शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
2
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
3
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
4
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
5
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
6
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
7
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
8
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
9
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
10
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
11
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
12
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
13
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
15
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द
16
शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र, त्यांची गाजलेली ही मालिका पुन्हा भेटीला
17
Maharashtra Election 2024: राहुल गांधींच्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी तीन घोषणा!
18
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
19
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
20
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान

खेडोपाडी काँग्रेस पोहोचवणारे देशभक्त केशवराव जेधे

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2021 5:03 AM

आज देशभक्त केशवराव जेधे यांची १२५ वी जयंती, त्यानिमित्ताने झंझावाती कर्तृत्व असलेल्या या नेत्याचे स्मरण!

- दिग्विजय जेधे, अध्यक्ष, देशभक्त केशवराव जेधे फाउंडेशन १९१७ साली भारतीय राजकारणात गांधीजींचा उदय झाला आणि राजकीय-सामाजिक स्तरावर नव्याने घुसळण होऊ लागली. राजकीय क्षितिजावर गांधींच्या उदयानंतर केशवराव जेधेंसारखा प्रागतिक-पुरोगामी विचारांचा युवक त्यांच्याकडे आकृष्ट होणं अगदीच स्वाभाविक होतं. १९३०पर्यंत महाराष्ट्र काँग्रेसमध्ये  टिळक-समर्थक केळकर गटाचं प्राबल्य होतं; पण १९३० नंतर ही सूत्रे शंकरराव देवांसारख्या गांधीवादी गटाकडे जाऊ लागली. यादरम्यान महाराष्ट्राच्या राजकीय प्रतलात निर्माण झालेली पोकळी केशवराव जेधेंसारख्या ब्राह्मणेतर नेत्याने  समर्थपणे भरून काढली. १९२४ ली सप्टेंबर महिन्यात महात्मा गांधी जेव्हा पुण्यात आले होते, तेव्हा त्यांचा स्वागत-कार्यक्रम जेधे मॅन्शनमध्येच आयोजित करण्यात आला होता. ब्रिटिश हाच आपला मुख्य शत्रू आहे त्यामुळे या बलाढ्य शत्रूला नामोहरम केल्यानंतर ब्राह्मण-ब्राह्मणेतर हा वाद सोडवला जाऊ शकतो, असे आवाहन महात्मा गांधीजींनी जेधे मॅन्शन इथल्या सभेत केले. याला प्रतिसाद देत केशवरावांनी आपला मोर्चा  ब्राह्मणेतर चळवळीकडून स्वातंत्र्य चळवळीकडे वळवला.

६ एप्रिल, १९३० रोजी महात्मा गांधींनी दांडी येथे मीठ उचलल्यानंतर  पुढे आठवडाभर केशवराव जेधे  विठ्ठल रामजी शिंदे, प्रा. धर्मानंद कोसंबी यांच्यासह पुण्याच्या पंचक्रोशीत फिरले.  मराठा समाजात जन्मलेले आणि कान्होजी-बाजी जेधेंचा जाज्ज्वल्य वारसा लाभलेले केशवराव  हे बहुजनांच्या, दलितांच्या वस्त्यांत जाऊ लागले आणि सत्याग्रहात सर्व जाती-धर्मांनी का सामील झाले पाहिजे, यावर प्रकाश टाकू लागले. कालांतराने गांधींच्या अनुयायांचंही अटकसत्र सुरू झालं. २६ जानेवारी १९३२ रोजी केशवराव जेधेंना अटक झाली आणि त्यांची रवानगी नाशिक कारागृहात करण्यात आली. या कारावासात सोबत असलेल्या काकासाहेब गाडगीळ यांच्याशी जेधेंचा मैत्रभाव वाढत गेला.१९३४ च्या एप्रिल महिन्यात गांधीजींनी चळवळ मागे घेतली आणि त्याच वेळी काँग्रेसजनांना निवडणुकीचे वेध लागले. मध्यवर्ती कायदेमंडळाच्या निवडणुकीसाठी ब्राह्मणेतरांचे नेते म्हणून केशवराव जेधे यांना पुणे प्रांतासाठी उमेदवारी द्यावी यासाठी काकासाहेब गाडगीळ आग्रही होते. शेवटी केशवराव  तयार झाले. सातारा जिल्ह्यातील जनतेने केशवरावांना बहुमतांनी निवडून दिले. 

१९३६ साली काँग्रेसच्या  फैजपूर अधिवेशनाची मुख्य जबाबदारी केशवरावांच्या खांद्यांवर होती. त्या काळी संदेशवहनाची आणि दळणवळणाची साधने आजच्या इतकी प्रभावी नक्कीच नव्हती. अशा प्रतिकूलतेतही केशवराव जेधेंनी कंबर कसली आणि मे ते डिसेंबर १९३६ या कालावधीत महाराष्ट्र अक्षरशः पिंजून काढला.  डिसेंबर महिन्यात भरलेल्या या ऐतिहासिक अधिवेशनाचे अध्यक्ष पंडित नेहरू यांच्यासमोर जवळपास साठ हजारांचा विराट जनसमुदाय होता. १९३८ साली महाराष्ट्र प्रांतिक काँग्रेस कमिटीचं अध्यक्षपद केशवरावांना मिळालं आणि काँग्रेस मजबूत व्हायला, तळागाळापर्यंत पोहोचायला आत्यंतिक मदत झाली. केशवराव जेधेंसारखा ब्राह्मणेतर नेता ब्राह्मणवादी गटाचं वर्चस्व असलेल्या काँग्रेस कमिटीचा अध्यक्ष व्हावा, ही घटना काँग्रेसच्या राजकारणाला नवं वळण देणारी ठरली. १९३७ साली ४६ हजार सभासद संख्या असलेली काँग्रेस केशवरावांनी अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर अवघ्या सहा महिन्यांत १ लाख ६३ हजार ८८० सभासदांची प्रचंड मोठा जनाधार असलेली चळवळ झाली. १९३७-३८ या काळात तर ब्राह्मणेतर पक्षातील अनेक प्रमुख कार्यकर्ते-नेते केशवरावांचा झंझावात पाहून प्रभावित झाले आणि स्वतःहून काँग्रेसमध्ये आले. पुणे जिल्हा लोकल बोर्डाचे अध्यक्ष शंकरराव मोरे यांच्यासह अनेक नेते आणि कार्यकर्ते काँग्रेसच्या छत्राखाली एकवटू लागले. 

काँग्रेस खऱ्या अर्थाने बहुजनांची होऊ लागली ती १९३८ नंतरच! मराठी प्रांतातल्या सर्वजातीय, सर्वधर्मीय बहुजनांना एका राष्ट्रव्यापी राजकीय चळवळीत आणि राजकारणाच्या मुख्य प्रवाहात सक्रिय करण्याचं  कार्य सर्वप्रथम कोणी केलं असेल तर ते केशवराव जेधेंनीच!  

टॅग्स :congressकाँग्रेस