शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
2
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
3
निकालापूर्वी राजकीय संन्यास जाहीर केला, भाजपाला मोठे यश मिळताच निर्णय बदलला; नेते म्हणाले...
4
“मविआत आमचे संख्याबळ जास्त, मला विरोधी पक्षनेता व्हायला नक्कीच आवडेल”: भास्कर जाधव
5
IPL Auction 2025 : एका डावात १० विकेट्स घेणाऱ्या MI च्या गोलंदाजाला CSK नं केलं 'करोडपती'  
6
मतमोजणीच्या आकडेवारीत घोळ? व्हायरल पोस्टचे सत्य समोर, निवडणूक अधिकारी म्हणाले...
7
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
8
“आमचे आमदार फुटणार नाहीत, ताकदीने लढणार”; ठाकरे गटाला ठाम विश्वास, शिंदे गटाला सुनावले
9
IPL Auction 2025: MS Dhoni चा 'भिडू' Mumbai Indians ने पळवला; दीपक चहरसाठी मोजले किती कोटी? जाणून घ्या
10
मी ही निवडणूक मोठ्या मताधिक्याने कसा जिंकलो..? जितेंद्र आव्हाडांनी सांगितला १ ऑगस्टपासूनचा EVM चा घटनाक्रम
11
IPL Auction 2025: भुवीसाठी MI अन् LSG यांच्यात 'बोली युद्ध'; होऊ दे खर्च म्हणत शेवटी RCB नं मारली बाजी
12
फडणवीस मुख्यमंत्री झाले तर भाजपकडे शिंदेंसाठी प्लॅन 'B'? ठरू शकतो असा फॉर्म्युला 
13
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सला इशान किशनचा पर्याय सापडला! कोण आहे त्याची जागा घेणारा रायन रिकल्टन?
14
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
15
"चांगल्या घरातल्या मुली...", मनिषा कोईरालाच्या पदार्पणावर विचारले गेले होते प्रश्न; म्हणाली...
16
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
17
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
18
द्रविडच्या RR नं दिला MS धोनीच्या CSK ला शह! कल्याणकर Tushar Deshpande चं 'कल्याण'
19
मल्लिका शेरावतचं फ्रेंच बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप! म्हणाली, "आजच्या काळात योग्य व्यक्ती शोधणं..."
20
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग

अदृश्य आजारांना सीमेवरच रोखूया!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2020 4:42 AM

आपण म्हणतो, राजकारणी ‘Divide and Rule Policy’चा वापर करतात; पण हल्लीचे विषाणूदेखील हीच पॉलिसी वापरून सर्वव्यापी बनत आहेत. म्हणून एकत्र येऊन लढण्याची गरज आहे.

- डॉ. विकास महात्मे, राज्यसभा सदस्य, पद्मश्री पुरस्कृत नेत्रतज्ज्ञमराठीत एक म्हण आहे, ‘पुढच्यास ठेच मागल्यास शहाणपण’. खरे म्हणजे हे वाक्य आयुष्याची फार मोठी शिकवण देते. कोरोनाने जी ठेच दिली त्यातून शहाणपण घेण्याची वेळ आली आहे. उपचार, आहार, काढे, पीपीई, मास्क या विषयांवर चर्चा होत असते. मात्र, मी आज वेगळा विषय मांडू इच्छितो... ‘झुनोसिस’ची संकल्पना.झुनोसिस म्हणजे काय? : कोरोनाचा कहर आला कुठून, असे विचारले तर पटकन् उत्तर मिळते ‘चीनमधून’; पण चीन हा या महामारीच्या प्रवासाचा ‘मार्ग’ होता. कोरोनाची उत्पत्ती झाली चीनच्या ‘मार्केट’मधून व मार्केट कसले होते? तर ते होते चिनी लोक आहारात वापर करतात त्या वन्यप्राण्यांच्या मांसाचे! अनेक वैज्ञानिकांचा दावा आहे की, खवल्या मांजरात हा विषाणू होता व तेथून तो पसरला. म्हणजे एका प्राण्यापासून मानवाला तो आजार झाला. असे आजार जे प्राण्यांपासून मानवाला किंवा कधी कधी मानवापासून प्राण्यांना होतात, त्या आजारांना झुनोटिक आजार व या विज्ञानाला झुनोसिस असे म्हणतात.

कोरोना हा काही पहिला झुनोटिक आजार नव्हे. यापूर्वी केरळमध्ये ‘निपाह’ पसरला, तो वटवाघळापासून आला होता. तसेच ‘इबोला’ विषाणूही वटवाघळापासून आला; पण हे आजार वेळीच सतर्कतेने थांबवू शकलो. प्राण्यांच्या मूत्रविसर्जनातून लेप्टोस्पायरोसीस आजार होतो, उंदरांपासून प्लेग होतो. सिवेट कॅट या प्राण्यापासून सार्स पसरला, रेबीज झालेला कुत्रा चावला तर त्याची लाळ आपल्या खरचटलेल्या भागात किंवा ‘म्युकस मेंबरेन’च्या संपर्कात आली तर रेबीज होतो, हे वेळोवेळी ऐकले आहे. ब्रुसेलोसिस, तसेच व्हेक्टर बॉर्न (डाससदृश कीटकांच्या शरीरातील जंतू) आजारही आहेत. शास्त्रीयदृष्ट्या असे आढळले की, संसर्गजन्य रोग झालेले १० रुग्ण असतील, तर त्यातले जवळपास सहा झुनोटिक म्हणजे प्राण्यांपासून मानवाला झालेले असतात.
यावर काय करता येईल? : प्रथम आपली विचारधारा बदलावी लागेल. हे लक्षात घ्यावे लागेल की, मानवाला झुनोटिक आजारांचे संक्रमण होऊ नये असे वाटत असेल, तर या प्राण्यांमध्येही त्या विषाणूंचा शिरकाव होऊ नये याची काळजी घ्यावी लागेल. उदाहरणार्थ कुत्र्याला रेबीज होऊ नये म्हणून लस टोचली तर त्याची किंमत फारच कमी असते (साधारण ८० रु.). असा रेबीजची लस टोचलेला, पाळीव कुत्रा चावला तर आपण लगेच रेबीजची लस घेण्याची गरज नसते. मात्र, ज्या कुत्र्याने चावा घेतला त्याला रेबीजची लस दिलेली होती अथवा नाही, हेच माहिती नसेल तर कुत्रा चावलेल्याला रेबीजचे इंजेक्शन देणे गरजेचे असते, ज्याचा खर्च सुमारे २००० रुपये प्रतिव्यक्ती असतो. वर्षभरात देशात श्वानदंशांच्या सुमारे १७४ लाख केसीस होतात. मग यामागे होणाऱ्या खर्चाची कल्पनाच करायला नको. यातूनच रेबीज लसींचा तुटवडा निर्माण होतो. म्हणजे झुनोटिक आजारांसाठी ह्युमन हेल्थ प्रोफेशनल्स (मानवी आरोग्य विशेषज्ञ), जसे की डॉक्टर्स, नर्सेस व पशुवैद्यकीय अधिकारी, पर्यावरणतज्ज्ञ यांनी एकत्र यावे लागेल.
‘वन हेल्थ’ म्हणजे काय? : प्राण्यांपासून मानवाला किंवा मानवापासून प्राण्याला होणाºया आजारांच्या नियमनासाठी जागतिक आरोग्य संघटनेने ‘वन हेल्थ’ संकल्पना आणली. अनेक देशांमध्ये ही कल्पना रुजली व कार्यान्वितही झाली. खरे तर भारतात जागोजागी ‘वन हेल्थ’ केंद्र सुरू करण्याची नितांत गरज आहे. गेल्या अडीच वर्षांपासून मी यासाठी कार्यरत आहे. तत्कालीन आरोग्यमंत्री जी. पी. नड्डा, डॉ. हर्षवर्धन, महाराष्ट्राचे तत्कालीन पशुखात्याचे सचिव अनुपकुमार, ‘माफसू’चे उपकुलगुरू पातूरकर, ‘आयसीएमआर’चे गंगाखेडकर यांच्यासोबत केलेल्या पाठपुराव्याला यश आले व देशातील पहिले ‘वन-हेल्थ’ केंद्र नागपुरात सुरू करू शकलो, याचा मला सार्थ अभिमान आहे. आणखी एक उल्लेखनीय बाब म्हणजे या केंद्रात अत्यंत अडचणीच्या काळात कोरोनाची चाचणीही कार्यान्वित करून घेऊ शकलो. त्यामुळे कोरोना निदानासाठी मोलाचे योगदान केंद्र देत आहे.‘वन-हेल्थ’- आव्हाने : ‘वन-हेल्थ’चा विचार रुजविण्यासाठी व कृतीत आणण्यासाठी बरेच काम करावे लागेल. प्रथम डॉक्टरांमध्ये जागृती आणावी लागेल. आरोग्यसेवक, पशुवैद्यकीय अधिकारी, पर्यावरणतज्ज्ञ यांची टीम उभारावी लागेल. भारतातील हे एकमेव केंद्र ‘माफसू’च्या आवारात आहे; पण त्यासाठी स्वतंत्र इमारत व आवाराची आवश्यकता आहे. प्रत्येक राज्यात असे केंद्र हवे.
‘हेल्थ-आर्मी’ची संकल्पना : देशाच्या सीमांचे रक्षण करायला फौजा सदैव तयार असतात; पण दुर्दैव असे की, कोरोनासारखे आजार या सीमा जाणत नाहीत व जगभर पसरतात. म्हणून अशा आजारांना सीमेवरच रोखण्यासाठी वन-हेल्थ केंद्रांतर्गत ‘हेल्थ-आर्मी’ असायला हवी. या आर्मीत वैद्यकीय तज्ज्ञ, सार्वजनिक आरोग्य तज्ज्ञ, विमानतळ व सी पोर्ट सुरक्षा, नियोजन तज्ज्ञ, आरोग्यसेवा पुरविणाऱ्या संस्था, सामाजिक संस्था, माहिती व तंत्रज्ञान तज्ज्ञ या सर्वांचा समावेश असेल. जगभरात कुठेही संसर्गजन्य आजाराच्या अस्तित्वाची माहिती मिळताच आपण सतर्क होऊन कार्यान्वित होण्यासाठी हेल्थ आर्मी सज्ज असेल. पहिला टप्पा म्हणजे असा धोका ओळखणे, त्याची तीव्रता समजून घेणे व त्यानुसार प्रणाली कार्यान्वित करणे. विमानतळ, सी-पोर्ट, आंतरराष्ट्रीय रेल्वे या माध्यमातून होऊ शकणाऱ्या भावी संसर्गाला तेथेच अडविणे. यासाठी युद्धपातळीवर वेळीच कृती झाली तर आपला देश या अदृश्य शत्रूंपासून वाचवू शकतो.आपण म्हणतो, राजकारणी ‘Divide and Rule Policy’चा वापर करतात; पण हल्लीचे विषाणूदेखील हीच पॉलिसी वापरून सर्वव्यापी बनत आहेत. म्हणून एकत्र येऊन लढण्याची गरज आहे. ‘चला, प्राण्यांपासून होणाºया आजारांचा एकत्रित सामना करूया.’

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या