शहरं
Join us  
Trending Stories
1
संजूचं शतक; आफ्रिकेत फिरकीची 'करामत' अन् सूर्याच्या कॅप्टन्सीत टीम इंडियाचा विजयी धडाका कायम!
2
ठाण्यात बिल न देता हॉटेलात जायची सवय तेच दावोसमध्ये केले; जयंत पाटलांचा शिंदेंना जोरदार टोला 
3
रावेरचे माजी आमदार आर. आर. पाटील यांचे निधन
4
मिस्ट्री स्पिनरची जादू; दक्षिण आफ्रिकेच्या ताफ्यातील स्फोटक फलंदाज ठरले फुसका बार!
5
मी शिवसेना सोडली तेव्हा ३५ आमदार, १५ खासदार माझ्याकडे आलेले...; राज ठाकरेंचा एकाच वाक्यात उद्धव, शिंदेंवर नेम
6
Aiden Markram नं रुबाब दाखवला; पण Arshdeep Singh समोर तो फिका ठरला (VIDEO)
7
फुटबॉल सामन्यावेळी इस्रायली नागरिकांवर हल्ला; १२ जखमी, नेतन्याहूंनी नेदरलँडला विमाने पाठविली
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'समोरासमोर चर्चेला तयार', पृथ्वीराज चव्हाणांचं अमित शाहांना खुलं चॅलेंज
9
Sanju Samson ची सेंच्युरी! एका डावात ३ खास रेकॉर्ड्सला घातली गवसणी
10
फक्त एक षटकार मारला त्यातही सुर्या भाऊची हवा! IPL मधील २१ कोटींचा सिक्सर किंग पडला मागे
11
जानेवारीमध्ये भाजपला मिळणार नवीन राष्ट्रीय अध्यक्ष; 22 नोव्हेंबरला दिल्लीत महत्वाची बैठक
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महिलांबाबत अपमानास्पद वक्तव्यावर निवडणूक आयोग ॲक्शमोडवर,अधिकाऱ्यांना दिल्या कारवाईच्या सूचना
13
निमलष्करी दलाच्या अधिकाऱ्यांच्या रेशन मनी भत्त्याला कात्री; दर महिन्याला ४००० रुपयांचे नुकसान
14
कोणाचा फोटो लावायचा, हा आमचा निर्णय; मोदींचा फोटो न लावण्यावरुन नवाब मलिक स्पष्ट बोलले
15
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
16
जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये सैन्याची मोठी कारवाई; दोन दहशतवाद्यांचा खात्मा
17
"...तर बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या"; नारायण राणेंचं विधान
18
ऐकावं ते नवलच! १२ वर्षे जुन्या कारचे अंत्यसंस्कार, चार लाख खर्च करुन बांधली समाधी
19
सध्यातरी इतकेच महायुतीत ठरले...; अमित शाह यांच्या मुख्यमंत्री नावाच्या दाव्यावर प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया
20
"अरे देवा...", राहुल-अथियाने दिली गुडन्यूज; सूर्यकुमारची पत्नी देविशाच्या कमेंटनं मात्र वेधलं लक्ष

आजचा अग्रलेख: मैदानात मृत्यूचा ‘खेळ’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 04, 2022 8:38 AM

इंडोनेशियातून रविवारी धक्कादायक वृत्त आले.

इंडोनेशियातून रविवारी धक्कादायक वृत्त आले. फुटबॉल सामन्यादरम्यान हिंसाचार घडला. हिंसाचारात १२५ जणांचा मृत्यू झाला. गंभीर जखमींची संख्या १८०च्या वर गेली आहे. अरेमा एफसी आणि पर्सेबाया सुराबाय या क्लबमधील लढतीत सुराबाय संघाने अरेमा एफसीवर मात करीत ३-२ ने सामना जिंकला.  सामन्यानंतर पराभूत अरेमा एफसी संघाच्या चाहत्यांनी मैदानावर येत गोंधळ घातला. नाराज चाहत्यांना हुसकावण्यासाठी पोलिसांनी आधी लाठ्यांचा प्रसाद दिला. पाठोपाठ अश्रुधुराचा मारा केला. पोलिसांच्या मते, स्टेडियमवर ४२ हजार प्रेक्षक होते, हे सर्वजण अरेमा संघाचे पाठीराखे होते. 

आयोजकांनी सुराबायच्या पाठीराख्यांवर बंदी घातली होती.  अरेमा आणि सुराबाय हे कट्टर वैरी संघ. दोन दशकानंतर त्यांच्यात सामना झाला; पण चाहत्यांना प्रवेश नाकारण्यात आल्यानंतरही सुराबायने बाजी मारताच पराभव पचनी न पडलेले अरेमाचे चाहते भडकले. त्यांनी रेफ्री, अधिकारी आणि पोलिसांना लक्ष्य केले.  ३४ जणांचा  जागेवर मृत्यू झाला. काहींनी इस्पितळात प्राण सोडले. ‘फिफा’चे अध्यक्ष जियानी इन्फटिंनो यांनी फुटबॉलसाठी हा काळा दिवस असल्याचे वक्तव्य केले. ‘फिफा’चा नियम सांगतो, की पोलीस स्टेडियममध्ये शस्त्र सोबत बाळगू शकतात. मात्र, गोळीबार करू शकत नाहीत. अश्रुधुराच्या नळकांड्यांचा मारा करण्यासही बंदी आहे. देशातील मानवाधिकार आयोगाने नेमके याच गोष्टीवर बोट ठेवले. या दृष्टीने चौकशी करण्याचे आदेश आयोगाने दिले आहेत. 

इंडोनेशियात याआधीही खेळात हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत. १९९० ला अशाच एका घटनेत १३ जणांचा मृत्यू झाला. यानंतरही १९९१ ते २०१९ या काळात जवळपास ७१ चाहत्यांना अशा प्रकारच्या घटनांमध्ये जीव गमवावा लागला. जागतिक फुटबॉलचा विचार केल्यास १९८९ ला ब्रिटनच्या हिल्सबोरो स्टेडियममध्ये झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेत लिव्हरपूल क्लबच्या ९७ चाहत्यांना जीव गमवावा लागला होता. २०१२ ला इजिप्तच्या पोर्ट सॅड स्टेडियममध्ये घडलेल्या घटनेत ७४ चाहते मृत्युमुखी पडले होते. १९६४ ला पेरू-अर्जेंटिना यांच्यातील पात्रता सामन्याच्या वेळी झालेल्या हिंसाचारात जवळपास ३२० जण मारले गेले. काही हजार जखमी झाले होते. इंडोनेशियात अशा घटना का घडतात? त्यामागे अनेक कारणे देता येतील. भारतात क्रिकेट जितके लोकप्रिय, तितकीच इंडोनेशियात फुटबॉलची लोकप्रियता. या खेळावर जीव ओवाळून टाकणारे सर्व वयोगटातील लोक सामन्याला हजेरी लावण्यासाठी अक्षरश: वेडे असतात. चाहते आपापल्या क्लबवर जीव ओवाळतात. स्थानिक लीगची मोठी क्रेझ आहे. कडवेपणा हिंसेचे रूप धारण करतो. चाहत्यांमधील ही झडप स्टेडियमच्या बाहेर अनेक दिवस पाहायला मिळते. बदल्याच्या भावनेतून भोसकाभोसकीचे प्रकार घडतात. खेळाच्या माध्यमातून टोळीयुद्ध घडत असते. खेळातील जय- पराजयावर पैशाचा खेळ रंगत असतो. त्यातून हिंसेचा उद्रेक होतो. 

क्लब फुटबॉलवर होणारी आर्थिक उलाढाल हे हिंसेमागील मोठे कारण. आपला संघ हरण्याचा अर्थ मोठे आर्थिक नुकसान. या नुकसानीचा वचपा प्रतिस्पर्धी खेळाडूवर हल्ला चढवून काढला जातो. या देशात पर्सिजा जकार्ता आणि परसिब बांदुंग या दोन्ही क्लबचे पाठीराखे तर कधीही एकमेकांसोबत पंगा घेतात. २०१८ ला तर परसिब बांदुंगच्या एका चाहत्याने पर्सिजा जकार्ताच्या चाहत्याला जीव जाईपर्यंत चिरडले होते. आंतरराष्ट्रीय स्तरावर इंडोनेशियाच्या फुटबॉल चाहत्यांची प्रतिमा खराब आहे. जगात कुठेही सामना असेल तेव्हा त्यांच्या कृतीवर विशेष नजर ठेवली जाते. कडवे प्रतिस्पर्धी असलेले मलेशिया आणि इंडोनेशिया यांच्यात २०१९ च्या फिफा विश्वचषक पात्रता फेरीच्या सामन्यादरम्यान राडा झाला होता. जकार्ता येथे  मलेशियाच्या चाहत्यांवर दगडफेक झाली आणि त्यांना जिवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. 

२०१९ ला दक्षिणपूर्व आशियाई २२ वर्षांखालील आशियाई फुटबॉल सामन्यात व्हिएतनामकडून झालेला पराभव पचनी न पडल्याने इंडोनेशियाच्या चाहत्यांनी  विजयी संघातील खेळाडूंना शिवीगाळ केली होती. पराभूत संघातील खेळाडूंच्या कुटुंबीयांना देखील संपवून टाकण्याचा इशारा दिला होता. यंदा जूनमध्ये प्रेसिडेंट चषक सामन्याच्यावेळी परसिंग बांदुंगचे दोन चाहते स्टेडियममध्ये प्रवेश करू इच्छित होते. अधिकाऱ्यांनी त्यांना रोखताच हिंसाचाराला तोंड फुटले होते. खेळ आणि खिलाडूवृत्ती, जय-पराजयाचा स्वीकार या गोष्टींचा विसर पडल्याने हिंसक चाहते कुठल्याही स्तराला जातात. इंडोनेशियाच्या चाहत्यांची ही एकांगीवृत्ती क्रीडाविश्वाला मारक अशीच आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :FootballफुटबॉलIndonesiaइंडोनेशिया