- कुणाल गडहिरे भारतात आज स्टार्ट अप्ससाठी अतिशय पोषक वातावरण आहे, तरीही १०० पैकी ९० टक्के स्टार्ट अप्स हे पहिल्याच वर्षी बंद पडतात. यामागे महत्त्वाचं कारण म्हणजे, स्टार्ट अप्सच्या बहुतांश संस्थापकांना बिझनेस करण्याचा प्रत्यक्ष अनुभव नसतो. आपलं प्रोडक्ट अथवा सर्विस कोण विकत घेऊ शकेल, मार्केटिंग कसे करायचे, व्यावसायिक यशाचं गणित नेमके काय असते, अशा अनेक महत्त्वाच्या गोष्टींकडे सुरुवातीला दुर्लक्ष केले जाते .पारंपरिक बिझनेस आणि स्टार्ट अप्स यातला फरक लक्षात येत नाही. यामुळे चांगल्या बिझनेस आयडिया, त्या परिणामकारकपणे राबवता न आल्याने बंद पडतात. त्यामुळे स्टार्ट अप्सना योग्य प्रशिक्षण देण्यासाठी आज अनेक इनक्युबेटर आणि अॅसलरेटर संस्था सुरू झाल्या आहेत. भारतातील अशा प्रमुख संस्थांची माहिती देणारा हा लेख. १०,००० स्टार्ट अप्स, नासकॉम : २०२३ पर्यंत भारतात दहा हजार स्टार्ट अप्स घडविण्यासाठी नासकॉमने स्टार्ट अप्सना मदत करणारा भारतातील सर्वात मोठा आणि महत्त्वाकांक्षी प्रकल्प सुरू केला आहे. स्टार्ट अप्सना त्यांच्या 'डोमेनशी' संबधित असलेल्या मान्यवर आणि तज्ज्ञांकडून मार्गदर्शन मिळते, तसेच स्टार्ट अप्समध्ये गुंतवणूक करणाऱ्या नामांकित इनव्हेस्टर्स आणि संस्थाच्या माध्यमातून थेट फंडिंग मिळवण्यासाठी मदत केली जाते. यासाठी निवड केलेल्या स्टार्ट अप्सना फक्त आमंत्रितांसाठी राखीव असणाऱ्या स्टार्ट अप्स क्षेत्राशी संबंधित कार्यक्रमांना उपस्थित राहण्याची संधी दिली जाते. वेबसाइट : www.10000startups.comस्टार्ट अप झोन : स्टार्ट अप झोन ही मुंबईतील संस्था त्यांच्या चार महिन्यांच्या कार्यक्रमांतर्गत स्टार्ट अप्सना वर्किंग स्पेस देण्यासोबत विविध प्रकारे मार्गदर्शन आणि फंडिंगसाठी मदत करते, तसेच निवड केलेल्या १० ते १५ स्टार्ट अप्समध्ये त्यांच्याकडून दरवर्षी सुमारे ३० लाखांपासून तीन कोटींपर्यंतची गुंतवणूक केली जाते. वेबसाइट : www.thestartupcentre.com/incubatorद स्टार्ट अप सेंटर : स्टार्ट अप्सकडे असणाऱ्या बिझनेस संकल्पनेला प्रत्यक्ष स्वरूपात प्रोडक्ट बनविण्याबरोबरच फंडिंगसाठी पूर्णपणे तयार करण्यासाठी द स्टार्ट अप सेंटरने इनक्युबेटशन कार्यक्रमाची विशेष आखणी केली आहे. मात्र, यात निवड झालेल्या स्टार्ट अप्सना पन्नास हजार रुपये इतके शुल्क भरावे लागते, तसेच त्यांच्याकडून स्टार्ट अपमध्ये २ टक्के इक्विटी घेतली जाते. प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या स्टार्ट अप्सना अमेझॉन वेब सर्विस, सॉफ्टवेअर आणि गुगल यांच्या होस्टिंग आणि टेक्निकल सेवांसाठी सुमारे १५ लाख रुपयाचे क्रेडिट दिले जातात. वेबसाइट : www.india.zonestartups.com खोसला लॅब्स : आधार कार्डशी संबधित अॅप्लिकेशन, मोबाइल पेमेंट आणि बँकिंग, रिटेल, मशिन लर्निंग आणि डाटा अॅनालिटिक्स, अशा विविध क्षेत्रांशी संबंधित असलेल्या स्टार्ट अप्सना मार्गदर्शन व प्रशिक्षण देण्यात येते. आयडिया ते प्रोडक्ट या संकल्पनेवर याची आखणी केली आहे. हा कार्यक्रम निवासी स्वरूपाचा आहे. वेबसाइट : www.khoslalabs.comटी लॅब्स : ही संस्था १६ आठवड्यांचा अॅसलरेटर प्रोग्राम आयोजित करते. दर वर्षी १५ निवडक स्टार्ट अप्सची या प्रशिक्षण कार्यक्रमात निवड केली जाते. इंटरनेट आणि मोबाइल स्टार्ट अप्सना प्राधान्य दिले जाते. वर्षातून दोनदा या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. निवड केलेल्या स्टार्ट अप्समध्ये ८ टक्के इक्विटी घेऊन सुमारे ३० लाखापर्यंतची गुंतवणूक केली जाते. वेबसाइट : www.tlabs.inकॅटलायझर : वर्षातून दोन वेळा, १०१ दिवसांचा अॅसलरेटर प्रोग्राम आयोजित केला जातो. यासाठी सुमारे १२ स्टार्ट अप्स अथवा त्यांच्या संस्थापकांची निवड केली जाते. प्रामुख्याने टेक्नॉलॉजी, ब्रिक अँड मोर्टार, सामाजिक आणि नॉन प्रॉफिट क्षेत्रातील स्टार्ट अप्सची निवड केली जाते. निवड केलेल्या स्टार्ट अप्समध्ये ७ ते १२ टक्के इक्विटी घेऊन सुमारे १० लाखापर्यंत गुंतवणूक केली जाते. वेबसाइट : www.catalyzer.comव्हेंचर नर्सरी : बूटकॅम्प या ९० दिवसांच्या अॅसलरेटर प्रोग्रामसाठी एका वेळेस आठ स्टार्ट अप्सची निवड केली जाते. मीडिया आणि एंटरटेन्मेंट, रिटेल, ई- कॉमर्स, कंज्युमर टेक्नॉलॉजी, क्लीन टेक या क्षेत्रातील स्टार्ट अप्सना प्राधान्य दिले जाते. हा प्रशिक्षण कार्यक्रम पूर्ण केल्यावर सुमारे ५ टक्के इक्विटी घेऊन, २५ लाखांपर्यंत गुंतवणूक केली जाते. वेबसाइट :www.venturenursery.comस्टार्ट टॅन्क : पे पल या सर्वात मोठ्या आॅनलाइन पेमेंट गेट वे कंपनीने त्यांच्या चेन्नई येथील डेव्हलपमेंट सेंटरमध्ये हा विशेष कार्यक्रम सुरू केला आहे. प्रामुख्याने पेमेंट गेट वे अथवा आॅनलाइन मनी या क्षेत्राशी संबधित स्टार्ट अप्सची या कार्यक्रमासाठी निवड केली जाते. या कार्यक्रमांतर्गत संपूर्ण वर्षभर स्टार्ट अप्सना मार्गदर्शन आणि इन्फ्रास्ट्रक्चर अशी मदत दिली जाते. मात्र, कोणत्याही प्रकारची थेट आर्थिक मदत केली जात नाही. वेबसाइट : www.chennai.starttank.comइंडियन एंजेल नेटवर्क इनक्युबेटर (कअठ कल्लू४ुं३ङ्म१) : इंडियन एंजेल नेटवर्क या भारतातील एंजेल इन्वेस्टर्सना एकाच व्यासपीठावर आणणाऱ्या आणि स्टार्ट अप्स फंडिंग क्षेत्रातील नामांकित संस्थेतर्फे हा प्रशिक्षण आणि मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित केला जातो. निवडलेल्या स्टार्ट अप्सना किमान बारा महिने ते अठरा महिने विविध विषयांत मार्गदर्शन केले जाते. आय टी, टेलीकॉम, मोबाइल सेवा, गेमिंग, इंटरनेट आणि वेब, मीडिया आणि एंटरटेन्मेंट, टेक्नॉलॉजी, रिटेल, शैक्षणिक, वैद्यकीय, क्लाउड कॉम्प्युटिंग, अशा विविध क्षेत्रांतील स्टार्ट अप्सची यासाठी निवड केली जाते, तसेच संस्थेशी संलग्न असणाऱ्या एंजेल इन्वेस्टर्सकडून फंडिंग मिळवण्याची संधीदेखील निवड झालेल्या स्टार्ट अप्सना मिळते. वेबसाइट : www.ianincubator.org विलग्रो : आर्थिकदृष्ट्या मागास घटकातील लोकांना मदत करणाऱ्या सोशल स्टार्ट अप्सना विलग्रो, सुरुवातीच्या टप्प्यापासून प्रशिक्षण, मार्गदर्शन, नेटवर्किंग आणि फंडिंग या विषयात इनक्युबेशन कार्यक्रमाच्या माध्यमातून मदत करते. वैद्यकीय, शैक्षणिक, शेती विषयक आणि ऊर्जा या विषयात काम करत असणाऱ्या स्टार्ट अप्सना प्राधान्य दिले जाते. वेबसाइट : www.villgro.org
स्टार्ट अप्सना घडवणाऱ्या संस्था
By admin | Published: February 28, 2016 3:09 AM