शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्ताधारी सत्तेसाठी खालच्या थराला जात आहेत; देशमुखांवरील हल्ल्यानंतर शरद पवारांचा संताप
2
"...अन्यथा माझा बाबा सिद्दिकी व्हायला वेळ लागणार नाही", शरद पवार गटाच्या रमेश कदमांना जीवे मारण्याची धमकी 
3
ऐन निवडणुकीत पक्षाकडून निलंबन; सांगता सभेत शरद पवारांबद्दल काय म्हणाले राहुल जगताप?
4
"...तर उद्धव ठाकरे यांच्यावर FIR का दाखल होत नाही? त्यांना आत का टाकत नाही?"; रामदास कदम यांचा सवाल
5
या सगळ्या अफवा! असित मोदींसोबतच्या भांडणावर जेठालालचं स्पष्टीकरण, म्हणाले- "मी हा शो सोडत नाहीये..."
6
कश्मिरा शाहचा अपघात नक्की कसा झाला? नणंद आरती सिंहने दिली माहिती; म्हणाली, "मॉलमध्ये..."
7
Mohammed Shami च्या फिटनेस टेस्टसाठी BCCI नं सेट केला नवा पेपर
8
'हे' ७ फॉर्म्युले डोक्यात फिट करा, कमाईसोबतच तुमचा पैसाही वाढेल; लोकही विचारतील, "हे कसं केलं?"
9
मोदी-ठाकरे-पवार-शिंदेंनी मैदान गाजवलं; सोलापुरात कुठे कोणत्या नेत्याच्या सभा झाल्या? जाणून घ्या
10
27000 सैनिक तैनात, अनेक जिल्ह्यात कर्फ्यू, इंटरनेट बंद; मणिपूरमध्ये नेमकं काय घडतंय?
11
भयानक! समुद्रकिनारी बसलेल्या माय-लेकी, अचानक लाट आली अन्...; थरकाप उडवणारा Video
12
विशेष मुलाखत: "संविधानाचे संरक्षण व्हावे यासाठीच आम्ही महायुतीसोबत"
13
Defence Stocks : HAL सह 'या' ३ स्टॉक्सवर ब्रोकरेज बुलिश, ९५ टक्क्यांपर्यंत देऊ शकतात रिटर्न
14
महाराष्ट्राचं सरकार हे दिल्लीतून चालतंय, सुप्रिया सुळेंचा आरोप 
15
Maharashtra Election 2024 Live Updates: राज्यात प्रचारतोफा थंडावल्या, आता मतांची तोफ मतदारांच्या हाती!
16
अनिल देशमुखांवरील हल्ला हे रचलेले कुंभाड; भाजपाचा संशय, आजच सखोल चौकशी करण्याची मागणी
17
मजबूत जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात तेजी; IT, बँकिंग शेअर्समध्ये मोठी खरेदी
18
ब्राझीलमध्ये नरेंद्र मोदी आणि जॉर्जिया मेलोनी यांच्यात बैठक, 'या' मुद्द्यांवर झाली चर्चा!
19
'राहुलजी! आम्ही आणलेली गुंतवणूक बघा'; देवेंद्र फडणवीस यांनी दिले आव्हान
20
खोटे आरोप करून सहानुभूती मिळवायचा प्रयत्न : अजित पवार 

नवीन वर्षात माणूस म्हणून नवं जगणं जगुया!

By किरण अग्रवाल | Published: January 01, 2023 11:19 AM

Happy New Year 2023 : नव्या वर्षात पाऊल ठेवताना नव्या आशांसोबतच नवी दृष्टी ठेवून वाटचाल करणे गरजेचे बनले आहे, कारण गत काळाने खूप धडे शिकवून दिले आहेत.

- किरण अग्रवाल

सरलेल्या वर्षात सर्व काही त्रासदायीच झाले असे नाही, अनेक चांगल्या बाबीही घडल्या. मुख्य म्हणजे कोरोनाने कुंठित झालेल्या मानसिकतेला नवी उमेद लाभली. आता नवीन 2023 या वर्षात या उमेदीच्या बळावर माणुसकीने जगण्याचा नवा संकल्प करूया...

कोरोनाच्या महामारीने छळलेल्या दोन वर्षानंतर आलेले 2022 हे वर्ष नवी जिद्द जागविणारे ठरले. आता 2023 या नव्या वर्षात पाऊल ठेवताना नव्या आशांसोबतच नवी दृष्टी ठेवून वाटचाल करणे गरजेचे बनले आहे, कारण गत काळाने खूप धडे शिकवून दिले आहेत.

तसं तर प्रत्येकच दिवसाचा सूर्य नवी उमेद जागवत व नवी आशा घेऊन उगवत असतो, त्यामुळे नवीन वर्षातील पहिल्या तारखेचाच सूर्य वेगळेपणाने उगवला आहे असे म्हणता येऊ नये; पण आपण संकल्पांनाही मुहूर्त शोधत असल्याने नवीन वर्षातील आजच्या पहिल्या सूर्योदयाकडे त्याचदृष्टीने पाहता यावे. अर्थातच, नव्या वर्षात नवे संकल्प करताना गेल्या दोन तीन वर्षात आरोग्याचे संकट व जे काही भोगले, सोसले त्यासंबंधी घटनांच्या स्मृतींना अर्घ्य देण्याची भूमिकाही तितकीच महत्त्वाची ठरावी; कारण जुनी मळलेली वाट सोडल्याखेरीज नव्या वाटेवर अग्रेसर होता येत नाही.

 

नवीन वर्षात प्रवेश केल्यावर मागे वळून पाहता गेल्या 2022 मधील अनेकविध घटना डोळ्यासमोर तरळून जातात. यात काही गोष्टी अनपेक्षित, धक्कादायक घडल्यात हे खरेच; पण त्यापेक्षा कितीतरी अधिक बाबी या चांगल्याही घडल्यात. अनपेक्षित गोष्टीतून धडा व चांगल्या बाबीतून प्रेरणा घेऊन आपल्याला नवीन वर्षातील नवनिर्माण करायचे आहे. आहे त्यापेक्षा अधिक काय चांगले करता येईल याचा संकल्प करायचा आहे. तो करताना इमारती, प्रकल्प, सोयी सुविधा या भौतिक बाबी तर अपेक्षित असतातच, परंतु माणूस म्हणून मानसिकतेतील बदलही यात अपेक्षित धरायला हवा. माणूस म्हणून जगण्याचा हा बदल हवा. कारण, आज सर्व काही आहे, पण माणूसपण हरवत चालले आहे. ''माणसा माणसा कधी व्हशील मानूस'' हा कवयित्री बहिणाबाईंनी विचारलेला प्रश्न आज अधिक अस्वस्थ करून सोडतो तो त्यामुळेच.

 

माणूसपण कसे हरवत चालले आहे याची उदाहरणे कमी नाहीत. अपघात झाल्यानंतर अपघातग्रस्तांना मदत करण्याऐवजी फोटोग्राफी व व्हिडिओ शूट करण्याची चढाओढ सुरू झालेली दिसते. सधनांकडील लग्न सोहळ्यात इतके अन्न उष्टे व खरकटे वाया जाते, की त्यात एखाद्या भुकेल्याच्या वर्षभराची अन्नपाण्याची तजवीज व्हावी. एकीकडे सराफा दुकानांमध्ये गर्दी दिसत असताना, दुसरीकडे रेल्वेच्या पटऱ्यांमध्ये जीव धोक्यात घालून प्लास्टिक वेस्ट गोळा करणारेही दिसतात. कुठे नकोशी ठरलेल्या पोटच्या तान्हुलीला कचरा कुंडीत टाकून देणारी माता आढळते, तर कुठे जन्मदात्यानाच म्हातारपणी घराबाहेर काढत रस्त्यावर सोडून देणारी संतानही आढळते. कुटुंबातील वाटे हिस्स्यासाठी भावा भावांमध्ये वाढलेले कुटुंब कलह असोत, की पैशाच्या हव्यासातून घडणारी लेकी बाळींच्या छळाची प्रकरणे; या व अशा सर्व घटनात माणुसकीच तर पणास लागलेली दिसते.

महत्वाचे म्हणजे, सुखा मागे धावताना जी ओढाताण होते त्यात जगणेच हरवून गेले आहे. स्वाभाविकच प्रत्येक जण बहुदा आपल्यासाठी, आपल्या कुटुंबासाठीच जगण्याला प्राधान्य देत असल्याचे निदर्शनास येते. यात ''वसुधैव कुटुम्बकम''ची भावना मागे पडल्याचे जाणवते. म्हणूनच तर नवीन वर्षात प्रवेश करताना नवं जगणं जगुया.. असे म्हणावेसे वाटते. हे नवे जगणे म्हणजे काय, तर मी व माझ्या खेरीज इतरांसाठीचे जगणे. माणुसकीने, माणूस म्हणून संवेदना जाग्या ठेऊन जगणे. आज सर्वांनीच आपापल्या परीने प्रगती केली असली तरी त्यात नेमके हे जगणे अभावानेच दिसते, म्हणून नवीन वर्षात नवी गाडी, बंगला आदींच्या पलीकडे जाऊन नवा संकल्प करूया; नवं जगण्याचा... माणुसकी जपण्याचा! यासाठी धडपडणाऱ्यांच्या पाठीशी बळ उभे करण्याचा.

टॅग्स :New Yearनववर्ष