शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

माणुसकी जपूया, मुक्या जीवांची काळजी घेऊया!

By किरण अग्रवाल | Published: May 12, 2024 11:44 AM

Let's preserve humanity : तापमानाचा पारा टिपेस पोहोचला आहे. निसर्गाला मंजूळ स्वर देणाऱ्या पशुपक्ष्यांना या स्थितीत जपणे अत्यंत गरजेचे आहे. त्यांना बसणारा चटका, त्यांची तहान जाणून घेत व माणुसकी जपत त्यांच्यासाठी शक्य असेल तसे दाणा-पाण्याची व्यवस्था करूया..!

- किरण अग्रवाल

  

उन्हाचा चटका मनुष्यप्राण्यालाच घायाळ करणारा व त्याच्या घशाला कोरड पाडणारा असल्याने मुक्या जीवांचे काय, असा प्रश्न संवेदनशील मनांना अस्वस्थ करणाराच ठरत आहे. याबाबतही निव्वळ प्रशासनाकडे बोट दाखविण्यापेक्षा माणुसकी धर्माला जागत प्रत्येकाने आपापल्या परीने व्यवस्था करण्याची अपेक्षा गैर ठरू नये.

अकोल्यातील उन्हाळा तसाही इतरांना घाम फोडणाराच ठरत असतो. यंदा तर सूर्य जरा जास्तच आग ओकत असल्याचे चित्र आहे, त्यामुळे पाणीटंचाईच्या समस्येला सामोरे जाण्याची वेळ आली आहे. अकोलाच नव्हे, तर बुलढाणा व वाशिम याही जिल्ह्यांमधील लहानमोठ्या प्रकल्पातील जलसाठा गतवर्षाच्या तुलनेने खूपच खालावला आहे. उन्हाचा कडाका मोठा असल्याने बाष्पीभवनही वेगाने घडून येत आहे, त्यामुळे आहे तो जलसाठाही लवकरच अपुरा पडण्याची चिन्हे आहेत.

मुद्दा असा की, हा उन्हाचा चटका केवळ मनुष्यांनाच बसत नसून पशुपक्ष्यांचेही अंग भाजून काढणारा ठरत आहे. पाणीटंचाईची समस्या मनुष्यासाठी आहे, तशी पशुपक्ष्यांसाठीही आहे. मनुष्य तरी आरडाओरड करू शकतो, मुक्या प्राण्यांनी बिचाऱ्यांनी काय करावे? तेव्हा याही दृष्टीने नियोजन व उपाययोजना होणे गरजेचे आहे.

मनुष्याला लागते, तसे पाळीव प्राण्यांनाही ऊन लागण्याच्या घटना वाढू लागल्या असून, पशुचिकित्सालयांमध्ये गर्दी वाढली आहे. पशुखाद्यांचे भावही कमालीचे वाढले आहेत. एकतर शेती कसण्यासाठी राहिली नाही आणि दुसरीकडे पशुधन सांभाळणे अवघड ठरत आहे, त्यामुळे गुरांच्या बाजारात विक्रीसाठी येणाऱ्या जनावरांची संख्याही वाढून गेली आहे. कदाचित इतरांना या गोष्टीची तीव्रता तितकीशी जाणवणारही नसेल, मात्र संबंधित घटकाची म्हणजे बळीराजाची या संदर्भातील उलाघाल असह्य ठरणारीच आहे. कोणत्याही शेतकरी कुटुंबासाठी त्याच्याकडील बैल असो, की दुभते जनावर; हे कुटुंबातल्या सदस्या सारखेच असते. पण उन्हाच्या कडाक्यात त्यांना कसे तगवायचे? त्यांच्यासाठी चारा-पाणी कुठून जुळवायचे? अशा विवंचनेत अनेक कुटुंबे आहेत.

अर्थात हेदेखील झाले पाळीव प्राण्यांचे. भटक्या पशुप्राण्यांची अवस्था तर खूपच दयनीय होते आहे. त्यांनाही पिण्याच्या पाण्याचीच मारामार, तर खाण्याचे काय असा प्रश्न आहे. त्यामुळे भूतदया दाखवीत या मुक्या जीवांची काळजी घेण्यासाठी प्रत्येकानेच स्वयंस्फूर्तीने पुढे येणे गरजेचे आहे. हे कामही शासनाने किंवा यंत्रणांनीच करावे अशी अपेक्षा न ठेवता, यादृष्टीने प्रयत्न व्हायला हवेत. जंगल क्षेत्रात वनविभागातर्फे कृत्रिम पाणवठे तयार केले जात आहेतच, शहरात नागरिकांनी पुढाकार घ्यायला हवा. संत एकनाथांनी व्याकुळ गाढवाला पाणी पाजल्याचा आदर्श आपल्यासमोर आहेच. संतांची हीच शिकवण आचरणात आणण्याची गरज आहे.

आपल्याकडे सकाळी मॉर्निंग वॉकला जाणाऱ्यांकडून तसेच संध्याकाळी काही जणांकडून रस्त्यातील भटक्या कुत्र्यांना बिस्किटे वा टोस्ट खाऊ घातले जातात ही खूप समाधानाची बाब आहे. उन्हाचा वाढता कडाका लक्षात घेता त्यांच्यासाठी पाण्याची व्यवस्थाही करायला हवी. काही ठिकाणी ती केलीही जात आहे, त्याचे प्रमाण वाढायला हवे. ‘लोकमत’मधून केल्या जात असलेल्या जनजागृती व पाठपुराव्यामुळे अनेक कुटुंबात लहान मुलांना यासंबंधीची जबाबदारी देण्यात आली असून, ते पक्ष्यांसाठी घराच्या बाल्कनीत, अंगणात वा छतावर पाण्याचे भांडे ठेवत आहेत, त्यांच्यासाठी दाण्याची सोय करत आहेत. या कृतीतून होणारे भूतदयचे व माणुसकीचे संस्कार महत्त्वाचे ठरतील.

सारांशात, उन्हाचा चटका केवळ मनुष्यालाच बसत नसून तो मुक्या जीवांनाही बसत आहे, तेव्हा भटक्या मुक्या जीवांचे उन्हापासून रक्षण करतानाच त्यांच्यासाठी दाणापाण्याची काळजी घेऊया... तीच खरी भूतदया व तोच खरा माणुसकी धर्म!