शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत आव्वाज कुणाचा? उत्तर आणि उत्तर पश्चिम मुंबईत चुरशीच्या लढती, महायुती, मविआमुळे काही मतदारसंघांचे गणित बदलणार
2
अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत कोणता मुद्दा यावेळी ठरणार निर्णायक?
3
पती-पत्नीला एकमेकांच्या हेरगिरीची परवानगी नाही, मद्रास व हिमाचल हायकोर्टाचे मत
4
'ऑलिम्पिक २०३६'च्या आयोजनास सज्ज, भारताने आयओसीकडे सोपविले आशय पत्र
5
'टीम इंडिया ऑस्ट्रेलियात ४-० ने जिंकणार नाही...', सुनील गावसकर यांचे धक्कादायक भाकीत
6
रणजी क्रिकेट: पृथ्वी शॉ याला मुंबईच्या संघात स्थान नाहीच, श्रेयसचं पुनरागमन
7
भाजपची मोठी घोषणा! मुंबईत मनसेच्या या उमेदवाराला पाठिंबा; पूर्ण ताकदीने प्रचार करणार
8
लाडक्या बहि‍णींना महिन्याला ₹2100, शेतकऱ्यांना कर्जमाफी अन्..CM शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
9
मुंब्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर उभारा; फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना आव्हान
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला; सतेज पाटलांसमोर शाहू महाराजांची घोषणा
11
IPL २०२५ च्या मेगा लिलावाचे शहर ठरले; या तारखांना सौदीत २०४ खेळाडू निवडले जाणार
12
Uddhav Thackeray: शिंदेंना वाटले तर चिन्ह द्या, पण शिवसेना माझीच राहणार; उद्धव ठाकरेंचे मोठे वक्तव्य
13
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
14
गुजरातच्या आणंदमध्ये बुलेट ट्रेनचा पूल कोसळला; दोन मजुरांचा मृत्यू, एक जखमी
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "महायुतीची लाडकी बहीण योजना तात्पुरती, आम्ही योजना कायम ठेवणार"; विश्वजीत कदमांचा विरोधकांवर हल्लाबोल
16
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
17
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिला बॉक्सरकडून फसवणूक; गोल्ड जिंकलं पण पुरुष असल्याचे उघड झालं
18
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
19
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
20
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...

आपल्या आयुष्यातून सिनेमा 'हरवला' आहे का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 08, 2023 8:56 AM

गेल्या काही वर्षांत सिनेमाचा प्रभाव झपाट्यानं कमी होत आहे. सिनेमा हा पूर्वी लोकांच्या जगण्याचाच एक भाग होता. तो प्रभाव कुठे, का, कसा गायब झाला?

- अमोल उदगीरकर

'लगे रहो मुन्नाभाई' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता तेव्हा महात्मा गांधी जागतिकीकरणानंतरच्या भारतात आणि नवीन राजकीय रेट्यांमध्ये बहुतांश भारतीयांच्या विस्मृतीमध्ये गेले होते. राजू हिराणी या दिग्दर्शकाने गांधीजींचं जे तत्त्वज्ञान खुमासदार विनोदाच्या चॉकलेट रॅपरमध्ये गुंडाळून प्रेक्षकांसमोर पेश केलं ते प्रेक्षकांना प्रचंड आवडलं. गांधीजी अनेकांच्या मनात पुन्हा प्रस्थापित झाले. याच सिनेमात वापरलेली 'गांधीगिरी' ही टर्मिनॉलॉजी आजही वापरली जाते. समोरच्याला विद्वेषाने किंवा शक्तीच्या बळावर जिंकून घेण्यापेक्षा त्याला प्रेमाने जिंका असा याचा अर्थ.

'दिल चाहता है' सिनेमा आल्यानंतर मुलांच्या आणि मुलींच्या ग्रुप्सच्या गोवा ट्रिप्स वाढीला लागल्या होत्या. आजपण कुठंही ऑनर किलिंग झालं की 'अजून एक सैराट' अशा अर्थाचे मथळे माध्यमांत बघायला मिळतात. सिनेमाचा भारतीय जनमानसावर त्यांच्या वर्तणुकीवर मोठा प्रभाव होता. यालाच सिनेमाचा पॉप कल्चरवरचा प्रभाव असं म्हणता येईल. पण सिनेमाचा जनमानसावरचा आणि पॉप कल्चरवरचा हा प्रभाव गेल्या काही वर्षात कमी कमी होत चाललाय का? प्रेक्षक सिनेमे बघायला थियेटरमध्ये येत नाहीत किंवा प्रेक्षकांना नवीन सिनेमांबद्दल आणि स्टार्सबद्दल फारसं आकर्षण वाटत नाही, या तत्कालीन धोक्यांपेक्षा बॉलिवूड आणि मराठी सिनेमांचे पॉप कल्चर रेफरन्स रोजच्या आयुष्यात येणं बंद झालंय हा लाँग टर्म धोका सध्या तरी खूप जास्त मोठा वाटतोय. कदाचित याच्या परिणामांची जाणीव पुढच्या काही वर्षात होईल.

अगदी २०१२ पर्यंत सिनेमांचे संदर्भ आपल्या रोजच्या बोलण्यात असायचे. सिनेमा आपल्या आयुष्य जगण्याच्या पद्धतीवर, रितीरिवाजांवर फॅशनवर, आपल्या विनोदांवर भरपूर प्रभाव टाकून होता. 'हम आपके है कौन' सिनेमा आल्यानंतर आपल्याकडची लग्नं नेहमीसाठी बदलली. आपल्या लग्नात 'संगीत'सारख्या प्रथा आल्या. लग्नातल्या मराठमोळ्या पदार्थांची जागा पंजाबी आणि लग्नात वाजणारी गाणीपण बदलली. चायनीज पदार्थांनी घेतली, इतकंच काय आपल्या राजकीय नेत्यांच्या भाषणात सिनेमातले संवाद असायचे. मनसेची स्थापना झाल्यावर राज ठाकरेंची जी सभा सगळ्यात गाजली होती त्यात अजित पवार यांना उद्देशून त्यांनी 'सत्या' मधला 'मौका सभी को मिलता है' या डॉयलॉगचा समर्पक वापर करून टाळ्या- शिट्ट्या वसूल केल्या होत्या. देशासाठी अतिशय महत्त्वाचे असणारे पण रुक्ष आणि रटाळ अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री हिंदी सिनेमातल्या गाण्यांच्या ओळी किंवा शेरोशायरी वापरून कोरडेपणा भरलेल्या वातावरणात प्रसन्नतेचा शिडकाव करायचे.

पॉप कल्चरमध्ये ध्रुवासारखं अढळ स्थान पटकावून बसलेली काही उदाहरणं म्हणजे म्हणजे 'दिवार' सिनेमातला 'मेरे पास माँ है' सारखा डॉयलॉग, 'शोले'मधले एक से बढ़के एक डॉयलॉग, 'हम', 'दबंग' आणि 'सिंघम'सारख्या सिनेमांनी पोलिसांच्या प्रतिमेत घडवलेला बदल, 'जब वुई मेट'मधल्या करीनाच्या पात्राने मुलींच्या फॅशन सेन्सवर टाकलेला प्रभाव. ही यादी अजून खूप वाढवता येईल, पण गेल्या काही वर्षात सिनेमाचा प्रभाव तितक्या मोठ्या प्रमाणात होत नाहीये. 'रांझना', 'तमाशा', 'सैराट', 'कबीर सिंग'सारखे मोजके अपवाद वगळता सिनेमाचे संदर्भ लोकांच्या वागण्या-बोलण्यात येत नाहीयेत. सिनेमाचा पडद्यापलीकडे जाऊन जो एक प्रभाव असतो तो जवळपास अनुपस्थित होत चाललाय. पहिला पाऊस पडला की लोकांना अजूनही नव्वदच्या दशकातली गाणी आठवतात. सध्याच्या गाण्यांना आणि सिनेमाला हे जमत नाही. आजही 'फादर्स डे' आला की नवीन पिढीला पण 'घातक'मधला सनी देओल, अमरीश पुरीचा ट्रॅक आठवतो. मराठीत दादा कोंडकेंचे सिनेमे, अशी ही बनवाबनवी' आणि 'सैराट'चा असा प्रभाव लोकांवर होता. सध्याच्या सिनेमाचा बहुतांश जनतेशी असणारा संपर्क तुटत चालला आहे. याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे अभिनेत्यांमधून स्टार्स आणि सुपरस्टार्स बनण्याची प्रक्रिया जवळपास बंद पडली आहे.

व्यक्तिकेंद्रित देशात नेहमी स्टार्स हेच पॉप कल्चरचे वाहक असतात; पण सोशल मीडियाने स्टार्सच्या भोवती जे एक गूढ आणि आकर्षक वलय होतं, ते संपवलंय. सिनेमा चित्रपटगृहात बघणं हे प्रचंड महागही झालं आहे. सर्वसामान्यांना परवडण्याच्या पलीकडे सिनेमा चालला आहे. सध्याच्या राजकीय ध्रुवीकरणाचा आणि राजकारण्यांमुळे घराघरात झालेल्या दुफळीचा परिणाम सिनेमावर होत आहे. सिनेमा लोकांना बिघडवतो अशी समजूत असणारा एक संस्कारी वर्ग होताच, त्यात सिनेमात काम करणारे लोक देशद्रोही आहेत या नवीन नरेटिव्हची भर पडली आहे. चित्रपट क्षेत्राला सतत काही अंतराने वेगवेगळी आव्हाने मिळत गेली. महायुद्ध असो, नैसर्गिक आपत्ती असो, आर्थिक मंदी असो, टेलिव्हिजनचं आगमन असो, इंटरनेटवरून होणारी पायरसी असो, कोरोनाची लाट असो वा आताच ओटीटीने दिलेलं जोरदार आव्हान असो, सिनेमा प्रत्येक वेळी तावून सुलाखून बाहेर पडला आहे. सिनेमाची सगळ्यात जमेची बाजू म्हणजे सर्वसामान्य माणसाच्या मनात सिनेमाबद्दल असलेलं प्रचंड आकर्षण. हे आकर्षणच कमी होतं चाललं आहे का? याचं उत्तर नकारात्मक असावं आणि सिनेमाचं पॉप कल्चरमध्ये पुनरागमन व्हावं, अशीच चित्रपटरसिकांची इच्छा असावी.

टॅग्स :cinemaसिनेमा