शहरं
Join us  
Trending Stories
1
फहद अहमद मुंबईतील 'या' मतदारसंघात लढण्यास इच्छुक; मविआकडे जागा सोडण्याची मागणी
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा कट कोण रचतंय?; अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेचा खळबळजनक दावा
3
बेडी काढताच अक्षयने खेचले पोलिस अधिकाऱ्याचे पिस्तूल; पोलिसांच्या दिशेने गोळ्या झाडल्या
4
नरिमन पॉइंट समुद्रात टाकणार भराव; कल्चरल प्लाझा, मरिना प्रकल्प देणार परिसराला नवा साज
5
अग्रलेख : या ‘न्याया’चे सत्य कळू द्या! विश्वास टिकविण्याची जबाबदारी आता पोलिसांवर
6
Today Daily Horoscope आजचे राशीभविष्य; आर्थिक लाभ संभवतात, मान-सन्मान होतील
7
कोणी अंगावर आला, तर त्याला आता शिंगावर घेणारच; आरक्षण म्हणजे 'गरिबी हटाव' नव्हे
8
लैंगिक अत्याचाराचे प्रकरण होणार बंद; मृत्यूमुळे अबेटेड समरी दाखल करणार
9
"खोलीत क्षेपणास्त्रे, गॅरेजमध्ये रॉकेट ठेवणाऱ्यांकडून...", हवाई हल्ल्यादरम्यान नेतन्याहू यांचा लेबनॉनला संदेश
10
भाजपच्या 'इलेक्शन मोड'साठी अमित शाहांची दहा सूत्री 'ब्ल्यू प्रिंट'!
11
ओबीसींसाठी उत्पन्न दाखल्याची अट रद्द; द्या फक्त नॉन-क्रिमिलेयर, हजारोंना दिलासा
12
नवरात्रात मेट्रो-३ची ‘रूट’स्थापना; पंतप्रधान करणार उद्घाटन, आरे ते बीकेसी ५० रुपयांत
13
रेल्वे घातपात रोखण्यासाठी एनआयए, राज्यांशी चर्चा; रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे वक्तव्य
14
'लाडक्या बहिणी' कमळाला मत देतील, म्हणून हा जुगाड; भाजप आमदाराचा व्हिडीओ वडेट्टीवारांकडून पोस्ट!
15
...अन् बलात्कारी, मर्डरर अमरसिंग ठाकूरचे एन्काऊंटर थोडक्यात हुकले!
16
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
17
अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न, घरकुलाच्या जागेच्या मोजणीवरून वाद
18
अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची सीआयडी व न्यायालयीन चौकशी केली जाणार 
19
माजी पोलीस महासंचालक म्हणाले, तर हे एन्काऊंटरच घडले नसते!
20
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...

कृष्णामाईचा जलउत्सव

By admin | Published: August 26, 2016 6:54 AM

कृष्णामाईची नव्या पाण्याने ओटी भरण्याची परंपरा इकडे आहे. चालू वर्षी ही ओटी भरून वाहते आहे. तिचा उत्सव चालू आहे.

कृष्णामाईची नव्या पाण्याने ओटी भरण्याची परंपरा इकडे आहे. चालू वर्षी ही ओटी भरून वाहते आहे. तिचा उत्सव चालू आहे. चालू वर्षी पाऊसमान समाधानकारक होईल, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केलाच होता. त्यानुसार सर्वत्र उत्तम पाऊस होत नसला तरी कृष्णा खोऱ्यात मात्र त्याची प्रचिती येत आहे. सह्याद्रीच्या घाटमाथ्यावरून वाहाणाऱ्या सर्व नद्यांना दोन वेळा पूर आले. अनेक रस्ते पाण्याखाली गेले. वारंवार पाण्याच्या पावसाने धरणे भरली आहेत. कृष्णा खोऱ्यातील सर्व नद्यांवर ३७ छोटी-मोठी धरणे आहेत. त्यांची पाणी साठवण क्षमता ४२५ टीएमसी आहे. त्यापैकी सर्व धरणे जवळपास भरली आहेत. काही धरणातून अतिरिक्त पाणी सोडण्यात आले. परिणामी पुराच्या पाण्यात वाढ होत राहिली. पुण्यापासून कोल्हापूरपर्यंतच्या चारही जिल्ह्यातून वाहणाऱ्या या सर्व नद्या कृष्णेला मिळतात. त्यामुळे चालू वर्षी कृष्णा खोऱ्यातील काही भागाचा अपवाद वगळता दुष्काळसदृश परिस्थितीतून सुटका झाली आहे. खरे तर जुलैचा पहिला आठवडा सुरू झाला की, सह्याद्रीच्या घाटमाथ्यांवर जल उत्सवच सुरू होतो. आंबोली, दाजीपूर, विशाळगड, महाबळेश्वर आदी ठिकाणी सरासरी चार ते सहा हजार मिलीमीटर पाऊस कोसळतो. कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यात विशाळगड परिसरात तर सात हजार मिलीमीटर पावसाचा उच्चांक आहे. इतका पाऊस या वर्षी पडला नसला तरी किमान सहा हजार मिलीमीटर पाऊस दर वर्षी पडतो. तेथून वाहणारी कासारी, कडवी, कुंभी अशा छोट्या- छोट्या नद्यांचे लालबुंद पाणी वाहात-वाहात कृष्णेला मिळते. या धरणात साठणाऱ्या पाण्यावर हजारो हेक्टर्स जमिनीवर डोलदार पिके उभी राहातात. भात, नागली, ऊस आणि जनावरांचे प्रमुख खाद्य असलेले गवत यांनी शेतीवाडी हिरवा शालू नेसल्याप्रमाणे नटली आहे.साताऱ्याजवळचे कासचे पठार दर वर्षी फुलणाऱ्या फुलांनी बहरून गेले आहे. तसे सर्वच डोंगर नटले आहेत. श्रावण मासीचा ऊन- पावसाचा खेळ सुरू झाला आहे. क्षणात पावसाची सर येते, ओलेचिंब करून सोडते आणि उन्हाची तिरकी किरणे पाना-पानांवर, फुला-फुलांवर पडलेल्या पाण्याच्या थेंबांना चकचकीत करून सोडते. फुलपाखरांचा थवाच्या थवा, त्या सुंदर हिरव्यागार गालिचावर स्वच्छंदी बागडताना पदोपदी दिसतो. असा हा जलउत्सव चालू वर्षी अधिकच आनंदी आहे. कारण कमी अधिक वारंवार पाऊस पडतो आहे. शेतीला तर पोषक आहेच. त्यामुळे भात आणि नागलीची भरभरुन वाढ होत आहे. हाच पाऊस गोड साखर तयार करणाऱ्या पश्चिम महाराष्ट्राचे ऊसाचे मळेही गर्दी करून उभे राहावेत, असे भरले आहेत.गत वर्षी पाऊसमान कमी झाल्याने ऐतिहासिक राधानगरीचे लक्ष्मी धरण वगळता एकही धरण भरले नव्हते. महाराष्ट्राची वरदायिनी म्हणून ज्या धरणाचा उल्लेख केला जातो त्या कोयनेत जेमतेम ऐंशी टीएमसीच पाणी साठले होते. चालू वर्षी ते पूर्ण भरते आहे. मधल्या काळात एक आठवडाभर असा पाऊस होता की, कोयनेच्या पाणलोट क्षेत्रातून पाण्याचे धबधबे दररोज सरासरी पाच टीएमसी पाण्याने कोयना धरण भरत होते. तीन दिवसांत जमा झालेले होणारे पाणी अठरा टीएमसी होते. एखाद्या मोठ्या धरणात असेल इतके पाणी केवळ तीन दिवसांत या धरणात येते. इतके हे सुंदर कोयनेचे पाणलोट क्षेत्र आहे. कोयनेपासून महाबळेश्वरपर्यंत साठ किलोमीटर अंतरापर्यंत पसरलेल्या दऱ्या-खोऱ्यांत प्रचंड कोसळणारा पाऊस पाहणे हादेखील एक उत्सव साजरा करावा, असा अनुभव असतो. कृष्णामाईची नव्या पाण्याने ओटी भरण्याची परंपरा इकडे आहे. चालू वर्षी ही ओटी भरून वाहाते आहे. तिचा उत्सव चालू आहे. उत्सवासाठी गावे सजवावी, मंदीर रंगवावे, माळ-फुलांनी बहरून टाकावे, तसा हा सर्व सह्याद्री भरून गेला आहे. त्याचा आस्वाद घेणे हादेखील एक नैसर्गिक चमत्कारच असतो. तो सध्या उत्सव साजरा होत आहे. धन्य ती कृष्णामाई आणि तिला सजविणाऱ्या सह्याद्रीच्या पर्वतरांगा!- वसंत भोसले