शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्रिपदाची शर्यत! अजित पवार निघाले शरद पवारांनीच मळलेल्या वाटेवर; दिल्लीत गाठीभेटी
2
भाजपच्या मंत्र्यानं अजान ऐकून थांबवलं भाषण; मंचावरूनच पठण केलं, ‘ला इलाहा इल्लल्लाह…’ 
3
अदानी समूहावर आरोप म्हणजे भारताचा विकासरथ रोखण्याचं षडयंत्र; महेश जेठमलानी बचावासाठी मैदानात
4
२८ चेंडूत १०० धावा! IPL मधील Unsold गड्यानं फास्टर सेंच्युरीसह मोडला रिषभ पंतचा रेकॉर्ड
5
‘इस्कॉन कट्टरतावादी संघटना’, बांगलादेशमधील युनूस सरकारकडून बंदी घालण्याची तयारी  
6
"बाळा, मीच तुझी मम्मा..."; मेकअप केलेल्या आईला ओळखू शकला नाही लेक, ढसाढसा रडला
7
भाजपाने जे ठाकरेंसोबत केले, तसेच आता शिंदेंशी वागतायत का? शिंदे गटाचे नेते म्हणाले...
8
धक्कादायक! महाराष्ट्रातील 'या' मतदारसंघात एका बूथवरील मतमोजणी झालीच नाही
9
एकनाथ शिंदे यांची दुपारी ३ वाजता पत्रकार परिषद, मोठा निर्णय जाहीर करणार? 
10
लग्नाचं आमिष दाखवून केलं शोषण, 'पुष्पा 2'मधील अभिनेत्याविरोधात FIR दाखल
11
'बांगलादेशच्या स्वातंत्र्याला धोका...', चिन्मय दास यांच्या अटकेनंतर भारताची तीव्र प्रतिक्रिया; बांगलादेश म्हणाला...
12
मुख्यमंत्री कोण होणार? लवकरच उत्तर मिळेल; देवेंद्र फडणवीसांचे सूचक वक्तव्य
13
काय आहे 'वन नेशन, वन सबस्क्रिप्शन' योजना, कोणाला होणार फायदा?
14
IPL Auction 2025: धडामsss ! मॅक्सवेल ते स्टार्क… ‘या’ ५ बड्या खेळाडूंचा भाव ‘धाडकन्’ कोसळला..!!
15
Enviro Infra Engineers IPO Allotment : एन्व्हायरो इन्फ्रा IPO चं अलॉटमेंट झालीये का? कसं चेक कराल, जाणून घ्या 
16
IRCTC ची ब्लॅक फ्रायडे ऑफर, स्वस्तात मिळेल फ्लाइट तिकीट आणि 'ही' सुविधा...
17
६ बहिणींचं लग्न, ४ भावांचं शिक्षण; अपघातात मृत्यू झालेल्या डॉक्टरची डोळे पाणावणारी गोष्ट
18
'सर्वात मोठा पक्ष कोणताही असेल, मुख्यमंत्री तुम्हीच होणार'; निवडणुकीपूर्वी भाजपाने शिंदे शिवसेनेला शब्द दिलेला?
19
फडणवीसांसारखीच झाली एकनाथ शिंदेंची अवस्था?; २०२२ च्या घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता
20
"...म्हणून भाजपाचा मुख्यमंत्री होण्यासाठी एकनाथ शिंदेंनी रस्ता मोकळा करावा"

Independence Day 2021 : राजे आपण आहात, म्हणून लोकशाही सुरक्षित

By वसंत भोसले | Published: August 15, 2021 9:27 AM

Celebrating Happy Independence Day 2021: भारताने पावणे तीन वर्षांच्या अथक अभ्यासू, विचारमंथन आणि भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सर्वसमावेशक विचारधारेच्या जोरावर २६ जानेवारी १९५० रोजी राज्यघटना स्वीकारली.

- वसंत भोसले

भारतीय मतदारांनी नेहमी देशाची अखंडता, कणखर नेतृत्व आदींची पाठराखण केली. २५ जून १९७५ रोजी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आणीबाणी लागू करताच प्रचंड मोठ्या प्रमाणात जनआंदोलन उभे राहिले. त्याच्या रेट्यामुळे इंदिराजींना आणीबाणी मागे घेऊन निवडणुका जाहीर कराव्या लागल्या. मार्च १९७७ मध्ये झालेल्या या निवडणुकीत मतदारांनी इंदिरा गांधी यांच्यासह काँग्रेसचा पराभव केला आणि जनता पक्षाचे सरकार सत्तेवर आले. सरकारातील मतभेदांमुळे केवळ पावणे तीन वर्षांत देशात प्रथमच मध्यावधी निवडणुका झाल्या आणि इंदिरा गांधी, तसेच काँग्रेसला नाकारणाऱ्या मतदारांनीच त्यांना पुन्हा सत्तेवर बसविले. मतदारांनी केंद्रात बहुमतासह सरकार स्थापन करून सद‌्सद‌्विवेकबुद्धीचा पुरेपूर प्रत्यय दाखविला. भारतीय जनता मोठ्या प्रमाणात अशिक्षित आणि अर्धपोटी असली तरी तिने देशाच्या राष्ट्रहितासाठी जागृतपणे मतदान करून भारतीय लोकशाहीला बळकट केले आहे. १९७७ ते १९८० च्या दरम्यानचा हा मतदारांनी घडविलेला हा चमत्कार म्हणजे त्यांचा जाणतेपणा, परिपक्वपणा होता.

भारताने पावणे तीन वर्षांच्या अथक अभ्यासू, विचारमंथन आणि भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सर्वसमावेशक विचारधारेच्या जोरावर २६ जानेवारी १९५० रोजी राज्यघटना स्वीकारली. राज्यघटनेतील तरतुदीनुसार लोकांनी निवडलेल्या प्रतिनिधींमधून आकाराला आलेल्या लोकसभागृहातून सरकार स्थापन करण्याची रचना निश्चित झाली. या राज्यघटनेचा अंमल सुरू झाल्याने डिसेंबर १९५१ ते मार्च १९५२ दरम्यान साडेतीन महिन्यांत लोकसभेची पहिली निवडणूक झाली. लोकसभेच्या आजवर झालेल्या १७ निवडणुकांपैकी चार मुदतपूर्व झाल्या. पहिल्या निवडणुकीत १० कोटी मतदार होते. २०१९च्या निवडणुकीत ९१ कोटी २० लाख ५० हजार ५७८ मतदार होते. 

७ निवडणुकांमध्ये एकाही पक्षाला बहुमत मिळाले नाही आणि आघाड्यांचे सरकार स्थापन झाले. त्यापैकी काँग्रेसने तीन, जनता दलाने दोन, तर भाजपने दोनवेळा आघाडी सरकार स्थापन केले.

आतापर्यंत १७ निवडणुका १० वेळा भारतीय मतदारांनी एका पक्षाला बहुमताने निवडून दिले. 

एकाच पक्षाला बहुमत कितीवेळा७ वेळा काँग्रेस१ वेळा जनता पक्ष२ वेळा भाजप 

टॅग्स :Independence Dayस्वातंत्र्य दिन