शहरं
Join us  
Trending Stories
1
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
2
भाजपचे नियोजन 'King', मायक्रो प्लानिंगच्या जोरावर पक्षाला मिळवून दिला सर्वात मोठा विजय
3
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
4
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
5
कोण आहे Priyansh Arya? ज्याच्यासाठी प्रिती झिंटानं ३० लाख ऐवजी पर्समधून काढले ३.८० कोटी
6
निकालापूर्वी राजकीय संन्यास जाहीर केला, भाजपाला मोठे यश मिळताच निर्णय बदलला; नेते म्हणाले...
7
“मविआत आमचे संख्याबळ जास्त, मला विरोधी पक्षनेता व्हायला नक्कीच आवडेल”: भास्कर जाधव
8
IPL Auction 2025 : एका डावात १० विकेट्स घेणाऱ्या MI च्या गोलंदाजाला CSK नं केलं 'करोडपती'  
9
मतमोजणीच्या आकडेवारीत घोळ? व्हायरल पोस्टचे सत्य समोर, निवडणूक अधिकारी म्हणाले...
10
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
11
“आमचे आमदार फुटणार नाहीत, ताकदीने लढणार”; ठाकरे गटाला ठाम विश्वास, शिंदे गटाला सुनावले
12
IPL Auction 2025: MS Dhoni चा 'भिडू' Mumbai Indians ने पळवला; दीपक चहरसाठी मोजले किती कोटी? जाणून घ्या
13
मी ही निवडणूक मोठ्या मताधिक्याने कसा जिंकलो..? जितेंद्र आव्हाडांनी सांगितला १ ऑगस्टपासूनचा EVM चा घटनाक्रम
14
IPL Auction 2025: भुवीसाठी MI अन् LSG यांच्यात 'बोली युद्ध'; होऊ दे खर्च म्हणत शेवटी RCB नं मारली बाजी
15
फडणवीस मुख्यमंत्री झाले तर भाजपकडे शिंदेंसाठी प्लॅन 'B'? ठरू शकतो असा फॉर्म्युला 
16
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सला इशान किशनचा पर्याय सापडला! कोण आहे त्याची जागा घेणारा रायन रिकल्टन?
17
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
18
"चांगल्या घरातल्या मुली...", मनिषा कोईरालाच्या पदार्पणावर विचारले गेले होते प्रश्न; म्हणाली...
19
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
20
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?

Independence Day: गतवैभव पुन्हा मिळविण्याची भारतात उदंड क्षमता

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2020 5:39 AM

आज एका सार्वभौम व सळसळत्या लोकशाही देशाचे नागरिक म्हणून आपण जी फळे स्वाभिमानाने चाखत आहोत त्याच्यामागे असंख्य लोकांचे नि:स्वार्थ व अपार कष्ट आहेत, याची जाणीव आपण सदैव ठेवायला हवी.

- एम. व्यंकय्या नायडू, उपराष्ट्रपतीआज आपण भारताचा ७४ वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहोत. १५ ऑगस्ट १९४७ रोजी नियतीशी झुंज देऊन भारत स्वतंत्र झाला आणि सततची परकीय आक्रमणे व वसाहतवादी जोखडातून मुक्त होऊन देश मुक्ततेच्या स्वच्छ सूर्यप्रकाशात न्हाऊन निघाला; तेव्हापासून लोकांना उज्ज्वल भवितव्य मिळावे आपण नव्या निर्धाराने आणि ठाम निश्चयाने देशाच्या पुनर्निर्माणाच्या कामाला जुंपून घेतले आहे.ब्रिटिश राजवट येण्याआधी भारत जगातील सर्वांत श्रीमंत देशांमधील एक देश होता. वस्त्रोद्योग, पोलाद उत्पादन व जहाज बांधणीसह अनेक क्षेत्रांत भारत जगात आघाडीवर होता. त्यावेळी जागतिक व्यापारात भारताचा हिस्सा २७ टक्के होता. अनेक प्रकांड पंडित, साहित्यिक, नाटककार, कलावंत, कवी आणि विद्वानांचे भारत माहेरघर होता. कमालीचे कसबी हस्तशिल्पकार व विणकर ही भारताची शान होती. परंतु ब्रिटिशांनी भारतातील कापूस ब्रिटनला निर्यात करून आणि त्याबदल्यात भारताची बाजारपेठ यंत्रमागांवर तयार केलेल्या कापडाने भरून टाकून भारतातील भरभराटीच्या वस्त्रोद्योगास मरणासन्न अवस्था आणली.वसाहतवादी मनोवृत्तीचा त्याग करणे ही आताच्या काळाची गरज आहे. ज्या देशावर राज्य करायचे तेथील शिक्षण व्यवस्था, संस्कृती व त्यासोबत लोकांच्या आत्मसन्मानाचे खच्चीकरण करणे हे वसाहतवाद्यांचे प्रमुख उद्दिष्ट होते, हे आपण लक्षात घ्यायला हवे. भारताला आज सांस्कृतिक पुनरूथ्थानाची व सर्व देशी भाषांना सन्मानाने ऊर्जितावस्थेत आणण्याची गरज आहे. ब्रिटिशांनी आपल्यामध्ये फूट पाडूनच राज्य केलेले असल्याने आता पुन्हा समाजात जात, भाषा, धर्म अथवा प्रदेशांच्या नावे फूट पडणार नाही याविषयी आपण सदैव जागरूक राहायला हवे.

भारताला आर्थिकदृष्ट्या कंगाल, सामाजिकदृष्ट्या घायाळ व राष्ट्रीय ऐक्याच्या दृष्टीने पांगळे करून मगच ब्रिटिशांनी येथून काढता पाय घेतला. पण डॉ. बाबासाहेब आंबेडकर व सरदार वल्लभभाई पटेलांसारख्या नेत्यांच्या सुजाण शहाणपणामुळे आपसांत लढणाऱ्या शेकडो संस्थांनांना शांततेने नव्या देशात सामील करून घेऊन आपण भक्कम, सळसळत्या व स्थिर लोकशाहीचा मजबूत पाया रचू शकलो. कमालीची विविधता असूनही एकतेच्या सूत्राने घट्ट बांधलेले ‘स्वतंत्र राष्ट्र’ म्हणून भारताचा पुनर्जन्म झाला. तेव्हापासून भारताची सातत्याने प्रगती सुरू आहे.नव्या निर्धाराने व १३० कोटी जनतेच्या चैतन्यमयी ऊर्जेच्या मदतीने नवभारताच्या उभारणीच्या दिशेने आपली वाटचाल सुरू असून आपण गतवैभव पुन्हा प्राप्त करून एक आदर्श संसदीय लोकशाही व्यवस्थेचा देश म्हणून जगात ताठमानेने जगात उभे राहील, याची मला पक्की खात्री आहे. भारताला विकास व प्रगतीची उत्तुंग उंची गाठायची असेल तर सार्वजनिक जीवनातील लोकांसह जीवनाच्या सर्व क्षेत्रांतील प्रत्येक व्यक्तीला आपले कर्तव्य चोख पार पाडावे लागेल.गेल्या पाच वर्षांत आपण देशातील पायाभूत सुविधांमध्ये वेगाने सुधारणा केली असून सामाजिक सुरक्षा कवच अधिक मजबूत केले आहे. आज भारतात एकही गाव विजेविना नाही आणि संपूर्ण देश हागणदारीमुक्त झाला आहे. करप्रणालीमध्ये आमूलाग्र परिवर्तन आणणारा ‘जीएसटी’ लागू करण्यासह अनेक मूलभूत सुधारणा करून आपण अर्थव्यवस्थेची पुनर्रचना केली आहे. त्याच्याच जोडीला पारदर्शकतेला प्रोत्साहन देणारी, अधिकारशाहीचा स्वेच्छाधिकार संपुष्टात आणणारी व प्रामाणिक करदात्यांचा गौरव करणारी नवी करप्रणालीही सरकारने दोनच दिवसांपूर्वी सुरू केली आहे. 

२०२२ मध्ये येणाºया स्वातंत्र्याच्या हीरकमहोत्सवाकडे वाटचाल करत असताना ही वेळ वस्तुनिष्ठ आत्मचिंतन करण्याची आहे. २०२२ पर्यंत आपल्याला भारत कसा असायला हवा, याचा विचार प्रत्येकाने करायची गरज आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेली ‘संकल्प से सिद्धी’ ही हाक स्वातंत्र्याच्या हीरकमहोत्सवापर्यंत नव्या भारतात आमूलाग्र परिवर्तन घडवून आणण्यासाठीच आहे. २०२२ पर्यंत देशात एकही नागरिक निवाºयाविना असू नये. प्रत्येकाला शिक्षण, रोजगार, आरोग्य सेवा, स्वच्छ पाणी व सकस अन्न व उत्तम सार्वजनिक स्वच्छता व्यवस्थेची सोय उपलब्ध असावी, हे त्यात अभिप्रेत आहे. तोपर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचा संकल्प आपण सोडला आहे. दिव्यांग, महिला, वृद्ध आणि तृतीयपंथी व्यक्तींसह समाजातील तळागाळांतील लोकांनाही सुखी, सुरक्षित व समाधानी जीवन जगण्याची परिस्थिती आपल्याला निर्माण करायची आहे. त्यामुळे भावी वाटचालीत ‘अंत्योदय’ व ‘सर्वोदय’ हे आपले परवलीचे शब्द असायला हवेत. २०२२ पर्यंत भारत सर्वार्थाने आत्मनिर्भर व्हायलाच हवा, ही आपली मनापासूनची आस असायला हवी.ज्या अगणित स्त्री-पुरुषांच्या अतुलनीय त्यागाने आपल्याला स्वातंत्र्य मिळाले त्यांचे कृतज्ञतेने स्मरण करणे हेही स्वातंत्र्यदिनी आपले कर्तव्य ठरते. आज एका सार्वभौम व सळसळत्या लोकशाही देशाचे नागरिक म्हणून आपण जी फळे स्वाभिमानाने चाखत आहोत त्याच्यामागे असंख्य लोकांचे नि:स्वार्थ व अपार कष्ट आहेत, याची जाणीव आपण सदैव ठेवायला हवी.
स्वातंत्र्यचळवळीत नेहमी चर्चेत राहिलेल्या मोठ्या नेत्यांखेरीज प्रत्येक राज्यांतील अनेक नेत्यांनीही ब्रिटिशांना ‘सळो की पळो’ करून सोडले होते. स्वातंत्र्यदिनी प्रमुख राष्ट्रीय नेत्यांचे गुणगान होणे स्वाभाविक असले तरी आज विस्मृतीत गेलेल्या स्वातंत्र्यवीरांनाही आपण त्यांच्या कार्याची पोहोचपावती विनम्रतेने द्यायला हवी. हे सर्व पडद्यांमागील लोक वाटत असले तरी त्या काळी त्या-त्या प्रदेशांमध्ये त्यांचा मोठा प्रभाव होता. त्यामुळे त्यांना केवळ त्यांच्या प्रदेशांपुरते मर्यादित न ठेवता त्यांच्या शौर्याची व त्यागाची गाथा देशातील प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचवायला हवी. खरंतर त्यांचीही गणना राष्ट्रनेत्यांमध्येच व्हायला हवी.अशा लोकांमध्ये मी त्यांचा आवर्जून उल्लेख करेन : अल्लुरी सीताराम राजू, चिन्नास्वामी सुब्रह्मण्य भरतियार, मातंगिनी हाजरा, बेगम हजरत महल, पांडुरंग महादेव बापट ऊर्फ सेनापती बापट, पोेट्टी श्रीमालू, अरुणा असफ अली, गरिमेला सत्यनारायण, लक्ष्मी कनकलता बारूआ, कन्नेगंती हनुमंतु, हुतात्मा खुदीराम बोस, वेलू नचियार ‘वीरमंगाई’, कित्तूर चनम्मा, वीरपांडिया कट्टाबोम्मन, व्ही. ओ. चिदम्बर पिल्लई, सुब्रह्मण्य शिवा, सूर्य सेन, अश्फाफ उल्ला खान. बटुकेश्वर दत्त, पिंगली व्यंकय्या, दुर्गाबाई देशमुख, अरबिंदो घोष आणि मॅडम भिकाजी कामा. ‘लॉकडाऊन’च्या काळात मिळालेल्या भरपूर मोकळ्या वेळेत मी अनेक पुस्तके वाचून या महान व्यक्तींच्या जीवनाची जवळून ओळख करून घेतली. स्वातंत्र्यदिनी या सर्वांना माझी श्रद्धापूर्वक आदरांजली.

टॅग्स :Independence Dayस्वातंत्र्य दिन