शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर मला फासावर लटकवा, जयच्या मृत्यूचं राजकारण करू नका; अमोल मिटकरींचं मोठं विधान
2
मनसे कार्यकर्ता जय मालोकर मृत्यू प्रकरणी वेगळं वळण; हृदयविकारानं मृत्यू नाही, तर...
3
‘एक देश, एक निवडणूक’ला मंजुरी; कोविंद समितीच्या शिफारशीनुसार प्रस्तावावर मंत्रिमंडळाची माेहाेर
4
US Fedral Reserve नं कमी केले व्याजदर, शेअर बाजारात दिसू शकते तेजी; आणखी काय परिणाम होणार
5
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक देवाण-घेवाण करू नका!
6
ईदला लाउडस्पीकर लावणे हानिकारक : हायकाेर्ट, न्यायालयाने याचिका निकाली काढली
7
महिला मुख्यमंत्रीवरुन राजकीय चर्चा जोरात; वर्षा गायकवाड यांच्या विधानानंतर मविआत वेगवेगळी मते
8
पुतिन यांना सिक्रेट गर्लफ्रेंडपासून दोन मुलं ! गर्लफ्रेंड एलिना कबेवा आंतरराष्ट्रीय दर्जाची रिदमिक जिम्नॅस्ट
9
दिल्लीच्या नव्या हेडमिस्ट्रेस, दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान होणाऱ्या तिसऱ्या महिला
10
श्रीमंतांचा मोठा दबदबा, ५ वर्षांत विक्रमी कमाई; वर्षाला १० कोटी कमावणाऱ्यांची संख्या ३१,८०० वर
11
राहुल गांधींच्या जिभेला चटके द्या; भाजप खासदार अनिल बोंडेंचे वक्तव्य, फौजदारी गुन्हा दाखल
12
कामात समाधान नसल्यास दोन वर्षांत सोडणार नोकरी; ४७% तरुण नोकरी सोडण्याच्या तयारीत
13
गडकरी दिल्लीत सगळ्यांना आवडतात; ते का?
14
आतिशी शनिवारी घेणार मुख्यमंत्रिपदाची शपथ ? केजरीवालांचा राजीनामा राष्ट्रपतींकडे पाठवला
15
आतापासूनच करा मुलांच्या पेन्शनची सोय; ‘एनपीएस वात्सल्य’ योजनेला सुरुवात
16
महामुंबईत गणरायाला भावपूर्ण निरोप, पुढच्या वर्षी लवकर येण्याची भक्तांची गळ
17
मुंबई विमानतळावर एक कोटीचे सोने जप्त; पाच विमानतळ कर्मचाऱ्यांना अटक
18
मुंबई-पुणे ‘एक्सप्रेस वे’वर वाटमारी, पाच अटकेत; तीन फरार; पनवेल पोलिसांची कारवाई
19
नवी मुंबईतील १२ हजार कोटींच्या सेमी कंडक्टर प्रकल्पाचे उद्घाटन, उद्योजकांना त्रास दिल्यास तुरुंगात टाकू : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
20
रेल्वे अधिकाऱ्याची नऊ लाखांची फसवणूक; गैरव्यवहारात अटक करण्याची भीती दाखवून फसवले

भारताला शांततेच्या चर्चेत गुंतवून कारगिल गिळंकृत करण्याचा 'तो' डाव होता

By ऑनलाइन लोकमत | Published: September 09, 2024 7:03 AM

अणुचाचणी केल्यानंतरच्या तणावाच्या वातावरणात अटल बिहारी वाजपेयी आणि नवाझ शरीफ या दोन्ही पंतप्रधानांनी त्यावेळी केलेल्या शांततेच्या प्रयत्नांना पाक लष्कराने सुनियोजितपणे नख लावले. ही कबुली अधिक महत्वाची आहे. 

पाकिस्तानचे लष्करप्रमुख अनरल अभीम मुनीर यांनी रावळपिंडीत देशाच्या संरक्षण दिनानिमित आयोजित समारंभात बोलताना जणू काही मोठा गौप्यस्फोट करत असल्याच्या वेशात जे सांगितले की, १९९९ व्या कारगिल युद्धात पाकिस्तानचे सैनिकच सहभागी होते हे मुळात गुपित नव्हतेच आणि नाहीदेखील. पंचवीस वर्षापूर्वीचे पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ, पुढे सत्ता ताब्यात घेणारे तत्कालीन लष्करप्रमुख परवेझ मुशर्रफ व निवृत लेफ्टनंट जनरल शाहीद अजीज यांनी अशी कबुली वारंवार दिली आहे खरी. परंतु, लष्करप्रमुख पदावर असताना असा कबूलनामा देणारे असीम मुनीर हे पहिलेच. 

पाकिस्तानमध्ये लोकनियुक्त प्रतिनिधी व लष्करी अधिकारी यांच्यात कमालीची सतास्पर्धा चालते. लष्कर शक्यतो सरकार टिकू देत नाही आणि शांततेचे प्रयत्न लष्कराकडून उधळले जातात. तिथे अनेकवेळा लष्करानेच लोकनियुक्त सरकार पाडल्याची, अध्यक्ष किंवा पंतप्रधानांना पदच्युत केल्याची, तुरुंगात टाकल्याची, खटले चालवून फासावर लटकवल्याची अनेक उदाहरणे आहेत. या पृष्ठभूमीवर, मुनीर यांच्या या कबुलीची दखल ठळकपणे घ्यायला हवी, भविष्यात पाकिस्तानने पुन्हा कधी शांततेचा आव आणला तर ही कबुली त्यांच्या लोहावर मारता येईल, हा यातील दुसरा मुद्दा, जनरल मुनीर यांनी त्यांच्या सैन्याच्या पंचाहत्तर वर्षामधील कामगिरीचा आढाला घेताना खालमानेने आणखी एक कबुली दिलीय की, १९४८ मधील टोळीवाल्यांची घुसखोरी, १९६५ मधील युद्ध १९७१ था बांगलादेश मुक्तिसंग्राम आणि १९१९ चे कारगिल युद्ध या चारही प्रसंगामध्ये शेकडो पाक सैनिकांचे जीव गेले.  यात काही नवे नसले तरी इतके सैनिक मारले जाऊनदेखील घुसखोरीपासून भारतातील दहशतवादी कारवायांपर्यंत सारे काही करण्याची खुमखुमी अजून कशी कायम आहे? हा प्रश्न पडावा. अर्थात ही केवळ कारगिलपुरती कबुली नाही. भारत व पाकिस्तान या दोन्ही देशांनी अणुचाचणी केल्यानंतरच्या तणावाच्या वातावरणात अटल बिहारी वाजपेयी आणि नवाझ शरीफ या दोन्ही पंतप्रधानांनी त्यावेळी केलेल्या शांततेच्या प्रयत्नांना पाक लष्कराने सुनियोजितपणे नख लावले. ही कबुली अधिक महत्वाची आहे. 

१९९९ सालचा पूर्वार्ध आठवा, विशेषतः फेब्रुवारीमध्ये अमृतसर ते लाहोर बससेवा सुरु होत होती. त्या बसने खुद्द भारताचे पंतप्रधान लाहोरला पोहोचले होते. वाघा सीमेवर त्यांच्या स्वागताला पाकिस्तानचे पंतप्रधान आले होते. होते. दोन्ही देशांत लाहोर समझोत्यावर सह्या होत होत्या आणि या सगळ्या पुढाकारामुळे एकूण दक्षिण आशियात शांततेची मुक झुळुक वाहू लागलेली असतानाच पाक सैनिक गिलगिट-बाल्टिस्तानला लागून असलेल्या लडाखच्या दुर्गम भागात घुसखोरांचे कातडे पांगरून भारतीय चौक्यांवर कब्जा करत होते. लाहोरच्या गव्हर्नर हाऊसवर जनरल परवेहर मुशर्रफ यांनी आढ्यात दाखवली, वाजपेयींना सलामी दिली नाही, उलट दुसऱ्याच दिवशी ते पाकव्याप्त काश्मीरच्या दौऱ्यावर गेले. जणू शरीफ आणि वाजपेयी यांचे शांततेचे प्रयत्न उधळून लावण्याची पुरेशी तयारी झाली की नाही, हे पाहायला मुशर्रफ तिकडे गेले होते. 

असीम मुनीर यांनी त्या तयारीचे तपशील सांगितले असते तर तो खऱ्या अर्थाने गौप्यस्फोट झाला असता. कारण, कारगिल, द्वास, काकसर किंवा मुशकोह भागातील घुसखोरी हा शेजारी देशांवर कधीही आक्रमण न करणान्या भारताला, खास करून कवी मनाच्या वाजपेयींना मोठा धक्का होता. भारताला शांततेच्या चर्चेत गुंतवून कारगिल गिळंकृत करण्याचा तो डाव होता. ती घुसखोरी महिना-दोन महिन्यानंटर कळाली एवढीच काय ती भारताची चूक. त्या चुकीमुळे भारतीय सैन्यदलाचे ऑपरेशन विजय तसेच वायूसेनेचे ऑपरेशन सफेद सागर' यात जवळपास साडेपाचशे भारतीय जवानांना हौतात्म्य प्राप्त झाले. युद्धादरम्यान घुसखोरांचे गणवेश, त्यांनी वापरलेली शहरे, मृतदेहांसोबत सापडलेले पगार जमा झाल्याचे दाखविणारे पाक पेबुक, असे अनेक पुराने भारताच्या हाती होते. त्याआधारे भारत है सतत जगाला सांगत होता की, घुसखोरी व रक्तपाताची ही आगळीक मुजाहिदीनांची नव्हे तर पाक सैन्याचीच आहे. पाकिस्तान है सतत नाकारत आला. अनेक सैनिकांचे मृतदेहदेखील स्वीकारले नाहीत. जे स्वीकारले से लपूनछपून, पाकिस्तानने ते नाकारले असले तरी जगाला सत्य कळले होते. म्हणूनच अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष बिल क्लिंटन यांनी नवाझ शरीफ यांचे कान पिरगाळले आणि तीन महिन्यांच्या युद्धानंतर जुलै १९९९ च्या शेवटी पाकिस्तानने पूर्ण माघार घेतली. ऑपरेशन विजय यशस्वी झाले. असीम मुनीर यांच्या कबुलनाम्याने या घटनाक्रमाला उजाळा मिळाला आहे. कुरापतखोर पाकिस्तानचा बुरखा फाटला गेला आहे.

टॅग्स :IndiaभारतPakistanपाकिस्तान