शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

ज्ञानवापीचा वाद... विषारी सापांचा पेटारा उघडणे परवडणार नाही!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2022 5:51 AM

कायद्यांमुळे हिंदू-मुस्लीम एकता निर्माण करता येईल असे मुळीच नाही. पण, कायद्याच्या धर्मनिरपेक्ष अंमलबजावणीतून तणाव नक्कीच रोखता येतील!

असीम सरोदे

ज्ञानवापी मशिदीचे प्रकरण  संवेदनशील असल्याने त्याची सुनावणी ज्येष्ठ व अनुभवी न्यायाधीशांच्या समोर करावी, असे सांगताना हा वाद हळुवारपणे निकालात काढण्यासाठी संतुलन व शांततेची अपेक्षा न्या. चंद्रचूड, न्या. सूर्यकांत व न्या. नरसिंह यांनी व्यक्त केली.  १५ ऑगस्ट १९४७ या दिवशी असणारी भारतातील धार्मिक स्थळांची स्थिती जैसे थे ठेवावी, अशा स्पष्ट निर्देशांचा ‘प्रार्थनास्थळांच्या जागांबद्दलचा कायदा १९९१’ अस्तित्वात आहे व त्यानुसार ही केस दाखल  करून घेतली जाऊ शकत नाही असा दावा करीत अंजुमन इंतेझामिया मस्जिद कमिटीने केलेला अर्ज आधी विचारात घ्यावा असेही निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. ऑर्डर ७ रूल ११ (d) चा विचार जर प्रकर्षाने झाला तर कायद्यात न बसणारे दावे/केसेस ऐकून घेण्यास नकार देऊन असा दावा/ केस फेटाळून लावण्याचे अधिकार वाराणसीन्यायालयाला आहेत. तसे धारिष्ट्य हे न्यायालय वापरणार का? - याचे उत्तर लवकरच मिळेल. १५ ऑगस्ट १९४७ ही कट-ऑफ तारीख १९९१ च्या कायद्याने ठरवलेली असल्याने त्या दिवसानंतर कोणत्याच धार्मिकस्थळाच्या परिस्थितीत, बांधकामात, वापरात काहीही बदल करता येत नाहीत.

वाराणसी कोर्टाने हे प्रकरण दाखल करून घेण्यास योग्य आहे कि नाही हे ठरवले नाही तर सर्वोच्च न्यायालयाला वैधता तपासावी लागेल अन्यथा सध्याच्या अस्वस्थ भारतात विविध धर्मांच्या धार्मिक स्थळांबद्दलच्या विवादांचा महापूर यायला वेळ लागणार नाही. ‘प्रार्थनास्थळांच्या जागांबद्दलचा कायदा १९९१’ हा कायदा घटनाबाह्य नाही, यावर सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केले आहे. बाबरी मशीद-राममंदिर वादाच्या संदर्भातील प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की, या कायद्यामुळे संविधानाची मूलभूत मूल्ये संरक्षित होतात. वैचारिक स्वातंत्र्य, सहिष्णुता, विविध धर्माच्या लोकांबाबत समानतेचा व त्यांच्या श्रद्धांचा स्वीकार हे तत्त्व प्रार्थनास्थळांच्या जागांबद्दलचा कायदा १९९१ मुळे राखले जाते. (१९९१ चा कायदा रद्द करण्याचे प्रयत्न भविष्यात संसदेतून होतील हे नक्की.)  

वाराणसीच्या न्यायालयाने सर्वोच्च न्यायालयाला ओलांडून पुढे जाणे, कायद्याचा अवमान आहे का, हा प्रश्न महत्त्वाचा ठरणार असे अनेकांना वाटत असताना प्रार्थनास्थळांच्या जागांबद्दलचा कायदा १९९१ मधील कलम ३ व ४ नुसार प्रार्थनास्थळांच्या धार्मिक वैशिष्ट्यांच्या पाहणीला, वस्तुस्थिती विशेष शोधण्याच्या प्रक्रियेला प्रतिबंध करता येणार नाही, अशी स्पष्टता सर्वोच्च न्यायालयानेच दिली आहे. त्यामुळे यावरही युक्तिवाद होतील. जीवनमरणाशी जोडलेले मुद्दे सोडून आपण असंबद्ध, गैरलागू व अनावश्यक मुद्द्यांभोवती स्वतःला गुरफटून घेणार का? सर्वांच्या सामाजिक-आर्थिक-राजकीय-सांस्कृतिक-आत्मिक विकासाच्या प्रक्रिया थांबवून टाकणार का?- या प्रश्नाने आज देशातील विचारी नागरिक अस्वस्थ आहेत. धर्मनिरपेक्ष लोकशाहीमध्ये न्यायालयांचा वापर धार्मिक स्थळांबाबतच्या ‘ऐतिहासिक चुका’ दुरुस्त करण्याचे माध्यम म्हणून करता येणार नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले होते. कुणालाच ज्ञानवापी प्रकरणाचा थोडाही फायदा घेण्याची संधी न्यायालयाने देऊ नये. यावरून देशात वाद पेटल्यास विषारी सापांचा पेटारा उघडण्यासारखे होईल. श्रद्धा, प्रार्थना पद्धती व धार्मिक विश्वास या गोष्टींना राजकारणापासून वेगळे ठेवणे आपल्याला शिकावे लागेल. कायद्यांमुळे हिंदू-मुस्लीम एकता निर्माण करता येईल, असे मुळीच नाही. पण, कायद्याच्या धर्मनिरपेक्ष अंमलबजावणीतून हिंदू-मुस्लीम तणाव थांबविता येऊ शकेल, हे मात्र नक्की! asim.human@gmail.com

टॅग्स :VaranasiवाराणसीCourtन्यायालय