- ऐम्नॉन ओफेनपाण्याची कमतरता आणि त्याचा कृषी क्षेत्रावर होत असलेला विपरीत परिणाम पाहता शेतकºयांनी ठिबक सिंचन तंत्रज्ञानाचा वापर करणे गरजेचे झाले आहे. जशी इस्रायलने या क्षेत्रात प्रगतीची झेप घेतली आहे. इस्रायलच्या पंतप्रधानांनी केलेल्या भारतातील दौºयामुळे दोन्ही देशातील संबंध अधिक मजबूत होणार आहेत.भारत व इस्रायलमधील संबंध केवळ संरक्षणापुरतेच मर्यादित राहिले नसून खाद्य सुरक्षा व आर्थिक स्थिरतेच्या क्षेत्रातही वाढले आहेत. २५ वर्षांपूर्वी भारत व इस्रायलमध्ये राजकीय संबंध प्रस्थापित झाले होते. परंतु त्यापूर्वी दोन्ही देशांमध्ये व्यापार व अन्य संबंध सुरू होते. ज्या क्षेत्रात हे संबंध सर्वाधिक जास्त यशस्वी ठरले, ते क्षेत्र म्हणजे कृषी, सिंचन व खाद्य सुरक्षा आहे. भारतात कृषी क्षेत्रात क्रांती आणण्यासाठी इस्रायलच्या तंत्रज्ञान मार्गदर्शक ठरले आहे.
सिंचनाच्या क्षेत्रात प्रगतीदोन्ही देशामध्ये असलेले संबंध लक्षात घेता इस्रायलची मदत सरकारी प्रतिष्ठान व भारतीय खासगी क्षेत्रासाठी सुलभ झाली आहे. विशेष करून सिंचनाच्या क्षेत्रात इस्रायलच्या तंत्रज्ञानाचा समावेश आहे. वारंवार होणारे दौरे व चर्चेतून भारतीयांना इस्रायलच्या यशस्वीतेचे रहस्य अवगत झाले आहे. त्यांना येथील प्रगत तंत्रज्ञानाची माहिती झाली आहे. इस्रायलमध्ये कृषी व सिंचन या दोन्ही क्षेत्राला सारखेच महत्त्व दिले जाते. प्रसिद्ध इस्रायल ठिबकमध्ये कृषीच्या संदर्भातील विविध कार्याच्या समावेश आहे. यात उपयुक्त पिकांचा शोध, त्याचा विकास, सिंचनाची प्रणाली, फिल्टर, विशेष उर्वरक, कीटकनाशक व मार्केटिंग याचा समावेश आहे. इस्रायलचा हा दृष्टिकोन व्यापार क्षेत्रातील कंपन्यांसाठी लाभदायक आहे. त्यामुळे येथील सिंचन कंपन्यांचे जगभरातील सिंचन बाजारपेठांवर ५० टक्के नियंत्रण असते.
भारतात इस्रायली मॉडेलआज भारतातील शेतक-यांनी ड्रीप एरिगेशन हे तंत्रज्ञान मोठ्या प्रमाणात स्वीकारले आहे. जवळपास दोन कोटी शेतकरी या सिंचन तंत्रज्ञानाशी व उपकरणाशी जुळलेले आहेत. भारत सरकारही या वाढत्या तंत्रज्ञानावर लक्ष ठेवून आहे. दरवर्षी ठिबक तंत्रज्ञानामुळे लाखो हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली यावे, यासाठी सरकार गुंतवणुकीची योजना राबवित आहे. विदेश मंत्रालय व कृषी मंत्रालय इस्रायल सरकारसोबत काम करीत आहे. भारतीय शेतकºयांना प्रशिक्षण देण्यासाठी केंद्राची स्थापना करण्याबरोबरच तेथील कृषी तंत्रज्ञान आत्मसात करून त्याचा उपयोग करावा व जास्तीत जास्त उत्पादन घ्यावे. सद्यस्थितीत अशी २८ केंद्रे तिथे आहेत. भविष्यात त्यात वाढही होणार आहे. इस्रायल पंतप्रधानांच्या भारत दौºयामुळे दोन्ही देशातील संबंध अधिक मजबूत होतील. विशेष करून पाणी व कृषी क्षेत्राला त्याचा लाभ होईल. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री होते, तेव्हा त्यांनी कृषी क्षेत्राच्या विकासासाठी इस्रायलच्या तंत्रज्ञानाला प्रोत्साहन दिले होते. चर्चेदरम्यान ते मला म्हणाले होते इस्रायल व भारत जमिनीपासून वेगळे असले तरी, कृषी व पाण्याच्या संदर्भात एकमेकांशी जुळले आहेत.राजकीय संबंधाचे चांगले परिणाम१९९२ मध्ये इस्रायलशी वाढलेल्या राजकीय संबंधानंतर भारताच्या कृषी क्षेत्रात विशेष सुधारणा झाली आहे. १९९२ मध्ये सूक्ष्म सिंचन व ठिबक सिंचनाचा वार्षिक बाजार केवळ काही लाख डॉलर होता. परंतु हे संबंध स्थापन झाल्यानंतर हा सिंचनाचा बाजार एक अरब डॉलर झाला आहे. यात इस्रायलच्या प्रगत तंत्रज्ञानाचा आधार आहे. येणाºया वर्षात हा व्यापार दोन अरब डॉलरपर्यंत पोहचू शकतो. त्यामुळे शेतक-यांचे उत्पादन व उत्पन्नसुद्धा दुप्पट होईल, अशी अपेक्षा आहे.भारतातील कृषीची स्थितीभारत हा कृषिप्रधान देश आहे. ५० टक्क्याहून अधिक जनता कृषी क्षेत्राशी जुळली आहे. त्यामुळे कृषीचे देशाच्या जीडीपीमध्ये १९ टक्के योगदान आहे. भारतात शेतकºयांची संख्या किमान १३ कोटी आहे. यात बहुतांश शेतकºयांची शेती मर्यादित आहे. साधारणत: एक हेक्टरपेक्षा कमी आहे. त्याचा उत्पादनावरही प्रभाव पडतो आहे. भारतातील शेती ही मान्सूनवर निर्भर असून तंत्रज्ञानाच्या दृष्टिकोनातून अप्रगत आहे. सिंचनाची भारतात नियमित अंमलबजावणी करण्यात येणारी पद्धत म्हणजे पावसाळ््यातील पाण्यावरील सिंचन. परंतु या पद्धतीची उपयोगिता अत्यल्प आहे. यात ५० ते ६० टक्के पाणी व उर्वरकांचा अपव्यय होऊन उत्पादन कमी होते. वेळेनुसार भारत सरकारने पाण्यासाठी तंत्रज्ञानाचा अवलंब केला आहे. त्यातून नदीच्या पाण्याला जिथे गरज आहे तिथे पोहचविले आहे. तरीसुद्धा जगभरातील शेतकºयांसारखा भारतातील शेतक-यांनासुद्धा अतिवृष्टी, दुष्काळाचा सामना करावा लागतो आहे. सिंचनासाठी भारतात पाण्याची कमतरता आहे. त्यामुळे बरेच शेतकरी आजही वरच्या पाण्यावर अवलंबून असतात. त्याचा परिणाम शेतक-यांवर होऊन ते आत्महत्या करीत आहेत. पाण्याची कमतरता व कृषी क्षेत्र कमी असल्याने देशातील अन्नधान्याची गरज पूर्ण करण्यासाठी शेतकºयांना सूक्ष्म सिंचन, ठिबक तसेच स्प्रिंकलर सिंचनाचा वापर करणे आवश्यक आहे. इस्रायलने हे तंत्रज्ञान स्वीकारले आहे.
(लेखक हे आंतरराष्ट्रीय कृषितज्ज्ञ व इस्रायल इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजीचे माजी प्राध्यापक आहेत)