शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

विजयासाठी ‘वाट्टेल ते’ घातकच!

By किरण अग्रवाल | Published: April 11, 2019 8:19 AM

युद्धात व प्रेमात सारे क्षम्य असते असे म्हणतात, त्याप्रमाणे निवडणुकीच्या रिंगणातही जिंकण्यासाठी वाट्टेल ते करण्याची मुभा असल्याचे जणू गृहीतच धरले जाते.

किरण अग्रवालयुद्धात व प्रेमात सारे क्षम्य असते असे म्हणतात, त्याप्रमाणे निवडणुकीच्या रिंगणातही जिंकण्यासाठी वाट्टेल ते करण्याची मुभा असल्याचे जणू गृहीतच धरले जाते. नाही तरी अलीकडे निष्ठा, तत्त्वादी शब्द राजकीय क्षितिजावरून अस्तंगत होऊ पाहात आहेत, त्यामुळे काही बाबी सोडताना नवीन काही अनुसरणे हा कालप्रवाहाचाच भाग ठरावा. प्रतिस्पर्धी उमेदवाराच्या खासगीतील कमजोरी अगर उणिवा हेरण्यासाठी ‘डिटेक्टिव्ह’ नेमून त्यांच्याद्वारे उपलब्ध माहितीच्या आधारे संबंधिताचे खच्चीकरण करण्याचे प्रयत्नही या ‘वाट्टेल ते’ प्रकारात मोडणारेच ठरावेत.विकासाच्या बाबतीत कितपत प्रगती साधली गेली हा वादाचा विषय होऊ शकेल; परंतु निवडणुकीतील प्रचार साधनांत मोठी प्रगती साधली गेल्याचे यंदा प्रकर्षाने दिसून येत आहे. उमेदवार भलेही अंगठेबहाद्दूर असेल, मात्र त्याच्या प्रचारासाठी उभारण्यात आलेल्या ‘वॉररूम’मध्ये तंत्रकुशल तरुणांच्या फौजा तैनात असल्याने जाहीर स्वरूपातील प्रचारापेक्षाही मतदाराच्या हाती असलेल्या मोबाइल फोनपर्यंत पोहचून व्यक्तिगत पातळीवर संपर्काचे प्रभावी फंडे प्रत्येकाकडून राबविले जात आहेत. यात स्वत:चा प्रचार व त्यादृष्टीने आपण केलेली किंवा भविष्यात करावयाच्या कामांची माहिती ‘सोशल मीडिया’द्वारे मतदारांपर्यंत पोहचवतानाच, निवडणूक रिंगणातील आपल्या विरोधकास जेरीस आणणारे मुद्देही ‘फॉरवर्ड’ करण्याला प्राधान्य दिले जात आहे. प्रचार हा तर नंतरचा भाग झाला, परंतु उमेदवारी मिळू न देण्यासाठीही असे ‘फंडे’ सोशली व्हायरल करण्यात आल्याचे दिसून आले आहे. जळगावमधील भाजपचे विद्यमान खासदार ए.टी. पाटील यांची उमेदवारी कापली जाण्यास असेच काहीसे कारण लाभल्याचे लपून राहिलेले नाही. तेव्हा, एकूणच निवडणूक प्रचारात सोशल मीडियाला व त्यावरून केल्या जाणाऱ्या उचित आणि अनुचितही प्रचाराला यंदा मोठेच महत्त्व प्राप्त झाले आहे.यातील अनुचित प्रचारासाठीच्या माहिती संकलनाकरिता काही राजकीय पक्षांनी व उमेदवारांनीही खासगी डिटेक्टिव्ह एजन्सीजना काम दिल्याचे या क्षेत्रातील असोसिएशनचे अध्यक्ष कुंवर विक्रमसिंह यांनीच सांगितले आहे. विरोधकाची गुन्हेगारी पार्श्वभूमी, शिवाय अनैतिक संबंध आदी माहिती याद्वारे मिळवून व तिचा प्रचारात वापर करून प्रतिस्पर्ध्याची प्रतिमा डागाळण्याचे काम केले जात असल्याचे पाहता यंदा प्रचारात कोणती पातळी गाठली जाऊ पाहते आहे ते स्पष्ट व्हावे. नीती, नैतिकता वगैरे सब झुठ; दुसऱ्याचे येनकेन प्रकारे खच्चीकरण करून आपल्या विजयाचा मार्ग प्रशस्त करू पाहण्याची ही रणनीती बहुतेकांकडून अवलंबिली जाऊ पाहात असल्याने तिला लाभलेली सर्वमान्यता लक्षात यावी. कुणाच्या खासगी आयुष्याचे असे भांडवलीकरण करणे चुकीचे आहे, नैतिकतेस धरून नाही व कायदेशीरदृष्ट्या वैधतेत मोडणारेही नाही; हे माहीत असूनही तसे करण्याचा प्रयत्न होतो, हे खरे आक्षेपार्ह ठरावे. पण, काळ बदलला तसे प्रचाराचे तंत्र बदलले व त्यात ‘सबकुछ चलता है’ प्रवृत्ती बळावली, त्याचेच हे लक्षण म्हणता यावे.निवडणुका येतील-जातील, जय-पराजयही होत राहतील; मात्र प्रचाराच्या असल्या ‘वाट्टेल त्या’ तंत्रातून कुणाच्या का होईना प्रतिमेवर ओढले जाणारे ओरखडे आणि त्याद्वारे गढुळणारे समाजमन हे चिंतेचाच विषय ठरावे. पण काळ इतका वेगाने पुढे सरकत आहे आणि निवडणुकीच्या रणांगणात यश मिळवण्याकरिता इतकी काही अटीतटीची लढाई चालली आहे की, प्रचारातील योग्य-अयोग्यतेचे भानच कुणाकडून राखले जाताना दिसत नाही. असे भान नसलेल्या व ताळतंत्र सोडून प्रचार करू पाहणाऱ्यांना आपल्या मताधिकाराच्या उपयोगाने ताळ्यावर आणण्याचे काम मतदारांनाच करावे लागणारे आहे.  

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकElectionनिवडणूकPoliticsराजकारण