शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: 'शरद पवारांचे नाव घेतलं की अंगावर काटा येतो, त्यांच्यावर बोलणं..."; नरहरी झिरवाळांनी स्पष्टच सांगितलं
2
राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या १० प्रचार सभा; ८ नोव्हेंबरला पहिली सभा
3
लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने पप्पू यादवांना धमकावणाऱ्याला अटक; मेव्हणीचं सिम वापरुन केला प्लॅन
4
'आयाराम गयाराम' ही म्हण राजकारणात कधी आली?; आमदाराने चक्क एका दिवसात २ पक्ष बदलले
5
सुनील केदार समर्थकांच्या बंडखोरीनं मविआत संताप; ठाकरे-पवारांच्या उमेदवारांना फटका?
6
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या युवतीच्या मृत्यूचं रहस्य; फ्लॅटमध्ये आढळला मृतदेह
7
देवेंद्र फडणवीसांच्या सुरक्षेत अचानक वाढ, तपास यंत्रणा अलर्ट; नेमकं काय घडलं?
8
मराठा उमेदवारांबाबत रविवारी होणार निर्णय; अंतरवली सराटीत येण्याचे मनोज जरांगेंचे आवाहन
9
वेगवेगळ्या चकमकीत 3 दहशतवाद्यांचा खात्मा; ज्या घरात अडकले होते, त्यालाच जवानांनी लावली आग
10
Rajnath Singh : "अशी परिस्थिती येईल जेव्हा..."; दहशतवादी हल्ल्यांबाबत राजनाथ सिंह यांची मोठी भविष्यवाणी
11
IND vs NZ, 3rd Test Day 2 Stumps: दुसऱ्या दिवशी १५ विकेट्स; तिसऱ्या दिवशीच फुटणार विजयाचे फटाके?
12
केरळमध्ये ट्रॅक साफ करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ट्रेनने उडवलं; चौघांचा मृत्यू, एकाचा मृतदेह सापडेना
13
Vidhan Sabha Election: मतदान ओळखपत्र नसेल तर काळजी नको, हे १२ पुरावे चालतील; वाचा संपूर्ण लिस्ट!
14
"अजित पवारांना घोटाळ्यावरुन ब्लॅकमेल केलं"; जयंत पाटलांच्या आरोपांवर फडणवीस म्हणाले, "त्यांचा चेहरा बघा"
15
आबांवरील टीकेनंतर नाराजी; शरद पवारांनी अजितदादांना फटकारलं, म्हणाले...
16
पवार कुटुंब एकत्र येणार? आमच्यात फक्त राजकीय मतभेद; सुनेत्रा पवारांचं मोठं विधान
17
सोमवारनंतर मतदारसंघांतील चित्र होणार स्पष्ट; विधानसभेच्या प्रचारासाठी मिळणार फक्त 'इतके' दिवस!
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "दादांना विलन करण्याचा प्रयत्न असेल तर..." ; तटकरेंचा जयंत पाटलांना इशारा
19
जिद्दीला सलाम! १ कोटीची नोकरी सोडून सुरू केली कंपनी; तरुणांसाठी करतेय मोठं काम
20
खानयारमध्ये चकमक सुरूच; दहशतवादी लपलेल्या घराला स्फोटानंतर लागली भीषण आग

किरण बेदींनी पायताणाशपथ जागवली मिसाईल मॅन डॉ. कलामांची आठवण...

By चंद्रशेखर कुलकर्णी | Published: September 01, 2017 4:04 PM

किरण बेदी यांनी दिवंगत माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या अत्यंत साध्या चपलांचा फोटो ट्विटरवर पोस्ट केला आणि त्यानिमित्तानं जे मनात आलं, ते जसंच्या तसं व्यक्त करण्यासाठी हा शब्दप्रपंच...अक्षरश: पायताणाशपथ!

ठळक मुद्देपाय आणि पर्सनॅलिटी यांचं नातं अतूट आहे. म्हणी आणि वाकप्रचारात त्याचं दिसणारं प्रतिबिंब त्याचीच तर साक्ष देतंडोक्यावर काळ्याचे पांढरे होणे, हे अनुभवाचं तर पायात होणं आर्थिक समृद्धीचं लक्षण ठरत होतंपण त्या पावलांवर लोळण घेणारी लक्ष्मी काळी असते, की शुभ्रधवल, हे कोडं ज्याचं त्यानं सोडवलेलं बरं

किरण बेदी यांनी दिवंगत माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या अत्यंत साध्या चपलांचा फोटो ट्विटरवर पोस्ट केला आणि त्यानिमित्तानं जे मनात आलं, ते जसंच्या तसं व्यक्त करण्यासाठी हा शब्दप्रपंच...अक्षरश: पायताणाशपथ!पाय आणि पर्सनॅलिटी यांचं नातं अतूट आहे. म्हणी आणि वाकप्रचारात त्याचं दिसणारं प्रतिबिंब त्याचीच तर साक्ष देतं. सुलक्षण म्हणा, की अवलक्षण म्हणा, त्याचा संबंध पावलांशी जोडला जातो. फरक इतकाच, की कुणी पाय म्हणतं तर कुणी पावलं म्हणतं. असे हे पाय जपणाºया जोड्यांना सामाजिक-सांस्कृतिक प्रतिष्ठाही बहुधा त्यातूनच मिळाली असणार. हा हा म्हणता पादुका अन् खडावांचा जमाना गेला. त्यासरशी पादत्राणांचं पावित्र्यही वैकुंठवासी झालं. तरीही पाय, पादत्राणं अन् पर्सनॅलिटी हा त्रिवेणी संगम आजही टिकून आहे. पुणेरी जोडे, कोल्हापुरी, जोधपुरी अशी गावा-गावांशी जुळलेली जोड्यांच्या नात्याची वीणही घट्ट आहे. पायीची दासी होणाºया पादत्राणांची काही खासियत आहे.असं म्हणतात, की चपलेवरनं माणसाची पारख होते. पॅरागॉनपासून बाटापर्यंत आणि नाइकीपासून एसिक्सपर्यंत असंख्य ब्रॅण्ड सनी जूत्यांच्या धंद्यात व्यवस्थित पाय पसरलेत. पण त्यातही चपला, त्यांचे रंग अन् पोत लक्षात राहतातच. मिसाल के तौर पर सांगायचं तर पांढरी चप्पलच बघा ना! तसं पाहिलं तर शांती, शुचिता अन् विरक्तीचं प्रतीक ही पांढºया रंगाची ओळख. ते डोक्याच्या बाबतीत खरंही आहे. हा रंग डोईवरी गेला की गांधीवादाची झाक येते पण पायात आला, की नाथाघरची उलटी खूणच जणू ! वेगळ्या अर्थानं पांढºया पायाची ही माणसं खासच असतात. यांचा सेल फोन असतो, उजव्या हातात पण त्याला लावलेला कान मात्र असतो डावा! ही अशी माणसं मंत्रालयातल्या लांबच लांब लॉबीपासून दुबईतल्या मॉलपर्यंत कुठंही दिसू शकतात. त्यांच्या पर्सनॅलिटीतही बऱ्यापैकी साम्य असतं. ममत्व, आदर, आस्था अशा ‘सोल’फुल भावना त्यांच्याप्रती निर्माण नाही होत. उलट काहीसा धाक, दरारा, दबदबा असलंच काहीसं मनात येतं. खरं म्हणाल, तर पायाच्या बाबतीतही गोºया कातड्याचं प्रेम असलेल्या मंडळींची दुनिया निराळीच असते.आपल्या मनात आणि व्यवहारात काहीही काळंबेरं नाही, हे इतरांवर ठसवण्यासाठी यांना पायातल्या चपलेच्या पांढऱ्या रंगाचा आधार वाटतो. वन्स अपॉन अ टाइम मुंबईतल्या अंडरवर्ल्डला या रंगाचं भलतं आकर्षण होतं. पायात पांढरी चप्पल असलेल्या माणसाच्या हाताला मोगऱ्याचा गजरा असणार, असं उगाचच राहून राहून मनात येतं. हाजी मस्तानपासून वरदाभाईपर्यंत अनेकांना या पांढऱ्या पायांचं आकर्षण होतं.डोक्यावर काळ्याचे पांढरे होणे, हे अनुभवाचं तर पायात होणं आर्थिक समृद्धीचं लक्षण ठरत होतं. पण त्या पावलांवर लोळण घेणारी लक्ष्मी काळी असते, की शुभ्रधवल, हे कोडं ज्याचं त्यानं सोडवलेलं बरं. पायातला हा पांढरा रंग रगेल आणि रंगेलपणाशी पाट लावतो, हे बरीक खरं...किरण बेदींनी प्रसिद्ध केलेला डॉ. कलामांच्या चपलांची जातकुळी याच्या नेमकी विरुद्ध भावना जागवते. पायात इतकी साधी चप्पल घालणाऱ्या या वैज्ञानिकानं अवकाश कवेत घेण्याची जिद्द भारतीयांच्या मनात जागवली. त्यासाठी अग्निपंखांचं बळही दिलं. त्यांच्या या चपला पाहिल्यावर पुलंचं एक वाक्य आठवलं...वंदन करावे असे पाय आता उरले नाहीत...

टॅग्स :Presidentराष्ट्राध्यक्ष