लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्रच होणार असल्याचा कल्ला उठताच नेते लागले कामाला. रंगूलागलेविक ासक ामांच्या भूमिपूजनाचेसोहळे. अशाच एके ठिक ाणी नेतेमंडळी यायला अजून बराच उशीर. तेव्हा ‘नारळ अन्कुदळ’ यांच्यात रंगला संवाद.नारळ : नेत्यांची वाट पाहून-पाहून माझे केस विस्क टलेबुवा. अंगाचंपार खोबरंझालं.कुदळ : (गालातल्या गालात हसत) तुझा हा पहिलाच क ार्यक्रम दिसतोय बहुतेक . माझंआख्खंआयुष्य गेलंबाईऽऽ या नेत्यांच्या हातात नांदून-नांदून.नारळ : तुझंक ाय... ‘उचलली कुदळ, लावली जमिनीला!’ दिवसभर तूक ोनाड्यात निवांत पहुडलेली. क धी तरी एखादा नेता येतोअन्तुला दोन-चार मिनिटंजमिनीवर नाचवून पाच वर्षांसाठी मतंमिळवून जातो.कुदळ : (घाम पुसत) पण गेल्या चार दिवसांपासून कुठंउसंत मिळतेय मला? सक ाळी गटारीचंभूमिपूजन. दुपारी रस्त्याचंक ाम. संध्याक ाळी मंदिर सभागृहाच्या क ामाचा शुभारंभ अन्रात्री स्मशानभूमीच्या बांधक ामाला सुरु वात. दिवसभर या नेत्यांबरोबर आबदून-आबदून पार कंबरडं मोडलंय रेऽऽ माझं.नारळ : (अस्वस्थ होत) क धी एक दा दसरा-दिवाळी सण येऊ न जातोय... अन् क धी आचारसंहिता लागू होतेय, असं झालंयमला!कुदळ : आता तुझा क ाय संबंध निवडणुक ीच्या आचारसंहितेशी?नारळ : (डोळेमिचक ावत) ती लागू झाली क ी, उमेदवारांची यादी जाहीर होते. मग, ज्यांची नावंत्यात नाहीत, त्यांच्या हातात मग मी आपसूक जाऊ न पडतो ना.कुदळ : (खुसखुसत) तुझंबाईमस्तच. तिक ीट मिळालंनाही तर त्याच्या हातात नारळ. नवीन आमदार निवडून आला क ीत्याच्या स्वागताला श्रीफ ळ. मग पाच वर्षे भूमिपूजनाच्या क ामालाही नारळ. शेवटी त्याला घरी बसवतानाही मतदारांक डून त्याच्याहातात पुन्हा नारळच नारळ!नारळ : म्हणूनच राजक ारणात ‘खोबरं तिक डंचांगभलं’ म्हणतात. फुटला नारळ तर उभा.. नाही तर नेता पारऽऽ आडवा.कुदळ : (हळूच इक डं-तिक डंपाहत) यागावातल्या नेत्यानंम्हणेट्रक भरू न तुझे भाऊ बंद आणून ठेवलेत. ‘दिसलंगाव क ी फ ोड नारळ. दिसली वस्ती क ी वाढव नारळ,’हाच एक क लमी क ार्यक्रम पुढचेपाच महिने चालविणार आहेत म्हणेतो.नारळ : (क सानुसा चेहरा क रत) माझी आजी तर सांगत होती क ी, ‘माझ्या पणजोबांनाही म्हणे, याच ठिक ाणी फ ोडलं होतंया बहाद्दर नेत्यानं. दहा वर्षांपूर्वी आजच्यासारखाच भूमिपूजनाचा गाजावाजा केला होता इथं. क ाम तर क ाहीच झालंनाही.उलट आता मला इथंआणलं!’कुदळ : (खदखदून हसत) तुला तुझ्या आजीनं अर्धवटच माहिती दिलीय. पाच वर्षांपूर्वीही याच ठिक ाणी याच क ामाला याच नेत्यानंतुझ्या वडिलांना फ ोडलंहोतं.नारळ : (दचकून टणक न घरंगळत) पण तुला क संक ाय माहीत गंऽऽ?कुदळ : (क ानात कुजबुजत) तेव्हाही मीच होतेनां, या भूमिपूजनाला... अन्अजून एक सांगूक ा? पुढच्या पाच वर्षांनंतरही याठिक ाणी हाच नेता असणार... अन्त्याच्या हातातही मीच असणार... आहेकि न्हऽऽई गंमत आपल्या भारतीय राजक ारणाची!
कुदळ म्हणाली नारळाला..
By सचिन जवळकोटे | Published: August 16, 2018 6:14 AM