शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

'ब्रिक्स'मध्ये भारताची अवस्था धरले तर चावते अन् सोडले तर...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2023 9:34 AM

हल्ली सर्वच क्षेत्रांत या दोन शेजारी देशांदरम्यान कधी उघड, तर कधी छुपी स्पर्धा बघायला मिळते. ‘ब्रिक्स’चा विस्तार करण्याची चर्चा गत काही काळापासून सुरू होती.

दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग शहरात नुकत्याच पार पडलेल्या ‘ब्रिक्स’ शिखर परिषदेने भारत आणि चीन दरम्यान गत काही काळापासून सुरू असलेले शीतयुद्ध अधोरेखित केले. या दोन देशांशिवाय रशिया, ब्राझील आणि दक्षिण आफ्रिका हे इतर तीन देश जरी `ब्रिक्स’चे सदस्य असले तरी सर्वार्थाने भारत व चीन हे दोन देशच प्रभावशाली आहेत. हल्ली सर्वच क्षेत्रांत या दोन शेजारी देशांदरम्यान कधी उघड, तर कधी छुपी स्पर्धा बघायला मिळते. ‘ब्रिक्स’चा विस्तार करण्याची चर्चा गत काही काळापासून सुरू होती.

या संघटनेची स्थापना झाली तेव्हा चारच देश सहभागी होते आणि त्यांच्या आद्याक्षरांवरून तिचे ‘ब्रिक’ असे नामकरण झाले होते. पुढे दक्षिण आफ्रिकेचा समावेश झाला अन ‘ब्रिक्स’ असा नामविस्तार झाला. जगातील सर्वात वेगाने विकसित होत असलेल्या पाच अर्थव्यवस्थांचा समूह, असे स्वरूप असलेल्या या संघटनेच्या विस्ताराची चर्चा  काही काळापासून सुरू होती. प्रारंभी भारत व ब्राझील हे दोन सदस्य देश विस्तारासंदर्भात काहीसे प्रतिकूल होते; परंतु चीन आग्रही होता. पुढे ब्राझीलही अनुकूल झाला आणि अखेर भारतालाही बहुमतापुढे मान तुकवावी लागली, असे जोहान्सबर्ग परिषदेच्या फलनिष्पत्तीवरून दिसते.

पुढील वर्षाच्या प्रारंभी सौदी अरेबिया, इराण, संयुक्त अरब अमिराती, इथिओपिया, इजिप्त आणि अर्जेंटीना हे सहा देश ‘ब्रिक्स’चे नवे सदस्य असतील. नव्या सदस्यांच्या समावेशामुळे ‘ब्रिक्स’चा जागतिक सकल देशांतर्गत उत्पादन म्हणजेच जीडीपीमधील वाटा `जी-७’ समूहाच्या हिश्शापेक्षाही जास्त होईल. चीनला तेच हवे आहे. मुळात चीनचा प्रयत्न पाश्चात्य देशांच्या वर्चस्वाला सुरुंग लावून जागतिक पटलावर अमेरिकेची जागा घेण्याचा आहे. त्यासाठी पाश्चात्य देशांचा प्रभाव असलेल्या संघटना, संस्थांना पर्याय उभे करण्याचे जोरदार प्रयत्न चीनने चालविले आहेत. त्यातच युक्रेन युद्धामुळे पाश्चात्य देशांचे आर्थिक निर्बंध सोसत असलेला रशियाही चीनच्या जवळपास कच्छपि लागला आहे.

सौदी अरेबिया व इराणमध्ये चीनने अलीकडेच समझोता घडवून आणला. आता ते दोन्ही देश `ब्रिक्स’चे सदस्य असतील. त्यामुळे आपसूकच चीनचा `ब्रिक्स’मधील प्रभाव वाढणार आहे. ‘ब्रिक्स’ विस्ताराचे स्वागत केले असले तरी, भारताला संघटनेतील चीनच्या वाढत्या प्रभावाची चिंता वाटणे स्वाभाविक आहे. पाकिस्तानचा समावेश ‘ब्रिक्स’मध्ये होऊ शकला नाही, ही भारतासाठी त्यातल्या त्यात समाधानाची बाब! ‘ब्रिक्स’ देशांचे समान चलन किंवा युआन या चिनी चलनाचा आंतरराष्ट्रीय आर्थिक व्यवहार पूर्ण करण्यासाठी वापर, ही भारतासाठी आणखी एक चिंतेची बाब आहे. संघटनेतील काही देश `ब्रिक्स’ देशांचे समान चलन अस्तित्वात आणावे या मताचे आहेत. भारत आणि चीन दोघेही त्यासाठी अनुकूल नाहीत; पण त्यामागील दोघांचेही हेतू भिन्न आहेत.

चीनला अमेरिकन डॉलरला पर्याय म्हणून युआनला समोर आणायचे आहे. त्यामुळे ‘ब्रिक्स’ देशांनी डॉलरऐवजी युआनमध्ये व्यवहार करावे, असा चीनचा प्रयत्न आहे. दुसरीकडे भारत मात्र सर्व सदस्य देशांनी आपापल्या चलनाचे आंतरराष्ट्रीयीकरण करून त्यामध्ये व्यवहार करावे, यासाठी आग्रही आहे. भारताने अलीकडील काळात रुपयाला आंतरराष्ट्रीय चलन म्हणून पुढे आणण्याचे प्रयत्न सुरू केलेही आहेत ; पण इतर अर्थासत्तांच्या तुलनेतील कमजोरी आणि रुपयाची डॉलरच्या तुलनेत होत असलेली सततची घसरण, हे त्यामधील मोठे अडथळे आहेत. रशियाने प्रारंभी भारताकडून येणे असलेली रक्कम रुपयात स्वीकारली; परंतु आता आमच्याकडे साठलेले भारतीय चलन इतर देश स्वीकारत नसल्याचे सांगून, रशिया युआनमध्ये व्यवहार पूर्ण करण्याचा आग्रह धरू लागला आहे.

पाश्चात्यांच्या निर्बंधांमुळे रशियाला डॉलरऐवजी दुसऱ्या चलनाची गरज भासत आहे आणि त्याने युआन हा पर्याय स्वीकारला आहे. त्यामुळे भारताची बाजू आणखी कमकुवत झाली आहे. थोडक्यात `ब्रिक्स’मध्ये भारताची अवस्था धरले तर चावते अन् सोडले तर पळते, अशी होऊ लागली आहे. अमेरिकेला तेच हवे आहे.`ब्रिक्स’सारख्या समूहांमध्ये भारताची अधिकाधिक कुचंबणा व्हावी आणि शेवटी भारताने आपल्या छत्रछायेखाली यावे, असाच अमेरिकेचा प्रयत्न आहे. जागतिक भू-राजकीय स्थिती कूस पालटत आहे. ती प्रक्रिया पूर्ण व्हायला आणखी काही वर्षे लागतील. तोपर्यंत स्वत: ला आर्थिक आणि तंत्रज्ञानाच्या आघाड्यांवर सशक्त बनवत राहणे आणि आपले स्वतंत्र अस्तित्व, अस्मिता टिकवून ठेवणे, हाच तूर्त भारतासमोरील एकमेव पर्याय आहे.

टॅग्स :Indiaभारत