शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
2
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
3
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
4
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
6
तिसरी बार, १०० पार; भाजपाला 'ही' हॅटट्रिक जमेल? नेमकं कसं आहे समीकरण
7
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
8
"लादीवर झोपवायचे म्हणता, तुमच्या वडिलांना विचारा, तेव्हा...;" रामदास कदम यांची आदित्य ठाकरेंवर जहरी टीका 
9
श्रद्धा वॉकर हत्याकांडातील आरोपी आफताब बिश्नोई टोळीच्या हिटलिस्टवर, तिहार प्रशासन सतर्क
10
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
11
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
12
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
13
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब
14
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
15
"...म्हणून सत्तेतील लोकांची पळापळ सुरू झालीये"; जयंत पाटलांचे महायुतीला पाच सवाल
16
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
17
Kamakhya Temple: पाळीचे ४ दिवस धर्मकार्यासाठी निषिद्ध; कामाख्या मंदिरात त्याच ४ दिवसांचा उत्सव!
18
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
19
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
20
Tripuri Purnima 2024: त्रिपुरी पौर्णिमेच्या संध्याकाळी त्रिपुरी वात जाळा; महादेवाच्या कृपेने दुःख-दैन्य टाळा!

छोटा कार्टर माउंट एव्हरेस्टच्या बेस कॅम्पवर !

By ऑनलाइन लोकमत | Published: February 01, 2024 9:03 AM

Mount Everest: सर्वसामान्य व्यक्ती असो किंवा पट्टीचा गिर्यारोहक, जगातलं सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्ट हा अनेकांचा जिव्हाळ्याचा विषय असतो. सोनेरी बर्फाच्या या पर्वतावरून सूर्याचं दर्शन घ्यावं, निसर्गाच्या अद्भुत कलाकारीत स्वत:ला विसरावं आणि तो क्षण आयुष्यभर आपल्या स्मरणात कैद करून ठेवावा, असं त्यांना वाटत असतं.

सर्वसामान्य व्यक्ती असो किंवा पट्टीचा गिर्यारोहक, जगातलं सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्ट हा अनेकांचा जिव्हाळ्याचा विषय असतो. सोनेरी बर्फाच्या या पर्वतावरून सूर्याचं दर्शन घ्यावं, निसर्गाच्या अद्भुत कलाकारीत स्वत:ला विसरावं आणि तो क्षण आयुष्यभर आपल्या स्मरणात कैद करून ठेवावा, असं त्यांना वाटत असतं. त्यामुळे अनेक सर्वसामान्य माणसंही माउंट एव्हरेस्ट सर करायचंच या उर्मीनं या पर्वताकडे झेपावतात. तिथला शेर्पा आणि ऑक्सिजनची सिलिंडर्स आपल्याला तारून नेतील, असा त्यांचा विश्वास असतो. माणूस तेवढाच जिद्दी असेल, निसर्गाची साथ असेल आणि सगळंच जुळून आलं तर ते काही वेळेस शक्यही होतं, पण बऱ्याचदा निसर्गाच्या या लहरीपणापुढे भल्याभल्यांनाही शरणागती पत्करावी लागते. त्यामुळे आजवर अनेक पट्टीच्या गिर्यारोहकांनाही माउंट एव्हरेस्टवरच चिरसमाधी घ्यावी लागली आहे. पण तरीही जगभरात या पर्वताचं आकर्षण तसूभरही कमी झालेलं नाही. 

अनेक जण तर यासाठी अनेकदा प्रयत्न करतात. कारण आजवर अनेकांना माउंट एव्हरेस्टचं शिखर अगदी हातातोंडाशी असतानाही मोहीम सोडून द्यावी लागली आहे. निसर्गाच्या रौद्र रूपापुढे कोणाचंच काही चालत नाही. शेर्पा आणि ऑक्सिजनच्या सिलिंडर्सनी माउंट एव्हरेस्ट सर करण्याचं काम बऱ्यापैकी आवाक्यात आणलं असलं तरीही हे साहस अनेकदा तुमच्या प्राणांचीही मागणी करतंच. दि. २५ एप्रिल २०२२ हा दिवस तर माउंट एव्हरेस्टच्या इतिहासातील काळा दिवस मानला जातो. कारण या एकाच दिवशी इथे तब्बल २२ जणांना चिरसमाधी मिळाली होती. त्यात अर्थातच अनेक पट्टीच्या गिर्यारोहकांचा समावेश होता. काही जणांनी तर याआधीही माउंट एव्हरेस्ट सर केलेलं होतं ! माउंट एव्हरेस्टवर नुसतं एकदा पाऊल ठेवायचं तर आजही अनेकांना आपले प्राण गहाण ठेवावे लागतात, पण नेपाळच्या कामी रिता शेरपानं आतापर्यंत तब्बल २८ वेळा माउंट एव्हरेस्ट पादाक्रांत केलं आहे. सध्या तो ५४ वर्षांचा आहे. माउंट एव्हरेस्टच्या बेस कॅम्पपर्यंत जाणारा सर्वाधिक कमी वयाचा व्यक्ती म्हणून आजवर झेक रिपब्लिकच्या एका चार वर्षांच्या मुलाचं नाव घेतलं जात होतं, पण ते रेकॉर्ड नुकतंच एका दोन वर्षांच्या चिमुरड्यानं मोडलं आहे. स्कॉटलंडच्या या मुलाचं नाव आहे कार्टर डलास ! 

माउंट एव्हरेस्टच्या बेस कॅम्पपर्यंत कार्टर कसा पोहोचला याची कहाणीही रोमांचक आहे. कार्टरचे आई-वडील जेड आणि रॉस दोघेही पट्टीचे गिर्यारोहक, निसर्गप्रेमी आणि भटके ! माउंट एव्हरेस्ट सर करण्यासाठी गेल्या वर्षीच त्यांनी स्कॉटलंड, आपली मायभूमी सोडली होती. त्यासाठी त्यांनी तिघांचीही ‘वन-वे’ तिकिटंच काढली होती. कारण आपण परत कधी जाऊ, कसं जाऊ हे त्यांनाही माहीत नव्हतं. आशियाच्या यात्रेवर ते निघाले होते. निघण्याआधी त्यांनी पैशांचा थोडा बंदोबस्त केला. आपलं घर भाड्यानं दिलं आणि नियमित काही पैसे मिळत राहतील याची व्यवस्था केली. सर्वांत पहिल्यांदा ते भारतात आले आणि मग नेपाळला गेले. ज्या दिवशी ते नेपाळला पोहोचले, त्याच दिवशी छोट्या कार्टरसह त्यांनी चढाईला सुरुवात केली. या दरम्यान कधी ते कार्टरचं बोट धरून त्याला चालवायचे, कधी तो स्वत:च त्यांचं बोट सोडून पळायचा, तर बऱ्याचदा त्या दोघांनीही आळीपाळीनं कार्टरला चक्क पाठीवर घेत बेस कॅम्पपर्यंतचा आपला ट्रेक पूर्ण केला. १७,५९८ फुटांपर्यंतची ही चढाई अर्थातच कस पाहणारी होती. कारण इतक्या उंचीपर्यंत पोहोचणं ही कुठल्याही अर्थानं सोपी गोष्ट नाही. शिवाय त्यांच्याबरोबर तर कार्टरही होता ! 

रॉस आणि जेड सांगतात, आमच्या सुदैवानं आमचा मुलगा कार्टरही लहानपणापासूनच निसर्गप्रेमी आहे. त्याला केवळ निसर्गच नाही, तर माणसंही खूप आवडतात. आशियाच्या प्रवासात अर्थातच माउंट एव्हरेस्ट हे आमचं प्रमुख आकर्षण होतंच. त्या वातावरणाचा सराव व्हावा आणि दमसास थोडा वाढावा म्हणून लांब श्वास घेण्याचा आणि योगाभ्यासाचा सराव आम्ही सुरू केला. माउंट एव्हरेस्टला मरणाची थंडी असते. बर्फाचा पर्वत म्हटल्यावर तेवढी थंडी असणारच. त्याचाही सराव व्हावा म्हणून घरी आम्ही रोज बर्फाच्या पाण्यानं अंघोळ करायला सुरुवात केली. अर्थातच कार्टरची अंघोळही याच पाण्यानं असायची! 

ना श्वासाचा त्रास, ना थंडीचा ! रॉस म्हणतो, सुरुवातीला आम्हाला जर शंका होती, पण एव्हरेस्टच्या मोहिमेबाबत कार्टर स्वत:च इतका आनंदी आणि उत्फुल्ल होता की मग आमचाही उत्साह दुणावला. थोड्या अधिक उंचीवर पोहोचल्यावर आम्हा नवरा-बायकोला श्वास घ्यायला काही वेळा त्रास झाला, पण कार्टर एकदम व्यवस्थित होता. बेस कॅम्पच्या आधीच्या गावात दोन डॉक्टर होते. त्यांच्याकडूनही आम्ही तपासणी करुन घेतली होती, पण त्यांनीही सांगितलं, तुम्हा दोघांपेक्षाही कार्टर जास्त हेल्दी आहे !

टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीय