शहरं
Join us  
Trending Stories
1
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
2
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
3
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
4
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
5
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
6
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
7
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
8
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
9
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
10
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
11
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
12
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
13
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
14
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
15
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
16
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
17
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
18
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
19
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
20
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 

देशी वृक्षसंपदेबाबत साक्षरता वाढायला हवी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 05, 2019 6:19 AM

कातकरी, आदिवासी, ठाकूर, महादेव कोळी यांनाच खरं जंगलाचं आकलन आहे. आजचा शिक्षित आणि प्रशिक्षित समाज तर जंगलाची फक्त नासाडी करताना दिसतोय, अगदी वन विभाग ते श्रीमंत लोक सर्वात जास्त निसर्गाचं वाटोळं करत आहेत.

- महेश गायकवाड(पर्यावरणतज्ज्ञ)कातकरी, आदिवासी, ठाकूर, महादेव कोळी यांनाच खरं जंगलाचं आकलन आहे. आजचा शिक्षित आणि प्रशिक्षित समाज तर जंगलाची फक्त नासाडी करताना दिसतोय, अगदी वन विभाग ते श्रीमंत लोक सर्वात जास्त निसर्गाचं वाटोळं करत आहेत. जंगलात राहणारा माणूस म्हणतोय रान लाल झाल्याशिवाय जंगलात प्राणी आहेत की नाहीत हे कळतच नाही, म्हणजेच उंबराला फळं लागली की समजायचं शाकाहारी प्राणी आलेच लाल फळं खायला आणि त्यांना खायला मांसाहारी प्राणी, एवढं सोपं आहे त्याचं वन्यजीव पाहण्याचं गणित.अगदी आपण सहजपणे भटकायला निघालो तर आपल्याला वाटतं की काहीतरी फळ खायला मिळावं. पण त्यासाठी फक्त देशी झाडं उपयोगी असतात. त्याशिवाय आपल्याला फळं कशी मिळणार? गुलमोहर-निलगिरी यांची फळं आपण खाऊच शकत नाही. उपयोगी झाडं लावणं नितांत गरजेचं असताना आपण परदेशी शोभिवंत झाडं लावल्यामुळे काहीच खायला मिळत नाही आणि मग जंगल आणि माणूस असं नातं तुटत चाललंय की काय, असं म्हणायला हरकत नाही.पिंपळाच्या झाडाखाली लाखो बिया पडल्याचं पाहून खूप समाधान वाटतं. कारण रात्रभर शेकडो वाटवाघळं ताव मारीत असतात तर दिवसभर पक्षी आणि इतर जीव ताव मारतात. खरं तर अशी बहुपयोगी झाडं असतील तर, शेतीवरील हल्ले होताना ही झाडं जास्त प्रमाणात लावली तर मग द्राक्षं, बोरं या पिकांवर हल्लेच होणार नाहीत. खरं तर प्रत्येक गावात १00 अशी बहुपयोगी झाडं लावून जतन केल्यास सर्व हल्ले बंद होतील आणि पर्यायाने अनेक पक्षी व वाटवाघळं यांचं शेतीपिकावर अवलंबून राहणं बंद होईल.आपल्या भागात ग्रामपंचायत स्तरावर याबाबत जनजागृती होणं अत्यावश्यक आहे. कारण आजकाल गावात तर परदेशी झाडं लावण्याचं पीकच आलेलं आहे. त्यामुळे असणारी वड, उंबर, आंबा, जांभूळ, बाभूळ अशी उपयोगी झाडं तोडण्याचा सपाटाच लावलेला आहे. अर्थात हे अज्ञान मोठ्या प्रमाणात पसरत आहे. याला वेळीच आळा घालण्याची गरज असताना कुठलीही शासकीय योजना नाही. शिवाय परदेशी वृक्ष लागवडीत वन विभाग आघाडीवर आहे, मग शहाणपण कोठून येणार? आता सर्वांनी निसर्गवाचन शिकणं गरजेचं आहे. किमान येणारी नवीन पिढी तरी पर्यावरण साक्षर झालीच पाहिजे यासाठी प्रयत्न करणं नितांत गरजेचं आहे. निसर्ग वाचवायचा असल्यास तो वाचता आला पाहिजे हे सूत्र सर्वांसमोर आलं पाहिजे कारण हे प्रत्येक भारतीयाचं कर्तव्य आहे.आपल्या परिसरातील वृक्षसंपदा सोडून चुकीची झाडं लावून परिसर व अधिवास नष्ट करण्याचं मोठं काम शासन करीत आहे. याला वेळीच थांबवलं पाहिजे नाहीतर आपला शेवट नक्कीच. आजचा शेतकरी वन्यजीव संघर्ष वाढीस लागण्यास परदेशी वृक्षलागवड मोठ्या प्रमाणात जबाबदार असल्याचं दिसून येत आहे. कारण बांधावरील उपयोगी झाडांची जागासुद्धा परदेशी निलगिरी-गुलमोहर- सुभाभूल - रेन ट्री - खोटा अशोक - खोटा काटेसावर अशी नानाविध विनापयोगी झाडे लावल्याने संघर्ष अटळ आहे. त्यात भर म्हणजे शहरात तर ८0 टक्क्यांपेक्षा जास्त परदेशी झाडं लावून आपल्या परिसरातील वन्यजीवांचे अधिवास, राहण्याची जागा असलेली झाडं, गवत, झुडपं, पाणथळ जागा, जुनी वाळलेली झाडं सर्व काही नष्ट करून शेतीवरील वन्यजीवांचं अतिक्रमण अर्थात हल्ले वाढले. यात बोर, द्राक्ष, डाळिंब अशा वास येणाऱ्या पिकांवर मोठ्या प्रमाणात हल्ले वाढले. कारण परिसरातील उंबर, वड, पिंपळ, भोकर, जांभूळ, आंबा अशी शाकाहारी वन्यजीवांची खाद्याची झाडं तोडल्यामुळे या सर्व जीवांनी आपला मोर्चा शेतीकडे वळविला. यात वटवाघळं, पक्षी, माकडं, वानरं, हरणं असे अनेक वन्यजीव शेतीकडे आकर्षित होऊन आपली खाद्याची जागा शेती म्हणून पाहू लागले.शाळेतील मुलांना कचरा म्हणजे झाडांची वाळलेली पानं, गवत असं चुकीचं शिक्षण दिलं जात आहे हे वेळीच थांबवणं गरजेचं आहे. कारण हीच वाळलेली पानं, फुलं, गवत हे वनस्पती स्वत:साठी खत म्हणून निर्मिती करतात. प्रत्येक झाड एका जागेवरून दुसरीकडे जाऊ शकत नाही म्हणून आपल्याच अंगावरील पाने गाळतात आणि त्याचा वापर स्वत:च्या वाढीसाठी करून घेतात.अर्थात शेती आणि शेतकरी अशी अतिशय बिकट असलेली परिस्थिती आणि संघर्ष फक्त सामान्य शेतकºयाच्या वाट्याला येऊ लागल्या, आणि संघर्ष वन्यजीवांना संपवण्यापर्यंत पोहोचला आहे. आपण सर्व जण एकच चांगलं काम करू शकतो ते म्हणजे आपल्या भागातील जैवविविधता आहे तशी नैसर्गिकरीत्या जोपासणं. सर्वात जास्त बहुपयोगी असलेला वड, आपल्या भारताचं राष्ट्रीय झाड म्हणून ओळखलं जातं. दिवसातील जास्त वेळ व मोठ्या प्रमाणात आॅक्सिजन देणारं झाड असून वटपौर्णिमा साजरी करण्याचं मोठं कारण म्हणजे हा जीवनदायी वृक्ष आहे. अनेक समाजांत अशी समजूत आहे की, प्रत्येकाने किमान दोन तरी वड लावलेच पाहिजेत म्हणजे घडलेल्या पापांचं परिमार्जन होतं. सूरपारंब्याचा खेळ लहानपणी खेळणारे आपण, यापुढे किमान आपापल्या गावात एक तरी वड लावला पाहिजे.

टॅग्स :forestजंगलIndiaभारत