- विजय दर्डा
विसरून जा कालच्या व्यथा आणि कथानवीन वर्षात नवी नाती निर्माण करा आताविझलेल्या हृदयांचे दिवे कोण चेतवणार ?मनात उठलेल्या घृणेच्या ज्वाळा कोण विझवणार ?चारही दिशांत धूरच धूर पसरलायया असल्या वातावरणातकोण कुणाची उरभेट तरी कशी घेणार?
माझ्या कानाशी आजहे कुठले गीत घोंघावत आहेकी जे ऐकून माझे मन जळत आहेना माझा कुठला धर्म होताना माझा कुठला रंग होताहोळी-दिवाळी-ईद हे सारेना माझे ना तुझे होतेते तर सर्वांचे होतेही आमच्या भारताचीसुंदर कहाणी होतीप्रत्येकजण एक-दुसऱ्याशीप्रेमाने वागत होताप्रत्येकाचा परस्परांवरमन:पूर्वक विश्वास होताना कुठे द्वेष होताना कुठे द्वेषाची भिंत होतीना आपसात वाद-विवाद होतेना राम अयोध्येतअन् ना रहीम काबात होतेतर ते सर्वांच्या हृदयातशेत-शिवारांत होतेमंदिर-मस्जिद गिरजाघरात होतेकुठून आणि कशी मिळालीया वादळाला संधीत्याला थांबवायलानव्हता कुणी गांधी
तुम्ही माझ्यापासूनतो क्षण का हिरावला?हा विचार करतानामला जगणे कठीण झाले आहेतो सोनेरी काळसर्वांना परत कराआठवा, तेव्हा कसा दिसायचाप्रत्येकाचा प्रसन्न चेहरा
आज का आकाशातनैराश्याचे काळे मेघ अवतरले आहेतप्रत्येक नेत्रातून पहाअग्निज्वाळा धगधगताहेतआपलीच माणसंआपल्याच माणसांसाठीकासावीस होताहेतआता माझा श्वास गुदमरत आहेसहनशीलतेचा बांध तुटत आहेशहिदांचा इतिहास मलास्वातंत्र्याची किंमत पुसत आहेआता तर मी पूर्णत:निरुत्तर झालो आहेमनुष्य असूनसुध्दामी पाषाण झालो आहेजे व्हायचे ते होवोपण आता धुके हटायला हवीतआकाश स्वच्छ-निरभ्र व्हायला हवेऋतु आनंदी व्हायला हवेतसर्वांच्या हृदयाचे ठोकेएक व्हायला हवेतप्रेमाचे उपहार घेऊनचंद्रतारे धरतीवर उतरायला हवेतविसरून जा कालच्या चर्वित-चर्चानव्या वर्षात साधा नवी नाती, विसरून ईर्षाओढून आणा नवनात्यांचे चंद्रतारेसजवा घराघराला एक भारतासम सारे
चला या, आपण सर्व मिळूनफडकता तिरंगा हाती धरूप्रत्येक वेटाळात-गल्ली बोळातभारतमातेचा जयजयकार करूविसरा गडे हो,कालच्या गोष्टी आतानव्या वर्षात नवी नातीघडवू आपण आता
(अनुवाद :सुधाकर गायधनी)