शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : शरद पवारांच्या राष्ट्रवादीला केवळ 10 जागांवरच मानावं लागलं समाधान; कुठे कोण जिंकलं? बघा संपूर्ण लिस्ट
2
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: PM नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात १० प्रचारसभा; भाजपासह महायुतीचे किती उमेदवार विजयी झाले?
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठी उलथापालथ; शेवटच्या फेरीत काँग्रेसने मारली बाजी
4
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: लाडक्या बहिणींची नारीशक्ती, भीमशक्तीमुळे महायुतीचा ऐतिहासिक महाविजय: रामदास आठवले
5
महाराष्ट्रात भाजपने 148 पैकी 132 जागा जिंकल्याच कशा? काँग्रेसने उपस्थित केला प्रश्न...
6
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “विधानसभा पराभवावर चिंतन करु, जनतेच्या प्रश्नासाठी काँग्रेस काम करत राहील”: नाना पटोले
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : महाराष्ट्रात ओवेसींचं '15 मिनिट'चं राजकारण 'फुस्स'; AIMIM चे 16 पैकी 15 उमेदवार पराभूत
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण ते नवाब मलिक...; या 17 मोठ्या नेत्यांना चाखावी लागली पराभवाची धूळ...!
9
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
10
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
11
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
12
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
13
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
14
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
15
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
16
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
17
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
18
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
19
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...
20
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...

पठाणकोट वायुसेना विमान स्थळावर जैशे मुहम्मदचा हल्ला

By admin | Published: January 04, 2016 10:38 PM

पंजाबमधील पठाणकोट येथील वायुसेनेच्या तळावर तीन दिवसांपासून सुरु असलेल्या दहशतवाद्यांशी दोन हात करताना आपल्या शूर वीर सैनिकांचा त्याग, कर्तव्यनिष्ठा आणि बलिदान पाहून हळह्ळ तर होतेच

- ब्रिगेडियर एस. एम. जोशी (निवृत्त)
 
पंजाबमधील पठाणकोट येथील वायुसेनेच्या तळावर तीन दिवसांपासून सुरु असलेल्या दहशतवाद्यांशी दोन हात करताना आपल्या शूर वीर सैनिकांचा त्याग, कर्तव्यनिष्ठा आणि बलिदान पाहून हळह्ळ तर होतेच, पण आपल्या ‘नेता’ आणि ‘बाबू’ लोकांना प्रत्येक वेळी तीच घोडचूक करायची हुक्की कशी येते हे विस्मयजनकच आहे ! 
 
पहिली घोडचूक  
पोलिस सुपरीनटेन्डेन्ट  सलिंदर सिंग यांनी, जेव्हा जैशे मुहम्मदच्या अतिरेक्यांनशी त्याची इनोव्हा बळकावून झालेल्या प्रकरणावर सूचना दिली तेव्हाच आपल्याला जागरूक होवून कळायला हवं होते, की पाकिस्तानचा ISI चा proxy जैशे मुहम्मदला, शिखंडी करून, त्यांच्या कराचीच्या नौकादळ विमानस्थळवर तालिबान आक्रमणाची पुनरावृत्ती, आपल्या पठाणकोटच्या वायुसेनेच्या विमानतळावर डावसाधून हल्ला करणार आहे. लगेच वेळ न घालवता जवळच्या इन्फंट्री ब्रिगेड नी, त्याच रात्री आपल्या Quick Reaction Teams ना त्याच्या बाहेरच्या बाजूने परिक्रमेवर विळखा घालून, Perimeter Wire Fence & Wall, अभेद्य करायला हवी होती. एकदा अतिरेकी आत घुसले, त्यानंतर आता ६४ तास झाले आणि तरी कमीत कमी दोन अतिरेकी लढत देत होते, शेवटी आज संध्याकाळी सुमारे चार वाजेपर्यन्त त्यांना कंठस्नान घालण्यात आले . आपण NSG चे Bomb Disposal Unit निष्णात लेफ्टनंट करनल निरंजन कुमार, होनोररी मेजर, सूबेदार फतेह सिंह (कॉमनवेल्थ गेम्स स्वर्ण व रजत पदक विजेते) आणि पाच शूरवीर जसे की गरुड कमांडो गुरसेवक सिंह, हवलदार राणा, हुतात्मा झाले.
 
दुसरी घोडचूक
अतिरेक्यांची आपल्या handlers/ commanders शी पाकिस्तानचे मोबाईल वर संभाषण आपल्या Intelligence units नी intercept केले होते. ह्याचा सदुपयोग पूर्णपणे आपण घेतला नाही. इतका दारुगोळा, मशीनगन, रॉकेट लोन्चर, हातगोळे घेउन ते सहा अतिरेकी, उंच भिंत चढून, आत शिरले, ही एक मोठी विफलता, आपण कबूल केली पाहिजे.
 
पहिली मोठी सफलता
अतिरेकी आत घुसले पण त्यांना आपल्या थल सेना, NSG आणि वायुसेना कमांडोनी मिग २१ फायटर विमान, आणि मी ८, मी ३५ व इतर विमाना जवळ जाऊ दिले नाही. 
 
दुसरी मोठी सफलता
अश्या आणि बाणी च्या प्रसंगी पूर्ण देश परत एकजूट झाला, आपले ‘नेता’ वगळून. अजित डोवल, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार नी , नेहमी प्रमाणे उत्तम कामगिरी बजावली आहे, पण ते CDS (Chief of Defence Staff) नाही आहेत. ते Intelligence आणि, राजकिय पातळीवर सुरक्षा वर पाहणी करतात. शत्रु शी कशे झुंजावे हे Chief of Defence Staff कडेच असावे. ह्या घटने मुळे परत आपल्या उच्चस्तर सुरक्षाव्यवस्थे वर परत प्रश्न चिन्ह उठले आहे.     
           
भारताची उच्च स्तर सुरक्षा व्यवस्थाच्या अत्यावश्यक सुधारणा...
चेयरमन चीफ्स ऑफ स्टाफ कमिटीचे (COSC) अध्यक्ष की चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS)
१. आज,  ०४ जानेवारी २०१६ ला, ऐयर चीफ मार्शल अरुप राहा, वायु सेना अध्यक्ष आहेत. ते, तिन्ही सेनापतीत सगळ्यात आधी, आपल्या सर्विस चे अध्यक्ष झाले होते, म्हणून चेयरमन चीफ्स ऑफ स्टाफ कमिटीचे (COSC) अध्यक्ष पण आहेत. पण असं पुष्कळदा नसते, की, जो  सेनाधीश सगळ्यात आधी आपल्या स्वतः च्या सेनेचा अध्यक्ष झाला असेल, तो तिन्ही सेना अध्यक्ष मध्ये सगळ्यात सीनियर पण असेल. मुख्य म्हणजे, आजच्या सामरिक सुरक्षा वातावरणात ह्या दोन्ही जबाबदाऱ्या एकानेच सांभाळणे अत्यंत अवगढ असते. म्हणून, सगळ्या आधुनिक मोठ्या गणतंत्र देशातील सर्वोच्च सेनापतीपद, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) कडे असते. हे गृहितच आहे की, तो तिन्ही सेन्ध्याक्षांचा पण सेनापती असतो, आणि त्यांना अनुभव आणि पदाने सीनियर असतो.
२. ‘बाबू’ लोकांना हे नको आहे, कारण त्यांना वाटते की चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS), थेट रक्षा मंत्री आणि पंत प्रधानांशी सम्पर्क साधेल आणि त्यांचे महात्म्य कमी होईल. पण ह्या सुधाराची अत्यंत तातडीने गरज आहे, आधीच फार उशीर झालाय! आधुनिक युध्द त्रिदलानी पूर्ण पणे एकत्रित होऊन लढावे लागणार आहे. १९७१चे चमत्कार २०१६च्या वातावरणात जुन्या व्यव्स्थेनी करणे असंभव आहे. ‘बाबू’ लोकांनी नेत्यांच्या मनात जी १९४७ पासून भीती भरली आहे की त्रिद्लाचा मुख्य पूर्ण सत्ता आपल्या हाती घेईल, एकदम हास्यास्पद आहे...___
पंत प्रधानांचे त्रिदलाचे सर्वोच्च अधिकाऱ्यांना नुकतेच केलेले राष्ट्रीय सुरक्षा संबंधी वार्षिक संभाषण..
 
३. पंतप्रधानानी आपल्या वार्षिक भाशणात स्पष्टपणे दर्शवले की आपल्या देशा समोर मुख्यता चीन, पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका आणि अफगानिस्तान पासून कितपत धोका आहे आणि त्याबद्दल आपण तयारी करायला हवी आणि अत्यंत सावध असावे.  तरीसुद्धा अडथळे, अतिरेकी हल्ले होण्याची पण पूर्ण शक्यता आहे. नेपाळ च्या नुकत्याच झाल्येल्या निवडणूकीत, त्यांचे सहा वर्षे सतावणारे प्रश्न सोडवायचे सोडून, अधिकच गुंतवले आहेत. नवीन संविधान सभा त्रिशंकू आहे. मधेसी समस्या, परत नेपाळ ला चीन च्या पाशात जायला बाध्य करणार असे वाटते
४. बांगलादेशच्या निवडणूकीत, शेख हसीना नी  बेगम खालिदा झिया ला हरवून हाती परत सत्ता घेतली. बेगम खालिदा झिया ची भारत विरोधी अतिरेक्यांशी साठगाठ आहे, आणि तिथून आपल्याला अत्यंत सावध राहणे अत्यंत गरजेचे आहे. श्रीलंकेशी पण तमिळ लोकांच्या वर अत्याचार, पंत प्रधानांचे CHOGM चे कोलंबो मीटिंगला न गेल्या मुळे वाद, आपल्या नाविकांचा छळ, ह्या वादामुळे आपले सम्बंध चिघळले आहेत. आपल्या उत्तर पश्चिम आणि 
मध्य पश्चिमे कडे जे तालिबान/ अल कायदा अतिरेक्यांचा तांडव माजलाय, त्याने भारतीय मुळच्या ७० लाख लोकांना दुबई, कुवेत आणि पूर्ण इराणी ‘गल्फ’ मध्ये आपली जीविका/ नोकऱ्या सोडा, जीवाला पण धोका आहे.
५. पंतप्रधान अपल्या समुद्र वाहतुकीची सुरक्षा बद्दल सुद्धा स्पष्ट म्हणाले, आपल्या सामरिक गर्जीच्या तेल, खनिज आणि इंजिनियरी यंत्र/ तंत्र च्या आदान/ प्रदान मध्ये व्यत्यय कदापि नाही यायला पाहिजे. एशिया/ प्रशांत सागर भागात चीन, जापान, दक्षिण कोरिया मध्ये तणाव वर सुद्धा त्यांनी सूक्ष्म लक्ष ठेवण्यावर भर घातली. विमान वाहक पोत ‘विक्रमादित्य’ (  नाविन्याने तैय्यार केलेले Aircraft Carrier, Soviet ‘Admiral Gorshkov’) नी आपले नौदल बलाढ्य झाले आहे, पण चीन ची ह्या क्षेत्रात प्रगति आपल्या पेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे. ‘तेजस’ , आपले स्वतः चे नवीन सुपरसोनिक जेट विमान, वायू सेनेच्यात वापारण्या करता अजून पुष्कळ वेळ आहे.
६.त्यांनी सगळ्या मिलिटरी कमांडर ना आपल्या देशाची सामरिक शस्त्रास्त्रे स्वतः बनवण्याचे सामर्थ्य वाढव्ण्याकडे लक्ष देण्यास आवर्जून आव्हान केले. रक्षा मंत्रालय, त्रिदल आणि रक्षा अनुसंधान नी एकत्र येऊन हे साधायला पाहिजे. ह्यात प्राइव्हेट, पब्लिक सेक्टर च्या ताकतीला पण पणाला लावायला हवे.
 
पंतप्रधानांचे वक्तव्य आणि प्रतय्क्ष करणीत विरोधाभास
 
७.पूर्व कॅबिनेट सचिव नरेश चन्द्रांच्या अध्यक्षतेत एक टास्क फोर्स निर्माण केले होते ह्याच देशाच्या  सुरक्षे वरच्या त्रुटी सुधारण्या करता. सामरिक प्रद्योगिकी क्षेत्रात त्यांनी रक्षा फेक्टरी मध्ये FDI(Foreign Direct Investment) वाढ करण्याचे सुचवले होते. पण त्या वेळचे रक्षा मंत्री अन्तोनी नी २६% च्या वर FDI वाढवणे नकारले. सगळे विदेशी शस्त्र निर्माणकर्ते ‘चोर’ नसतात. कारगिलच्या युद्धात १५५ मि.मि. होवित्झर ‘बोफोर्स’ नी उत्तम कामगिरी केली होती. पण आपण त्यांना ‘ब्लेक लिस्ट’ केले होते, आणि गर्जेपोटी १९९८ मधे तीनपट किंमत देवून आपणाला त्याचे अम्युनिशन आणावे लागले! आपणास तेव्हां हे पण कळले की करारा प्रमाणे स्वीडन ने आपणास सगळी Technology Transfer ची माहिती दहा वर्ष आधीच दिली होती, आणि आपण दोन दशक राजकारणे पोटी ही उत्तम तोफ स्वतः बनवण्याची संधी गमावली होती.
८.पंतप्रधान (वित्त मंत्री जेटली मुळे) नी रक्षा मंत्रालय चे बजेट पण कमी होण्याची शक्यता बद्दल इशारा केला. पण तो आधीच आपल्या GDP चा दोन प्रतिशतच आहे, आणि आपण चीन आणि आपल्या मधे जो अत्यंत मोठा आणि सतत वाढत चाललेला अंतर कसा आवरू हा प्रश्न महत्वाचा आहे. पंत प्रधान देशाचे CEO आहेत. कन्सल्टन्ट नाहीत. एकदा तुम्ही देशाची सुरक्षा व्यवस्थेची समीक्षा केली, त्यातून ज्या समस्या आणि त्यांचे निवारण सुद्धा तुमचेच परम कर्तव्य आहे. आता तुम्ही फक्त भाषण करणारे नाही राहिलात? पण तुम्ही मे २०१४ पासून आमचे पंतप्रधान आहात!
९. शेवटी, परत आचार्य अत्रे जे म्हणाले होते, तेच आपल्या ‘नेता’ ना सांगावे असे वाटते, ‘नेता. कुठे नेता?’ ह्या वेळी जें हुतात्मे झाले, त्यांच्या अंत्येष्टी संस्कार साठी ‘हे नेते’ ‘Photo Op’ करता दिसले. मला एवढेच   म्हणायचे आहे की त्यां हुतात्म्यांच्या विधवा आणि आप्तजनांची योग्य ते पेंशन, शिक्षण, भविष्य, ह्याच्या कडे पण लक्ष द्या ! जेंव्हा हा प्रश्न येतो, अशे ‘नेता’ फ़्क़्त ‘बाबू’ लोकांच ऐकतात, आणि १९४७ पासून जी दुर्दशा सुरक्षा सैनिकांची ह्या ‘बाबू’ लोकांनी केली आहे, हे बघून चीन, पाकिस्तान ची फौज कशी हसत असेल ते म्हणायलाच नको.