शहरं
Join us  
Trending Stories
1
'काँग्रेसचा खरा चेहरा समोर आला', मल्लिकार्जुन खर्गेंच्या 'त्या' वक्तव्यावर PM मोदींचा घणाघात
2
अंधेरी पूर्वेत पंधरा ते वीस दुकानांना भीषण आग;कामगार अडकल्याची भीती, अग्निशमनच्या गाड्या दाखल
3
जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा टार्गेट किलींग; 2 बिगर कश्मिरी मजुरांवर दहशतवाद्यांचा गोळीबार
4
पाकिस्तानचे अध्यक्ष आसिफ अली झरदारी यांच्या पायाला दुखापत, दुबईत विमानातून उतरताना अपघात झाला
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: काटेवाडीत पाडवा का साजरा करणार? अजित पवारांनी कारणच सांगितलं, म्हणाले...
6
कॅनडामध्ये सुपरलॅबचा भंडाफोड, मोठ्या प्रमाणात ड्रग्ज आणि शस्त्रे जप्त, भारतीय वंशाच्या व्यक्तीला अटक
7
३०० कंटेनरचे सामूदायिक लक्ष्मीपूजन; सांगवीच्या तरुणांकडे ४५० कंटेनरची मालकी
8
"बाळासाहेब असते तर थोबाड फोडलं असतं"; अरविंद सावंतांच्या वक्तव्यावर CM शिंदेंची प्रतिक्रिया
9
ऐन दिवाळीत मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी दोन्ही पवारांची धावाधाव
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : सांगली विधानसभेत महाविकास आघाडीला धक्का! जयश्री पाटील निवडणूक लढवण्यावर ठाम
11
Maharashtra Election 2024: नाशिक पूर्वमध्ये थेट सामना; अन्य तीन मतदारसंघात तिरंगी, चौरंगी लढत
12
Muhurat Trading : मुहूर्त ट्रेडिंगनंतर तेजीसह बाजार बंद, 'या' १० शेअर्समध्ये जोरदार खरेदी, गुंतवणूकदारांनी कमावले ४ लाख कोटी
13
Mumbai Crime: फटाके फोडण्याच्या वादातून तरुणाची हत्या, मुंबईतील धक्कादायक घटना
14
जरांगेंच्या यादीला ओबीसींची यादी तयार, जो तो उठतोय त्यांनाच भेटायला जातोय; लक्ष्मण हाकेंनी रणशिंग फुंकले
15
किंग कोहलीची 'विराट' चूक; मैदानात थांबण्यापेक्षा चोरटी धाव घेण्याच्या नादात फसला (VIDEO)
16
पोस्टर'वार'! योगी आदित्यनाथ यांच्या 'बटेंगे तो कटेंगे'ला अखिलेश यादवांकडून पलटवार
17
भीषण! पाकिस्तानमध्ये मोठा बॉम्बस्फोट; ५ शाळकरी मुलं आणि एका पोलिसासह ७ जणांचा मृत्यू
18
'लॉरेन्स बिश्नोईने मला लवकर मारावे...', खासदार पप्पू यादव असं का म्हणाले?
19
IND vs NZ, 3rd Test Day 1 Stumps : फलंदाजांमुळे टीम इंडिया अडचणीत; ८६ धावांत गमावल्या ४ विकेट्स
20
"चुकीची चिठ्ठी काढणारा पोपट, आजपर्यंत...!"; शंभूराज देसाई यांचा संजय राऊतांना टोला

India vs Australia, 2nd Test : मैदान मारण्याची जिद्द

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2020 11:55 PM

कर्णधार म्हणूनही चांगले निर्णय घेतले व ऐतिहासिक विजय नोंदविला.

‘पुन्हा उसळणार’ म्हणत भारतीय क्रिकेट संघाने मंगळवारी मेलबर्न कसोटीत बलाढ्य ऑस्ट्रेलियाचा आठ गडी राखून पराभव केला आणि ‘नववर्षाचा संकल्प-अजिंक्य राहणे’, असे वाक्य सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्याला संदर्भ होता, आठच दिवसांपूर्वी मानहानीजनक पराभव स्वीकारलेल्या भारतीय संघाचे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत नेतृत्व करून उसळी मारणाऱ्या मराठमोळ्या अजिंक्य रहाणेच्या लढाऊ बाण्याचा. तसाही परदेशातील क्रिकेट विजय आनंददायी असतो.

ऑस्ट्रेलियासारख्या तगड्या संघाचा पराभव म्हणजे तर साक्षात दिवाळीच. हा विजय ऐतिहासिक आहे. ॲडलेडमध्ये भारताचा दारुण पराभव झाला. ४६ वर्षांपूर्वीचा ४२ धावांचा नीचांक मोडून ३६ची नवी नामुष्की नोंदली गेली. त्यामुळे आता ऑस्ट्रेलिया भारताला चार-शून्य असा ‘व्हॉइटवॉश’ देणार, अशी मुक्ताफळे दिग्गजांनी उधळली. भरीस भर म्हणजे कर्णधार विराट कोहली पितृत्वाची जबाबदारी पार पाडण्यासाठी भारतात परतला. राेहित शर्मा वाटेवरच आहे.

मोहम्मद शमी  खेळू शकला नाही. ईशांत शर्मा नाही. फलंदाजी व गोलंदाजी अशी लंगडी असताना शुभमन गिल, मोहम्मद सिराज अशा पदार्पण करणाऱ्या नवख्यांसोबत मेलबर्नचा किल्ला अजिंक्यने नुसताच लढवला नाही तर जिंकलाही. पहिल्या डावात झुंजार शतक, दुसऱ्या डावात विजयासाठी जेमतेम ७० धावांची गरज असताना अधिक पडझड होऊ न देता खेळपट्टीवर उभे राहण्याची अजिंक्यने दाखवलेली जिद्द, संयम केवळ वाखाणण्याजोगाच. या अजरामर खेळीने त्याचे नाव क्रिकेट इतिहासात सोनेरी अक्षरांनी नोंदले जाईल.  फार देखावा न करता, ‘स्टाइल आयकॉन’ बनण्याचा मोह दूर सारून, ‘स्लेजिंग’ नावाच्या संतापाला आवर घालून, खाली मान घालून खेळावर लक्ष केंद्रित केले तरी ऐतिहासिक कामगिरी करता येते, हे अजिंक्यने दाखवून दिले. झालेच तर मुंबईच्या जिमखान्यांवर किंवा वानखेडे, ब्रेबॉर्नवर ज्याला खडूस म्हणतात अशा जुन्या शैलीत त्याने चिवट फलंदाजी केली.

कर्णधार म्हणूनही चांगले निर्णय घेतले व ऐतिहासिक विजय नोंदविला. मैदानावरील कर्तृत्वापेक्षाही मैदानाबाहेरील शो-शा मध्ये मशगूल  राहण्याचे आणि खेळापेक्षाही अन्य कारणांनी चमकत राहण्याचे वेड खेळाडूंना लावलेल्या या काळात ‘ओल्ड स्कूल’ म्हणून एरवी काहीशी हिणवली गेलेली रीत हाच अंतिम विजयाचा शाश्वत रस्ता असतो, हेही यानिमित्ताने सिद्ध झाले, ते उत्तमच ! भारतीय विजयाच्या दुधात साखर म्हणजे मेलबर्न कसोटीत विजय भारताच्या दृष्टिपथात असताना आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनेने सोमवारी दशकातील सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू म्हणून विराट कोहली, तर खिलाडूवृत्तीसाठी महेंद्रसिंह धोनीची निवड जाहीर केली.

उद्या संपणारे एकविसाव्या शतकातील दुसरे दशक खरेच विराट कोहलीचे आहे. कसोटी, वनडे व टी-२० अशा क्रिकेटच्या सगळ्या प्रकारात त्याचा डंका जगभर गाजतो आहे. नऊ वर्षांपूर्वी इंग्लंडमध्ये इयान बेलला पंचांनी बाद दिले असूनही तो नाबाद असल्याचे माहीत असल्याने त्याला परत बोलावून खेळायला लावण्याची दुर्मीळ कृती ‘कॅप्टन कूल’ धोनीने केली होती. सामना म्हणजे एक युद्ध असल्याच्या आविर्भावात जगातले बहुतेक सगळे संघ व त्यातील खेळाडू खेळत असताना हे ‘स्पोर्ट्समॅन स्पिरीट’ खरेच अपवादात्मक आहे. कोरोना महामारीमुळे सगळीकडे निराशेचे मळभ दाटलेले असताना या दु:स्वप्नवजा वर्षाची अखेर क्रिकेटच्या मैदानावर अशी आनंददायी होत असतानाच महाराष्ट्र सरकारने सोमवारी अन्य खेळांबद्दलही कौतुकास्पद पाऊल उचलले.

कोरोना महामारीमुळे गेल्या ऑगस्टमध्ये टोकिओ येथे ऑलिम्पिक स्पर्धा होऊ शकल्या नाहीत. त्यासाठी पात्र ठरलेल्या महाराष्ट्रातील राही सरनोबत, तेजस्विनी सावंत, प्रवीण जाधव, अविनाश साबळे व स्वरूप उन्हाळकर या पाच खेळाडूंना स्पर्धेच्या तयारीसाठी प्रत्येकी पन्नास लाखांचा निधी सरकारने त्यांच्याकडे सोपविला. असे म्हणतात, की खेळाडू आकाशातून पडत नाहीत. त्यांना घडवावे लागते, त्यांच्यावर मेहनत घ्यावी लागते आणि ती घेण्यासाठी क्रीडाविषयक पायाभूत सुविधा उपलब्ध असाव्या लागतात. दुर्दैवाने आपल्याकडे त्या दृष्टीने फार चांगली स्थिती नाही. अमेरिका, चीन, रशिया किंवा जपानशी तुलना केली तर याबाबत आपण मागासलेले आहोत. इतकेच कशाला उत्तरेकडील हरयाणा, पंजाबच्या तुलनेतही महाराष्ट्रात पुरेशा क्रीडा सुविधा नसल्याची नेहमीची तक्रार आहे. तिची दखल घेऊन राज्य सरकार काही दुरुस्ती करीत असेल, तर तिचे स्वागतच करायला हवे. या अशा घटनांनी नव्या वर्षाची सुरुवात मैदान मारण्याच्या उमेदीने, जिद्दीने, झाली, हे अधिक महत्त्वाचे.

टॅग्स :Ajinkya Rahaneअजिंक्य रहाणेIndia vs Australiaभारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया