शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

शहाणी माणसं मौनात, धर्मांधाचा कलकलाट वाढला; वाचलेली, ऐकलेली माणसे गेली कुठे? 

By नंदकिशोर पाटील | Published: April 05, 2023 12:47 PM

वाट चुकलेल्यांना कोणीतरी खडसावून सांगण्याची वेळ आलेली आहे. परंतु ज्यांच्याबद्दल आदर वाटावा अशा आदरणीय व्यक्तिमत्त्वांची उणीव असल्याने कोणालाच कुणाचा धाक उरलेला नाही.

७ नोव्हेंबर १९४६ ही तारीख इतिहासात खूप महत्वाची आहे. स्वातंत्र्याचा लढा अंतिम टप्प्यात असताना देशभर धार्मिक दंगे भडकले. मोहम्मद अली जिन्नांनी पाकिस्तानच्या निर्मितीसाठी ‘ॲक्शन’चा नारा दिल्यानंतर संयुक्त बंगालमध्ये दंगली सुरू झाल्या. आताच्या बांगलादेशात असलेल्या नौखालीत तर तेव्हा रक्ताचे पाट वाहिले. दिल्लीत स्वातंत्र्याच्या वाटाघाटी सुरू असताना नौखाली कित्येक दिवस जळत होते. आता सारखी मिनिटागणिक ‘ब्रेकिंग न्यूज’ देणारी न्यूज चॅनल्स तेव्हा नव्हती. वर्तमानपत्रांचा खपही शहरांपुरताच होता. टेलिफोन व्यतिरिक्त संवादाचे कोणतही माध्यम नव्हते. तेदेखील मर्यादित. परिणामी, नौखालीच्या दंगलीची बातमी दिल्लीपर्यंत पोहोचायला पंधरा दिवस लागले!

या पंधरा दिवसात विशिष्ट समुदायाच्या घरांची राखरांगोळी झाली होती. नौखालीच्या बातमीने महात्मा गांधी अस्वस्थ झाले. त्यांनी नौखालीला जाण्याचा निर्णय घेतला. मात्र तिथली स्फोटक परिस्थिती पाहता बापूंनी आपला दौरा पुढे ढकलावा, अशी विनंती पंडित नेहरू आदी नेत्यांनी केली. मात्र गांधीजी ठाम राहिले. सरोजिनी नायडू, निर्मलकुमार बसू, सुशीला नायडू, जे. बी. कृपलानी अशा निवडक सहकाऱ्यांना सोबत घेऊन रेल्वेने दीड हजार किलोमीटर प्रवास करून गांधीजी बंगालमध्ये पोहोचले. जागोजागी धार्मिक दंगे पेटलेले होते. अनेक ठिकाणी बापूंना विरोध झाला. मात्र, जिवाची पर्वा न करता बापू नौखालीत पोहोचले. पदयात्रा, बैठका, सभा घेऊन त्यांनी नौखालीत शांतता प्रस्थापित केली. तब्बल चार महिने ते तिथे होते! गांधीजींच्या नौखाली दौऱ्याचे फलित काय तर फाळणीनंतर पूर्व पाकिस्तानात आणि आता बांगलादेशात असलेल्या नौखालीत हिंदू- मुस्लिम समुदायात एकही धार्मिक दंगल अथवा तणावाची घटना घडलेली नाही! एवढेच नव्हे, तर गांधीजींच्या कार्याने भारावून गेलेल्या बॅरिस्टर हेमंत कुमार घोष यांनी त्यांच्या मालकीची सुमारे अडीच हजार एकर जमीन बापूंनी स्थापन केलेल्या ट्रस्टला दान केली! आजही तिथे गांधी आश्रम आहे.

आज या घटनेची आठवण होण्याचे कारण म्हणजे, सध्याचे अस्वस्थ वातावरण. गेल्या तीन-चार दिवसात राज्यात ठिकठिकाणी घडलेल्या घटना पाहिल्या तर, कोणीतरी सामाजिक ऐक्याला नख लावण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करत असल्याचा संशय येतो. किरकोळ कारणांचे निमित्त करून जाळपोळ, दगडफेक केली जाते. पोलिसांना लक्ष्य बनविले जाते. धार्मिक तणाव निर्माण करून कोणाला राजकीय पोळी भाजायची असेल तर हा आगीशी खेळ त्यांच्या अंगाशी आल्याशिवाय राहाणार नाही. एखादी ठिणगी तुमच्याही घरावर येऊ शकते. कोणत्याही राष्ट्राची प्रगती सामाजिक शांततीशिवाय शक्य नसते. आधीच कोरोनामुळे उद्योगधंद्याचे कंबरडे मोडले. अनेकांचे रोजगार बुडाले. दोन वर्षांनंतर आता कुठे जनजीवन पूर्वपदावर येत असताना अशा घटनांमुळे निरपराध लोक हकनाक बळी पडतील. नवे उद्योग येणार नाही. गुंतवणुकीला खीळ बसेल. तरुणाईच्या भविष्यात आपण अंधार पेरत आहोत, याची जाणीव ठेवा.

समाजात शहाण्या माणसांचीच संख्या बहुसंख्य असते. मात्र, त्यांनी मौन बाळगल्यामुळे अडाण्यांचा हैदोस सुरू आहे. वाट चुकलेल्यांना कोणीतरी खडसावून सांगण्याची वेळ आलेली आहे. परंतु ज्यांच्याबद्दल आदर वाटावा अशा आदरणीय व्यक्तिमत्त्वांची उणीव असल्याने कोणालाच कुणाचा धाक उरलेला नाही. गांधी-नेहरूंबद्दल टिंगल करणे वेगळे आणि मानवतेसाठी त्यांनी केलेल्या कार्यातून प्रेरणा घेणे वेगळे. म्हणूनच, इलाही जमादार यांच्या गझलेतील ‘वाचलेली, ऐकलेली माणसे गेली कुठे?’ हा सवाल खूप महत्त्वाचा आहे.

आता तरी जागे व्हा! लोकशाहीत नागरी समाजाची भूमिका खूप महत्त्वाची असते. अधिकार, हक्क आणि स्वातंत्र्याबाबत जागृत असणाऱ्या प्रबुद्ध समाजाने समाजविघातक प्रवृत्तीवर अंकुश ठेवला पाहिजे. धर्म आणि राजकारणाची सरमिसळ करणाऱ्यांना सर्वोच्च न्यायसंस्थेने खडसावले आहेच. नागरी समाजातूनदेखील आवाज उठवला पाहिजे. कारण, प्रबुद्धांचा आवाज बुलंद झाल्याखेरीज द्वेषाच्या मशाली विझणार नाहीत. परंतु, दुर्दैवाने आज कधीकाळी हातात मेणबत्त्या घेऊन रस्त्यावर उतरणारी ‘सिव्हिल सोसायटी’च गायब आहे! समाजातील शहाणी माणसं मौनात गेल्याने, सामाजिक चळवळींनी अंग टाकल्याने धर्मांधाचा कलकलाट वाढला आहे. २१ व्या शतकातही कोणाला आपला धर्म संकटात आहे, असे कसे वाटू शकते? नक्कीच कोणीतरी अफू आणि अफवा पिकवित असावेत.

टॅग्स :SocialसामाजिकAurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारीPoliticsराजकारण