- स्नेहा मोरे ‘मेक इन इंडिया’च्या धर्तीवर अनेकानेक स्टार्टअप्सच्या संकल्पना जन्माला येऊ लागल्या. मात्र, एकाच वेळी डोके वर काढणाऱ्या या स्टार्टअपच्या दुनियेत अनेकांना नेमकी दिशा सापडत नव्हती. त्यामुळे मग आपण अशा नवउद्यमींना आधार देत, मार्गदर्शन करणाऱ्या एका नव्या र्स्टाटअपचा जन्म झाला. गोविंद मोघेकर यांनी ‘शोपो’ संकेतस्थळाची निर्मिती करत या माध्यमातून नव्याने उद्योगात येणाऱ्यांना व्यवसाय करताना काय अडचणी-समस्या येतात, त्यांचा अभ्यास करून त्या दूर करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. नव्या खाद्य किंवा उत्पादन उद्योगाला लागणारा कच्चा माल खरेदीचा, तसेच त्यांच्या उत्पादित मालाच्या विपणन आणि वितरणाचा मुख्य प्रश्न या स्टार्टअपने मार्गी लावण्याचा प्रयत्न केला आहे. या संकल्पनेविषयी मोघेकर सांगतात की, संकेतस्थळ सुरू करण्यापूर्वी स्थानिक पातळीवरच्या अनेक छोट्या-छोट्या उद्योजकांच्या अडचणी समजून घेतल्या. त्या वेळी ग्राहकांना जो कच्चा माल लागतो,तो त्यांना नेहमीच रास्त भावातआणि योग्य दर्जाचा मिळेल, याची शाश्वती नसते. ज्यामुळे खाद्यपदार्थांच्या दर्जात फरक येतो आणि असे करणे त्यांना त्रासदायक होते. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे, ‘कच्चा माल’ खरेदी करण्यासाठी स्थानिक विक्रेते हाच एकमेव पर्याय असल्यामुळे, दर वेळेस खरेदीची किंमत बदलत असते.त्यामुळे मुख्यत: खाद्यपदार्थांशी संबंधित नवउद्यमींना कच्चा माल आणि विपणन, वितरणविषयक समस्यांवर हे संकेतस्थळ उत्तमरीत्या मदत करण्याचे कार्य करीत आहे. याविषयी जेव्हा मोघेकर यांनी नव उद्योजकांशी चर्चा करताना विचारले, तेव्हा त्यांच्या असे लक्षात आले की, ते स्थानिक भागात ‘लोकल सप्लाय’ पुरवठा स्वत: करू शकतात, परंतु त्यांना ‘मार्केटिंग’अभावी मागे राहावे लागत आहे. त्यानंतर मोघेकर यांच्या चमूने नव उद्योजकांच्या या समस्यांवर शास्त्रीय पद्धतीने विचार केला आणि ठरवले की, या दोन्ही समस्या सोडवण्यासाठी ‘शॉपो’ उत्तम मार्ग आहे. सुरुवातीला सर्वांना संकल्पना समजेपर्यंत काही अडचणींना तोंड द्यावे लागले. मात्र, ज्या वेळेस ही संकल्पना सर्वांना कळू लागली. त्यानंतर, आजमितीस या संकेतस्थळांवर अधिकाधिक उद्यमी जोडत आहेत, याचा आनंद आहे.
नव्या उद्यमींना आधार देणारा ‘उद्योग’
By admin | Published: June 25, 2017 1:14 AM
‘मेक इन इंडिया’च्या धर्तीवर अनेकानेक स्टार्टअप्सच्या संकल्पना जन्माला येऊ लागल्या. मात्र, एकाच वेळी डोके वर काढणाऱ्या या स्टार्टअपच्या दुनियेत अनेकांना नेमकी दिशा सापडत नव्हती
- moresneha305@gmail.com