शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

संवेदना जागवूया, चला माणूस होऊया...

By किरण अग्रवाल | Updated: August 14, 2022 11:42 IST

Let's be sensible, let's be human $ निसर्गाच्या अवकृपेने ओढवलेल्या संकटात मनुष्याच्या हाल अपेष्टांची चर्चा होताना प्राणीमात्रांच्या विषयाकडे सोयीस्कर दुर्लक्षच होते.

- किरण अग्रवाल 

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त प्रकट होणारा देशाभिमान चराचरात चैतन्य जागविणाराच आहे, त्याचसोबत मनामनातील माणुसकी, संवेदना व भूतदया जागविण्याचीही गरज आहे. चला, त्यासाठी कटिबद्ध होऊया...

 काळाच्या ओघात व धावपळीच्या जगण्यात जिथे माणुसकीच क्षीण होत चालल्याचे दिसून येते, तिथे भूतदया कशी वा कितीशी आढळणार? निसर्गाच्या अवकृपेने ओढवलेल्या संकटात मनुष्याच्या हाल अपेष्टांची चर्चा होताना प्राणीमात्रांच्या विषयाकडे सोयीस्कर दुर्लक्षच होते. माणसातली माणुसकी जागविण्यासोबतच भूतदयेचा संस्कार रुजविण्याचीही गरज निर्माण झाली आहे ती त्यामुळेच.

 राग, संशय व बदल्याची भावना यांसारख्या कारणातून बघावयास मिळणारी मनुष्यातल्या पशुत्त्वाची उदाहरणे कमी नाहीत. वंशाला दिवा हवा म्हणून मुलगा अपेक्षित असताना मुलगी झाल्यावर या नकोशीला कचराकुंडीत टाकून देण्यापासून ते नीट अभ्यास केला नाही म्हणून पोटच्या लहानग्या बाळांना चक्क चटके देण्यासारखे निर्दयी प्रकारही अधूनमधून बघावयास मिळतात. अगदी जराजराशा कारणातून हे घडून येते, आणि मनुष्य हिनतेची पातळी गाठतो. अरे माणसा माणसा, कधी होशील माणूस; असा प्रश्न विचारला जातो तो त्यामुळेच. अपवादात्मक का होईना, अशा घटना घडतात तेव्हा समाजमन कळवळते. कारुण्याचा गहीवर दाटून येतो, अरेरे... असा उसासा टाकला जातो; अखेर ज्याची त्याची मानसिकता म्हणत झाले गेले विसरत सारे जण आपापल्या कामाला लागतात. हीच जगरहाटी. त्यामुळे मनुष्याच्या मनुष्याबद्दलच्याच निर्दयत्त्वाची ढीगभर उदाहरणे आपल्या अवतीभवती घडत असताना मनुष्याच्या पशु, प्राण्यांबद्दलच्या निर्दयत्त्वाची कोण काळजी वाहणार? तेवढी संवेदना शिल्लक आहे कुठे?

 सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. यंदा संततधार पावसाने बळीराजापुढे अनेक समस्या वाढून ठेवल्या आहेत. यात शेत शिवारातील पाणंद रस्त्याच्या दुरवस्थेचा मोठा प्रश्न समोर आला आहे. अनेक ठिकाणी या रस्त्यांची कामेच झालेली नाहीत. काही ठिकाणी कामे न करता बिले काढली गेल्याने पाणंद रस्त्यावरील चिखलातून वाट काढणे अवघड बनले आहे. या समस्येकडे केवळ बळीराजाची अडचण म्हणून पाहिले जात आहे. शेतकरी शेतापर्यंत कसा पोहोचेल, असा प्रश्न केला जात आहे. पण गुडघाभर चिखल तुडवीत बैलगाडी व त्यावरील ओझे वाहून नेताना बैलजोडीची होणारी दमछाक आपल्या कुणाच्या नजरेस पडत नाही. मनुष्याच्या पशु, प्राण्यांबद्दलच्या निर्दयत्त्वाचेच हे निदर्शक म्हणायला हवे.

 या सदराच्या मजकुरासोबत वापरलेले पातूर तालुक्यातील खेट्री टाकळी शेत रस्त्यावरचे हे छायाचित्र बारकाईने व मनाच्या संवेदनशीलतेने बघितले तर प्रचंड चिखलातून गाडा ओढणाऱ्या बैलांची कीव आल्याखेरीज राहू नये. अर्थात हे प्रातिनिधिक चित्र आहे, जवळपास सर्वच शेत रस्त्यांवर अशीच स्थिती असल्याचे पाहता बैलांबद्दलची अमानवीयता अस्वस्थ करून जाते. वर्षातून एकदा पोळ्याच्या दिवशी या बैलांना सजवून मिरवले व पुरणपोळीचा नैवेद्य घातला म्हणजे झाले. परंतु एरवीच्या त्यांच्या श्रमाचे व आरोग्याचे काय? दुर्दैवाने कोणीही गांभीर्याने याचा विचार करताना दिसत नाही. थंडीच्या दिवसात उबदार रजाईमध्ये शिरणारे आपण, बाहेर गोठ्यातील गुराढोरांच्या कुडकुडण्याची संवेदनाच हरवून बसलो आहोत. भटक्या कुत्र्यांना बिस्कीट, ब्रेड खाऊ घालणारे सन्माननीय अपवाद आहेतच. पण दिवाळीत कुत्र्याच्या शेपटीला फटाक्यांची लड बांधून ती पेटवणारे व त्याच्या किंचाळण्यात आनंद मानणारेही आपल्याकडे कमी नाहीत. तेव्हा, माणुसकीसोबतच पशु, प्राण्यांबद्दलचा दयाभाव बाळगून त्यांचे शोषण होणार नाही, हे बघणेही गरजेचे आहे.

 स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करताना त्यासाठी बलिदान दिलेल्या क्रांतिकारक व स्वातंत्र्यसेनानींच्या शौर्याने आपला ऊर अभिमानाने भरून येत आहे, हर घर तिरंगा फडकवत सर्वत्र जन गण मन अधिनायक जय हे...चा घोष सुरू आहे. हे मंगलगान, हा जयघोष मनामनाला पुलकित करणारा, देशाभिमानाचे स्फुल्लिंग चेतवणारा आहे. स्वातंत्र्योत्तर सुराज्याला अधिक मजबूत करायचे व प्रगतीपथावर न्यायचे तर राष्ट्रप्रेमाने ओथंबलेली मने हवीत. त्यासाठी राष्ट्राभिमान जागवूया. याचसोबत मनामनातील माणुसकी व संवेदनाही जागवूया. प्राणिमात्रांसाठीही आशिष मागूया, इतकेच यानिमित्ताने.