शहरं
Join us  
Trending Stories
1
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
2
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
3
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
4
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
5
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
6
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
7
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
8
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
9
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
10
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
11
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”
12
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप
13
अजित पवारांची राष्ट्रवादी मोठा विस्तार करणार, दिल्लीतही निवडणूक लढणार; प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा
14
SA vs SL Test : श्रीलंकेचा संघ ४२ धावांत All Out! ६४ ओव्हर्समध्ये पडल्या २० विकेट्स
15
'ये है मोहोब्बते' फेम अभिनेत्याचा झाला साखरपुडा, होणाऱ्या बायकोसाठी लिहिली सुंदर पोस्ट
16
“लिहून ठेवा, एक दिवस उद्धव ठाकरे कुटुंबाला घेऊन देश सोडून निघून जातील”: रामदास कदम
17
रोहित शर्माची ऑस्ट्रेलियन संसदेत 'बोलंदाजी'; शेअर केल्या ऑस्ट्रेलियन दौऱ्यातील खास गोष्टी
18
बच्चू कडू यांचे राणा दाम्पत्यास आव्हान; म्हणाले, "पुन्हा निवडणूक घ्या..."
19
मराठी सिनेमे डब का होत नाहीत? नाना पाटेकरांनी व्यक्त केली खंत; 'फुलवंती' चं नाव घेत म्हणाले...
20
शुक्र-अरुण ग्रहाचा नवपंचम योग: ६ राशींना वरदान, हाती लागेल घबाड; व्हाल मालामाल, शुभ-लाभ काळ!

करम की गती न्यारी...

By admin | Published: January 06, 2017 11:36 PM

सूर्यबिंब क्षितिजावर येण्यापूर्वीच सृष्टी तेजाळली. पहाटेची चाहूल लागताच फुले उमलली.

सूर्यबिंब क्षितिजावर येण्यापूर्वीच सृष्टी तेजाळली. पहाटेची चाहूल लागताच फुले उमलली. पाखरांची चिवचिव सुरू झाली. नव्या वर्षाचे नवे पान केव्हाच उघडले आहे. पण अजूनही ते जाणवते आहे. नवे वर्ष चांगले जाईल अशी उमेद, असा विश्वास प्रत्येक व्यक्ती मनात बाळगत असते आणि भेटणाऱ्या घरच्या आणि बाहेरच्या साऱ्यांना ‘हे वर्ष आनंदाचे जावो’ अशा शुभेच्छा प्रसन्नपणे, दिलखुलासपणे देत असते.‘गेल्या गोष्टी स्मरू नका! गतकाळाचा शोक फुका’ यातील मर्म लक्षात घेऊन सरत्या वर्षातील जिवापाड कष्ट, मतभेद, राग, द्वेष सारे विसरण्याचा प्रयत्न करायचा असा नववर्षाचा प्रत्यक्षात आणायला कठीण असा एक संकल्प समोर ठेवता येतो. गेलेल्या प्रत्येक वर्षासारखेच एका छापाचे हेही वर्ष असा उदास सूरही नको. जसे अर्धवट उमललेले, न चुरडलेले, न चुरगळलेले पण सुगंधाने घमघमणारे फूल असते, तसेच अज्ञात भविष्य घेऊन येणारे अम्लान नवे वर्ष असते. भविष्यकाळ वा अज्ञाताविषयीची अनावर ओढ प्रत्येकाला अस्वस्थ करते. हा क्षणभराचे वर्तमान घेऊन येणारा प्रत्येक काळ, कर्तृत्व गाजवायला पुकारत असतो. ‘करम की गत न्यारी’ म्हणत काही अनुत्तरित प्रश्नही विचारवंतांनी विचारले आहेत. बगळ्याला पांढराशुभ्र वर्ण तर पंचमात गाणारा कोकिळ काळा का? नदीचे पाणी गोड तर समुद्राचे पाणी खारे का? विद्वानांना दारिद्र्याचा शाप तर मूर्खांच्या वाट्याला राज्यपद कसे?महाभारतातील कर्णाने सडेतोडपणे म्हटले आहे की कोणत्या कुळात जन्माला येणार हे दैवाधीन असले तरी नाव कमावणे हे तर प्रत्येकाच्या हातात असते. तरीही आपल्या अपयशाचे खापर कुटुंबावर, समाजावर, परिस्थितीवर नाहीतर ‘पाषाणाचे पोटी बैसला दुर्दूर (बेडूक)। तयामुखी चार कोण घाली’ असे दैवाला श्रेय दिले जाते.भावनिक तोल साधायला सख्खे भावंडही आजच्या काळात दुर्मिळ झाले आहे. नाती लयास जाण्याच्या मार्गावर आहेत. दुसऱ्यांना अपयश आले तर मला काय त्याचे? माझ्या वाट्याला फक्त यशच यावे ही जिद्द पराकोटीला पोहोचते आहे. आई-वडिलांचे किमती मार्गदर्शक वागणे मुलांच्या वाट्याला अनेकदा येत नाही किंवा ज्यांना मिळते त्यांना त्याची किंमत वाटत नाही.तरीही गाण्याची मधुर धून मनाला मोहवते. व्याधींनी ग्रासले जीव पाहिले की, वाट्याला आलेली वर्षे आपण कुरकुरत का घालवतो हा प्रश्न जागतो. कोवळ्या पालवीवर प्रकाशाची तिरीप नाचावी तसे प्रतिभावंतांच्या कार्याची आठवण होऊन चेहऱ्यावर समाधान जागते. गरिबी, अपयश, मानापमान ही काटेरी दु:खे, धन-चैन सारे विसरून तन्मयतेने ध्येयवेडे लोग जग घडवतात. कृतीतून सांगतात की ‘स्वत:चे उन्नयन स्वत:च्याच हातात असते. ‘उद्धरेदात्मनात्मानं’ हे गीतेचे (अ ६.५) सांगणे आहे. नव्या वर्षात त्याची आठवण मनात सतत ठेवणे हेच यशाकडे नेऊ शकेल.-डॉ. सौ. प्रज्ञा आपटे