- अतुल कुलकर्णीजगावं की मरावं,हा कसला दळभद्री सवाल आहे?युती ठेवावी की तोडावी,हाच मिलियन डॉलर सवाल आहे...!काहीच न मिळणाऱ्या सत्तेच्या दारावरवाईटपणाचा भागीदार होऊनजगावं बेशरम लाचार आनंदानं,की फेकून द्यावं सत्तेचं हे लोढणंत्यात गुंडाळलेल्या नको त्या आमिषांसह...जनतेच्या मतदारसंघरूपी दारामध्ये...आणि करावा या सर्वांचा शेवटएकाच प्रहारानेनतद्रष्ट सत्तेचा आणि कमळाबाईचाही...यांचा, त्यांचा आणि सगळ्यांचा...?युती तोडण्याच्या निर्णयानेत्यांच्या अस्तित्वालाच असा डंख मारावाकी नंतर येणाºया कोणत्याहीदाढीवाल्याला धनुष्याच्या प्रत्यंचेलाहात लावताना विचार करावा लागेल...आणि त्यातून येणाºया निद्रानाशालानसेल कधीच उतारा...म्हणूनच म्हणतोय हे नियंत्या...जगावं की मरावं,हा कसला दळभद्री सवाल आहे?युती ठेवावी की तोडावी,हाच मिलियन डॉलर सवाल आहे...!जरी त्या निद्रानाशेतहीपुन्हा स्वप्न पडू लागली तर...?तर... इथंच मेख आहे...त्यांच्या नव्या पक्षांच्या ओळखीनंआहे तेही सत्तेचे ताटहिरावून तर जाणार नाही ना...त्यासाठीच निर्णय घेण्याचा धीर होत नाहीयं!म्हणून आम्ही सहन करतोय,या कमळाबाईचं लोढणं...हे जुनं जागेपण सहन करतोय;विरोधकांच्या निर्जीवपणानं...आमच्याच अभिमानावर होणारं अतिक्रमणअस्तित्वाच्या गाभाºयात असलेल्या सत्वाचीविटंबना अशी किती रे पाहायची करुणाकरा?म्हणूनच म्हणतोय हे नियंत्या...जगावं की मरावं,हा कसला दळभद्री सवाल आहे?युती ठेवावी की तोडावी,हाच मिलियन डॉलर सवाल आहे...!अखेर सत्तेसाठीचा कटोरा घेऊनका उभे राहतोय आम्ही खालच्या मानेनं...आम्हाला संपवायला निघालेल्यांच्या दारात?विधात्या, तू इतका कठोर का झालास...?एका बाजूला, आम्ही ज्यांनालहान भावासारखे वाढवले,तेच आज आमच्या डोक्यावर बसलेत...आणि दुसºया बाजूलाआम्ही ज्यांना जन्म दिला तेही आम्हालास्वाभिमान शिकवत त्यांच्याच दारी गेले...!ज्यांना आम्ही सत्तासोपानाच्यापायºया दाखवल्या,तेच आता आमच्याशीफितुरीची भाषा करतात...आणि आम्हालाच शिकवतातसत्तेत राहण्याचे फायदे-तोटे...हे करुणाकरा, आमच्याच फितुरांच्या अशावागण्यानं विस्कटणाºया पक्षाचंहे ओझं घेऊन आम्ही जायचं तरी कुठे...?म्हणूनच म्हणतोय, युती ठेवावी की तोडावी?हाच मिलियन डॉलर सवाल आहे...!(तिरकस)
युती ठेवावी की तोडावी...?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2018 2:57 AM