-आमीर खानएक सुपरस्टार जेव्हागावा-शिवारात उतरून,घमेली-फावडीहाती घेतो..तेव्हा काय दिसतं त्याला,काय बदलतंत्याच्याही आयुष्यात..माणसं चांगली आणि वाईट अशी दोन्ही असतात. वाईट माणसातही ‘चांगल्या’ची सुप्त इच्छा असतेच. त्यावर बसलेली राख उडवण्यासाठी फुंकर घालणारं निमित्त हवं असतं.- ‘पानी फाऊंडेशन’ हे ते निमित्त ठरलं! त्या निमित्ताला आकार कसा द्यावा हे ठरवण्यात मी थोडा वाटा उचलला आहे एवढंच! या कामाच्या निमित्तानं मी आणि किरण महाराष्ट्रातल्या खेड्यापाड्यांत, दुर्गम आदिवासी भागात पायाला भिंगरी लावल्यासारखे भटकलो. लोकांबरोबर राहिलो. गप्पा मारत देवळात, खळ्यात, रानावनात बसलो. कुदळ-फावडी हातात घेऊन त्यांच्याबरोबरीने शेता-शिवारात राबलो....हे जग, ही माणसं मला एरवी कधी दिसली-भेटलीही नसती. अॅक्टर असणं सोपं नसतं एरवी. तुम्ही लोकांपासून, ख-याखु-या जगापासून, वास्तवापासून पूर्ण तुटता. कारण पर्यायच नसतो दुसरा. लोक सतत तुमच्यामागे असतात. त्यांना सारखं तुमच्याकडून काहीतरी हवं असतं. प्रत्येकजण तुमचा एकेक तुकडा मागत असतो.हे शक्य नसतं. म्हणून मग स्टार्स स्वत:ला दाराआड बंद करून घेतात. इलाजच नसतो. ही सक्तीच असते. ती माझ्यासारख्या अभिनेत्यांना बंद दाराआड कोंडून घालते. जगाशी, माणसांशी संबंध तोडते. हे भीषण आहे.त्यातून मला बाहेर ओढून काढलं ‘सत्यमेव जयते’नं. या शोमुळे मला देशभरातून आलेली वेगवेगळ्या भाषा बोलणारी किती माणसं भेटली! आणि ‘पानी फाऊंडेशन’च्या कामानं तर मला गावागावात ओढूनच नेलं.या पाण्यानं मला जे भान दिलं,जे जग दाखवलं, जी माणसं भेटवली आणि जे दोस्त दिले;काय आणि किती सांगू त्याबद्दल?>,१२,५२१ प्रतींचा खप ओलांडणारं मराठी प्रकाशन विश्वातलं सन्मानाचं, देखणं आणि समृद्ध पान. पाने २५६ : मूल्य २०० रुपये प्रसिद्ध झाला : सर्वत्र उपलब्धतुमची प्रत राखून ठेवण्यासाठी ई-मेल करा : sales.deepotsav@lokmat.com आॅनलाईन बुकिंग करा : www.deepotsav.lokmat.com नाव-पत्ता आणि फोन नंबर लिहून व्हॉट्सअॅप मेसेज पाठवा : 8425814112
‘पानी फाऊंडेशन’च्या कामानं तर मला गावागावात नेलं ओढून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2017 12:07 AM