- डॉ. दीपक शिकारपूर
आधुनिक माहिती तंत्रज्ञानाने साहित्यनिर्मितीच्या क्षेत्रात क्रांती घडवून आणली आहे. संगणक, इंटरनेट आणि इतर तंत्रज्ञानांनी लेखकांना नवीन संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. या तंत्राला शत्रू न मानता मित्र माना. अनेक विविध पर्याय उपलब्ध होतील. पूर्वी लेखक हस्तलिखित वापरात असत, त्यात काही चुका आढळल्या आढळल्या तर सर्व मजकूर पुन: लिहावा लागे. २००० नंतर डेस्क टॉप पब्लिशिंग (संगणकीय डेटा एंट्री)मुळे या प्रक्रियेत क्रांती झाली व सर्व घटकांना फायदा झाला (लेखक, प्रकाशक, टंकलेखक). आता यापुढील पायरी २०२५ नंतर येईल. चॅट बॉट्सशी संवाद साधून आपण मजकूर त्वरित संगणकीय फॉरमॅटमध्ये आपोआप तयार करू शकाल. ना हातांनी लिहिणे, ना संगणकावर टाइप करणे.
इंटरनेटमुळे (विशेषत: सोशल मीडिया) लेखक आता त्यांच्या साहित्यनिर्मितीला जगभरातील वाचकांपर्यंत पोहोचवू शकतात. इतर तंत्रज्ञानांनीही साहित्यनिर्मितीच्या क्षेत्रात मोठा बदल घडवून आणला आहे. उदाहरणार्थ, थ्रीडी प्रिंटिंग तंत्रज्ञानाचा वापर करून लेखक आता त्यांच्या साहित्यनिर्मितीची भौतिक प्रतिकृती तयार करू शकतात. कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि मशीन लर्निंग (ML) ही अलीकडच्या वर्षांत साहित्यनिर्मितीवर मोठ्या प्रमाणावर परिणाम करणारी दोन महत्त्वाची तंत्रज्ञान आहेत.
AI आणि ML तंत्रज्ञानाचा वापर साहित्यनिर्मितीच्या विविध पैलूंमध्ये केला जात आहे, जसे की लेखन, भाषांतर, संपादन आणि प्रकाशन. AI आणि ML तंत्रज्ञान साहित्यनिर्मितीच्या पारंपरिक पद्धतींना आव्हान देत आहे आणि साहित्यनिर्मितीच्या क्षेत्रात क्रांती घडवून आणत आहे. तंत्रज्ञानाचा वापर करून लेखन प्रक्रिया स्वयंचलित केली जाऊ शकते. AI आणि ML तंत्रज्ञानाचा वापर करून, लेखकांना साहित्यनिर्मितीसाठी आवश्यक असलेले माहिती आणि संसाधने उपलब्ध करून दिली जाऊ शकतात. AI आणि ML तंत्रज्ञानाचा वापर करून, लेखकांना त्यांच्या साहित्यनिर्मितीमध्ये अधिक सर्जनशील होण्यास मदत केली जाऊ शकते.
काही लोकांचा असा विश्वास आहे की AI आणि ML तंत्रज्ञान साहित्यनिर्मितीच्या क्षेत्रात क्रांती घडवून आणणार आहे आणि साहित्यनिर्मितीच्या पारंपरिक पद्धतींना आव्हान देणार आहे. तर काही लोकांना हे तंत्रज्ञान साहित्यनिर्मितीवर नकारात्मकआणि साहित्यनिर्मितीच्या गुणवत्तेवर परिणाम करेल असे वाटते. आता हा एक चर्चेचा विषय आहे; परंतु, हे निश्चित आहे की AI आणि ML तंत्रज्ञान साहित्यनिर्मितीच्या क्षेत्रावर मोठा प्रभाव पाडणार आहे. कुठलेही तंत्रज्ञान आपण थांबवू शकणार नाही. यामध्ये कटपेस्ट पेरणारे भोंदू नक्कीच बळी पडतील. चॅट जीपीटी विषय आणि साहित्यप्रकार व शैली सांगितली की, आपोआप कविता करतो. याचा दर्जा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. फक्त अक्षर जुळवून यमक जुळवणारे कवी हे तंत्रज्ञान संपवेल. ज्या साहित्यिकांना सृजनशील कल्पना सुचतात व जर त्या कुठल्याही प्रकार (पॅटर्न)मध्ये मोडत नसतील तर तुम्हाला धोका नाही. उदाहरणादाखल पावसावर कविता एआयद्वारे अशी सादर झाली.पाऊस पडतो, पाणी वाहते,जमीन ओली होते, झाडे हिरवी होतात.पक्षी गातात, फुले उगवतात, वातावरण ताजेतवाने होते.पाऊस पडतो, हवा शुद्ध होते तापमान कमी होते,मानवांसाठी आरोग्यदायी बनते.पाऊस पडतो, जीवन सुरू होते,पृथ्वी तजेलदार होते,सृष्टी उज्ज्वल होते,पाऊस पडतो, आनंद होतो,सर्व काही नवीन दिसतेजग चांगले बनते.काहींना वरील कविता अगदी बाळबोध वाटेल; पण लक्षात ठेवा हे २०२३ आहे, २०२५ नंतर याचा दर्जा खूपच सुधारेल. कदाचित २०३० नंतर कविसंमेलनात रोबो कवी (यंत्रकवी) सहभागी होतील व आपल्या कविता सादर करतील. त्यांना बक्षीस मिळाले तर ते कोणी घ्यायचे यावर वादही होतील. एकंदर आगामी काळ साहित्यिकांनाही संभ्रमाचा असेल.