- डॉ़ गोविंद काळेपूजा संपन्न झाली़ नवदाम्पत्याने पुरोहिताच्या पायावर डोके टेकवले़ कल्याणमस्तु! कल्याणमस्तु! असा भरभरून आशीर्वाद पुरोहितांनी दिला़ धर्मकृत्य करणाऱ्यांना आशीर्वाद लाभतो़ धर्मकृत्य करणे ज्याला शक्य होत नाही तो कुणापुढे नतमस्तक होणार? त्या गरिबाला कोण आशीर्वाद देणार? ज्याला नतमस्तक होणे जमेल नाही त्याचा वाली कोण? रखवाला कोण? ‘जन हे सुखाचे। दिल्या घेतल्याचे’ आशीर्वादसुद्धा काहीतरी दिले तरच मिळतो़ ‘कल्याण या आशीर्वादे। जाती द्वंद्वे नासोनि’ अशी आशीर्वादाची महती तुकाराम महाराज गातात़ जीवनातील किंकर्तव्यमूढतेचे द्वंद्व नाहीसे करण्याची ताकद केवळ आशीर्वाद या चार अक्षरात आहे़‘कल्याण’ शब्दाची परम कल्याण करणारी ताकद समर्थांनी ओळखली नव्हे तर अनुभवली होती़ माणुसकीचा गहिवर दाटून आल्यामुळेच तर त्यांना रामरायाला साकडे घालावे लागले़ विशालबुद्धीच्या व्यासांनासुद्धा वैताग आला असावा असे अनुमान करण्यास जागा आहे़ कळत नकळत का होईना पण ते लिहून गेले ‘न कश्र्चित् श्रुणोति माम्’ माझे कुणी ऐकतच नाही अशी खंत ते व्यक्त करतात़ समर्थ तर एक पाऊल व्यासांच्याही पुढे होते़ जनसामान्यांची चिंता समर्थांना अधिक लागली होती़ ते लिहिते झाले ‘अपराधी जन चुकतची गेले। तुझा तुची सावरी । कल्याण करी रामराया’ चुकीच्या मार्गावर पाऊल पडले! हजारो अपराध जनसामान्यांकडून झाले तरी त्यांना सावरले पाहिजे़जनहिताच्या चार गोष्टी सांगितल्या पाहिजेत़ त्यांचे दु:ख कोण हरण करणार? सगळेच हाताबाहेर चालले आहे़ चारशे वर्षांपूर्वी समर्थांनी जनसामान्यांची होणारी ससेहोलपट ओळखली होती़ ‘कोठे जावे काय करावे / आरंभिली बोहरी’ बोहरी म्हणजे सर्वनाश़ जनसामान्यांचे जगणे फार कठीण होत चालले आहे़ कठीण करिता कठिणची झाले’ अशावेळी रामराया तूच धावून आले पाहिजेस़ त्यांचे दु:ख निवारण केले पाहिजे़ समर्थ पुढे लिहितात़ ‘दास म्हणे आम्ही केले, पावलो/दयेसी नाही सरी’़आपदाम् अपहर्तारम् / दातारं सर्व संपदाम्’ हाच तर तुझा लौकिक़ यासाठी तर तुझा डंका पिटायचा. ‘राम राम इति गर्जनम़्’ आताचा काळ तर खूपच अवघड़ रामनामाचे सर्वांनाच वावडे़ राम भेटणार तरी कोठे? तुकोबाराय सरळ रामदूताला म्हणजे हनुमानालाच शरण गेले़ दूताच्या भक्तीची ताकद त्यांना माहीत होती़ ‘शरण शरण हनुमंता / तुज आलो रामदूता/ काय भक्तीच्या या वाटा/ मज दावाव्या सुभटा/
कल्याण करी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 04, 2018 12:21 AM