शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

राजा एक घर मागं घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2018 12:42 AM

पेशवाईतील साडेतीन शहाण्यांपैकी सखारामबापू बोकील हे एक होते. युद्धकौशल्य व मुत्सद्दीपणात निपुण असलेल्या या बापूंनी नागपूरकर भोसल्यांच्या संदर्भात राघोबादादांना ‘राजा एक घर मागं घ्या’ हा सल्ला दिल्याची आख्यायिका आठवण्याचे कारण ठरले ते विधान परिषदेच्या बिनविरोध झालेल्या निवडणुकीमुळे.

पेशवाईतील साडेतीन शहाण्यांपैकी सखारामबापू बोकील हे एक होते. युद्धकौशल्य व मुत्सद्दीपणात निपुण असलेल्या या बापूंनी नागपूरकर भोसल्यांच्या संदर्भात राघोबादादांना ‘राजा एक घर मागं घ्या’ हा सल्ला दिल्याची आख्यायिका आठवण्याचे कारण ठरले ते विधान परिषदेच्या बिनविरोध झालेल्या निवडणुकीमुळे. केंद्रात भरभक्कम बहुमताची सत्ता प्राप्त केलेल्या भाजपाने नारायण राणे, रामदास आठवले व विनायक मेटे या रालोआतील घटक पक्षाच्या नेत्यांना भाजपाचे उमेदवार म्हणून राज्यसभेत धाडले. यापूर्वी रासपाचे महादेव जानकर यांनाही त्यांनी भाजपाच्या वतीने विधान परिषद दाखवली. मात्र यावेळी जानकर यांनी रासपातर्फे उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा हट्ट धरला. त्यामुळे जानकर यांच्यावरील दबाव वाढवण्याकरिता भाजपाने पृथ्वीराज देशमुख यांचा अर्ज भरून ठेवला होता. जानकर हे धनगर समाजाचे नेते आहे. त्यामुळे अगोदरच नाराज असलेल्या या समाजाची आणखी नाराजी ओढवून घेऊ नये याकरिता जानकर यांचा हट्ट भाजपा नेतृत्वाने मान्य केला. यापूर्वी मातोश्रीची पायरी न चढणारे भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी अलीकडेच मातोश्रीवर जाऊन चर्चा केली. त्यामुळे आता खरोखरच राजा एक घर किंवा वेळप्रसंगी अडीच घरे मागे घेण्याची वेळ आली आहे हे भाजपाच्या चाणाक्ष नेतृत्वाने ओळखले आहे. गेल्या चार वर्षांत अनेक छोट्या, प्रादेशिक पक्षांचे अस्तित्व बहुमताच्या ऐरावताच्या पायी चिरडले जाण्याची चिन्हे दिसत होती. मात्र आता मूठभर ताकद असलेले छोटे पक्ष भाजपाच्या ऐरावताला आपल्या तालावर नाचवू शकतील, याची ही चुणूक आहे. माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचे नातू व माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांचे पुतणे नीलय नाईक यांना मिळालेली संधी ही बंजारा समाजाच्या व्होटबँकेवर लक्ष ठेवून दिली आहे. नांदेड जिल्हा भाजपाचे अध्यक्ष राम पाटील रातोळीकर यांना आमदारकी देण्यामागे नांदेडमध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याशी दोन हात करण्याकरिता ताकद देणे हाच उद्देश आहे. शिवसेनेनी अलीकडेच मुंबई पदवीधर मतदारसंघातून विलास पोतनीस या ज्येष्ठ शिवसैनिकाला आमदारकी दिली. रातोळीकर अथवा पोतनीस अशा कार्यकर्त्यांच्या बळावरच येणाऱ्या निवडणुका भाजपा, शिवसेनेला लढवायच्या असल्याने आतापर्यंत आयारामांकरिता लाल गालिचे अंथरणाºया सत्ताधारी पक्षाने आता कार्यकर्ता हा सत्तेच्या केंद्रस्थानी राहील, याचा विचार गांभीर्याने केल्याचे हे संकेत आहेत. भाई गिरकर व अनिल परब यांना भाजपा, शिवसेना या पक्षांनी पुन्हा संधी देण्यामागे वेगवेगळे जातीसमूह सोबत राखणे व त्यांची सभागृहातील कामगिरी हीच कारणे आहेत. यापूर्वी भाजपामध्ये दीर्घकाळ सक्रिय असलेल्या व अल्पावधीत शिवसेनेत बस्तान बसवून आमदारकीची माळ गळ्यात पाडून घेण्यात यशस्वी झालेल्या मनीषा कायंदे यांना प्रभावी कामगिरी करण्याची संधी प्राप्त झाली आहे. शेकापचे जयंत पाटील हे कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत अधिकृतपणे राष्ट्रवादी सोबत होते. मात्र डावखरे यांच्याशी त्यांचे सौहार्द सर्वश्रुत आहे. याच आपल्या राजकीय चातुर्यावर पाटील यांनी पुन्हा सहा वर्षांच्या राजकीय कारकीर्दीचा बंदोबस्त केला आहे. ७८ सदस्य असलेल्या विधान परिषदेत सर्वाधिक २३ जागा प्राप्त करणारा भाजपा प्रथम क्रमांकाचा पक्ष झाला आहे. शिवसेना व दोन अपक्ष यांच्या मदतीने सत्ताधारी पक्षाचे संख्याबळ ३८ झाले आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शेकाप, लोकभारती, रिपाइं (कवाडे गट) आणि अपक्ष यांचे संख्याबळ ४० आहे. विधानसभेच्या निवडणुका जेमतेम वर्ष-दीड वर्षांवर येऊनही सत्ताधारी पक्षाला ज्येष्ठांच्या सभागृहात बहुमत प्राप्त करता आलेले नाही. अलीकडेच झालेल्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीला पानिपताच्या लढाईचे स्वरूप का प्राप्त झाले, त्याचे गमक या बहुमताच्या गणितात दडले आहे. सरकारची काही विधेयके विधान परिषदेत विरोधकांनी रोखली. ती पुन्हा विधानसभेत मांडून मंजूर करवून घेण्याचा द्राविडीप्राणायम करावा लागला. निवडणुका जसजशा जवळ येतील तसतसे निर्णय घेताना सत्ताधारी घायकुतीला येतील, अशावेळी संख्याबळ हा कळीचा मुद्दा ठरतो. हिवाळी अधिवेशनात शिवसेनेला उपसभापतिपद बहाल करून राजा आणखी एक घर मागे घेतला जाईल, हाच या निवडणुकीचा संदेश म्हणावा लागेल.

टॅग्स :BJPभाजपाMaharashtraमहाराष्ट्रPoliticsराजकारण