवस स्थापित करण्यात आला.

- डॉ. दीपक शिकारपूरसन १९६९ मध्ये सॅन फ्रान्सिस्कोमधील युनेस्को परिषदेत २२ एप्रिल १९७0 रोजी जागतिक पृथ्वी दिवस स्थापित करण्यात आला. शांती कार्यकर्ते जॉन मॅककोनेल यांनी पृथ्वीच्या सन्मानासाठी ही संकल्पना मांडली होती. पर्यावरणाचे बिघडते तालचक्र पृथ्वीच्या काही विशिष्ट भागापुरते मर्यादित राहणार नसून आज ना उद्या सर्वत्र पसरणार आहे. निसर्गाच्या जीवावर उधळपट्टी करणाऱ्या देशांनाही या बाबीची जाणीव होते आहे आणि तेथेही पर्यावरण जतनाची चळवळ जोर पकडते आहे. इथेच आधुनिक तंत्रज्ञान आपल्याला खूप मदत करू शकते.औद्योगिक जगाच्या एकूण वीजवापरापैकी ४२ टक्के वापर आयटी आणि त्याच्याशी संबंधित क्षेत्राकडून केला जातो. नव्या उत्पादन तंत्रांमुळे संगणक व इतर साधनांच्या (पेरिफेरल्स) किमती झपाट्याने कमी होत आहेत. परंतु ऊर्जेवर करावा लागणारा खर्च वाढतो आहे. कळत नकळत आपणापैकी प्रत्येक जण, या ना त्या प्रकारे, दररोज बरीच ऊर्जा आणि स्रोत वाया घालवत असतो. संगणक क्षेत्रातील पर्यावरण जतनाचे खरे काम सुरू होते पायाभूत गोष्टींपासून; सर्व्हर्स, सॉफ्टवेअर आणि विविध हार्डवेअर्सच्या पातळीपासून. संगणकाकडून खाल्ल्या जाणाºया विजेचा मोठा हिस्सा रंगीत मॉनिटर वापरीत असतो. सध्या विविध कारणांसाठी मोठ्या स्क्रीनचे टीव्ही आणि मॉनिटर्स वापरण्याची प्रथा पडते आहे. अशा वेळी त्यांच्या वीजवापराचा विचार सर्वांनीच करणे आवश्यक आहे.जगभरातील हजारो डेटा सेंटर्समधले लाखो सर्व्हर्स अहोरात्र चालू असतात. ते वीज वापरतात व काम करताना भरपूर उष्णता बाहेर टाकतात. बºयाच सर्व्हर्सना ‘एसी’ उर्फ वातानुकूलन लागते. डेटा सेंटर चालवण्याच्या एकूण खर्चापैकी ५0 टक्क्यांपेक्षाही अधिक रक्कम निव्वळ वीजबिलावर खर्च होते असा अंदाज आहे. या सर्व प्रकारामध्ये मोठ्या प्रमाणात ऊर्जाबचत होऊ शकते. उपलब्ध असलेलेच स्रोत आणि संसाधने वापरून जास्तीत जास्त माहिती कार्यक्षमतेने साठवण्याचे हे आव्हान पेलण्यासाठी डेटाचा सर्वाधिक महत्त्वाचा भाग ‘मिरर्ड डबल डिस्क’वर साठवणे आणि त्याचा बॅकअप उच्च क्षमतेच्या ड्राइव्हवर घेणे यांसारखे उपायदेखील करता येतात. त्यामुळे जागा वाचते (८0 टक्क्यांनी), साठवणूक क्षमता वाढते (३५ ते ८0 टक्क्यांनी), व्यावसायिक कामगिरी सुधारते आणि (ड्राइव्हजची संख्याच कमी झाल्याने) विजेचे बिल निम्मेच येते! ही बाब प्रकर्षाने ध्यानात घ्यायला हवी.

थोडक्यात काय, वापरात असलेल्या प्रक्रिया आणि कार्यपद्धतींचे जरा तिरक्या नजरेने पुनर्परीक्षण केले की माहिती साठवण्याचे काम जास्त कार्यक्षमतेने करता येईल. प्रत्येकाने ऊर्जाबचत आणि पर्यावरण रक्षणातला आपला खारीचा वाटा निभावणे आता क्र मप्राप्त आहे. त्यासाठीचे काही उपाय सर्वांनाच योजता येतील. थोडीशी सतर्कता आणि अवधान बाळगले तर आपण मोठ्या प्रमाणावर वीज वाचवू शकतो. म्हणून सर्वांनी पुढील खबरदारी घेतली पाहिजे. गरज नसताना दिवे, पंखे, संगणकीय व इतर उपकरणे चालू ठेवू नका. भरपूर वीज वापरणारी उपकरणे (मोठे टीव्ही संच, ओव्हन इ.) बराच वेळ वापरायची नसल्यास निव्वळ रिमोटने बंद न करता भिंतीतील प्लगपासूनच बंद करा. शक्य तितक्या आधुनिक व ऊर्जा-कार्यक्षम संगणक व संगणकीय प्रणालींचा वापर करा. तत्कालिक फॅशन व लाटांच्या मागे लागून सतत उपकरणे (गॅजेट्स) बदलत राहू नका. आपण नाहक टाकून दिलेल्या वस्तूंमुळे किती प्रदूषण होईल हे आधी समजून घ्या. संगणकाच्या ‘कंट्रोल पॅनेल’मध्ये ‘पॉवर आॅप्शन्स’ किंवा ‘पॉवर मॅनेजमेंट’ अशा अर्थाचे एक प्रतीकचिन्ह (आयकॉन) आपणास आढळेल. त्यावर क्लिक केल्याने, संगणक वापरात नसताना करण्याचे, ऊर्जाबचतीचे असे लहानसहान विविध उपाय आपणास दिसतील. किरकोळ उपाय म्हणून त्याकडे दुर्लक्ष होता कामा नये. अशा उपायांचा वापर आवर्जून केला गेला तर मोठ्या प्रमाणावर ऊर्जाबचत होऊ शकते. ते समजून घ्यायला हवे.
संगणकाच्या स्क्रीनवर उर्फ ‘डेस्कटॉप’वर मोठे (म्हणजे जास्त एमबी किंवा जीबीचे) जॉब्ज, अ‍ॅप्स, ग्राफिक्स वा चित्रपट थेट ठेवू नका. डेस्कटॉप असा ‘वजनी’ असला की संगणक सुरू होण्यास जास्त वेळ लागतो. इंटरनेटचा सकारात्मक वापर करून आपणास ऊर्जाबचत व पर्यावरण रक्षणासंबंधीचे अधिक ज्ञान मिळवता येईल व शंका समाधानही करून घेता येईल. ई-कचºयाबाबत जागरूक राहा, त्यासंबंधी इतरांमध्ये विशेषत: शालेय विद्यार्थी आणि युवावर्गामध्ये प्रसार करा.( संगणक साक्षरता प्रसारक)

टॅग्स :electricityवीज