जवाहरलाल दर्डा : संपन्न जीवनाची संक्षिप्त कहाणी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2022 12:01 PM2022-07-02T12:01:03+5:302022-07-02T12:01:41+5:30
‘भारत छोडो’ आंदोलनात वयाच्या १९व्या वर्षी १ वर्ष ९ महिन्यांचा कारावास.
- जन्म : २ जुलै १९२३, बाभूळगाव (जि. यवतमाळ)
- १९४० : स्वातंत्र्य आंदोलनात उडी
- १९४२ : ‘भारत छोडो’ आंदोलनात वयाच्या १९व्या वर्षी १ वर्ष ९ महिन्यांचा कारावास.
- १९४२ : जबलपूर कारागृहात युवक मेळावा
- १९४४ : आझाद हिंद सेनेची यवतमाळ शाखा
- १९४५ : यंग असोसिएशनची स्थापना.
- १९४६-५६ : यवतमाळ शहर काँग्रेसचे अध्यक्ष
- १९५२ : यवतमाळ येथून ‘लोकमत’ साप्ताहिकाचे प्रकाशन सुरू.
- १९५८ : पं. जवाहरलाल नेहरू यांची यवतमाळ येथे भेट. भूदान आंदोलनात सक्रिय सहभाग.
- १९५९-६० : यवतमाळ जिल्ह्यात सर्वप्रथम महाविद्यालयाची स्थापना.
- १९६०-६८ : यवतमाळ जिल्हा काँग्रेस अध्यक्ष
- १९६० : साप्ताहिक ‘लोकमत’चे द्विसाप्ताहिकात रूपांतर.
- १९६५-६७ : महाराष्ट्र राज्य हाउसिंग फायनान्स सोसायटीचे उपाध्यक्ष. महाराष्ट्र राज्य लघुउद्योग विकास मंडळाचे संचालक.
- १९६७ : हाउसिंग फायनान्स सोसायटीच्या अध्यक्षपदी निवड.
- १९७० : पोलंड, इंग्लड, फ्रान्स, इटली, जर्मनी देशांचा अभ्यास दौरा.
- १५ डिसेंबर १९७१ : ‘लोकमत’चे दैनिकात रूपांतर. मुख्य संपादक म्हणून कार्य.
- १९७२ : महाराष्ट्र विधान परिषदेवर राज्यपालांकडून नामनियुक्ती.
- १९७८ : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे कोषाध्यक्ष.
- १९७८ : वसंतदादा पाटील मंत्रिमंडळात ऊर्जा, क्रीडा व युवक कार्यमंत्री
- १९७८ : विधान परिषदेवर नियुक्ती.
- १९८० : अंतुले मंत्रिमंडळात उद्योगमंत्री
- १९८५ : वसंतदादा मंत्रिमंडळात पाटबंधारे आणि पर्यटन मंत्री
- १९८५ : निलंगेकर मंत्रिमंडळात ऊर्जा आणि सांस्कृतिक कार्य मंत्री
- १९८८ : शरद पवार मंत्रिमंडळात आरोग्य मंत्री
- १९९१ : सुधाकरराव नाईक मंत्रिमंडळात अन्न व नागरी पुरवठा, वस्त्रोद्योग व पर्यावरण मंत्री
- १९९२ : सुधाकरराव नाईक मंत्रिमंडळात नगरविकास, वस्त्रोद्योग व पर्यावरण मंत्री
- १९९३ : शरद पवार मंत्रिमंडळात उद्योग मंत्री
- २५ नोव्हेंबर १९९७ : मुंबईत निधन.
स्मृतिग्रंथातून साभार -
ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांनी लिहिलेला ‘बाबूजी’ हा स्मृतिग्रंथ जन्मशताब्दी प्रारंभ सोहळ्यात प्रकाशित होत आहे. त्या ग्रंथातील निवडक लेखांचे हे संपादित संकलन.