शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मण हाकेंकडून मद्यप्राशन करून शिविगाळ, मराठा आंदोलकांचा आरोप, पुण्यात तणाव  
2
'दहशतवादाला कुठेही जागा नाही', युद्धाच्या पार्श्वभूमीवर PM मोदींची नेतन्याहूंशी फोनवर चर्चा...
3
"उद्धव ठाकरेंनी आमच्यावर टीका करताना आरसा बघावा", देवेंद्र फडणवीस यांचा टोला
4
बंडखोरी, मुख्यमंत्रिपदावरील दावेदारीसह या ४ मुद्यांनी हरियाणात वाढवलंय भाजपा, काँग्रेसचं टेन्शन
5
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे लाटणाऱ्यांवर काय कारवाई होणार? मंत्री अदिती तटकरे म्हणाल्या...
6
"राहुल निरागस, स्वतःला फॅन्टम समजतात; त्यांनी...", हिमंता बिस्वा सरमांची बोचरी टीका
7
आता कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या ईडीच्या निशाण्यावर! MUDA घोटाळ्याप्रकरणी PMLA अंतर्गत FIR दाखल
8
राहुल गांधी ४,५ ऑक्टोबरला महाराष्ट्रात; छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयाचे करणार अनावरण
9
Akola: मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हरवले आहेत, अकोल्यात कॉग्रेसचे अनोखे आंदोलन
10
"दम असेल तर उद्धव ठाकरेंनी फडणवीसांविरोधात निवडणूक लढावी", फडणवीसांचे निकटवर्तीय जोशींचे आव्हान
11
इलेक्टोरल बाँड खंडणी प्रकरणात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना दिलासा, उच्च न्यायालयाकडून तपासाला स्थगिती
12
विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचे उमेदवार कसे निवडले जाणार? पक्षश्रेष्ठींनी ठरवला 'मास्टरप्लॅन'
13
विमान अपहरणानंतर वाटाघाटींसाठी गेलेल्या जसवंत सिंहांच्या लाल सुटकेसमध्ये काय होतं? २५ वर्षांनंतर मुलाने केला मोठा गौप्यस्फोट  
14
अवघ्या २३ धावा, ३ षटकार; तरीही रोहितने केली 'मास्टरब्लास्टर'ची बरोबरी, काय केला पराक्रम?
15
"हा 'पंढरी' कायम चालत राहील आणि...", पॅडी कांबळेची पोस्ट चर्चेत
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी ठाणे जिल्हा दौऱ्यावर; अधिकाऱ्यांनी घेतली पूर्वतयारी आढावा बैठक! 
17
अपक्ष निवडणूक लढवतेय देशातील सर्वात श्रीमंत महिला; मुलगा प्रचारापासून लांब तर सून मैदानात
18
नोकरी सोडून गेलेल्या कर्मचाऱ्याला Google ने परत बोलावले; पगार तब्बल 22,000 कोटी रुपये!
19
युवासेनेच्या आनंदावर विरजण? ‘पिक्चर अभी बाकी है’ म्हणत सिनेट निकालाला हायकोर्टात आव्हान
20
"ब्राह्मणांना मारून योगीं आदित्यनाथ...!"; हे काय बोलून गेले काँग्रेस नेते रणदीप सिंह सुरजेवाला?

Lok Sabha Election Result 2024 : मायावती : राजकीय शेवटाची सुरुवात?

By रवी टाले | Published: June 07, 2024 9:32 AM

Lok Sabha Election Result 2024 : यावेळी उत्तर प्रदेशातली हक्काची मतेही मायावतींना मिळाली नाहीत, कारण ऐन निवडणुकीच्या दरम्यान त्यांनी घेतलेले अनाकलनीय निर्णय!

- रवी टाले(कार्यकारी संपादक, जळगाव)लोकसभा निवडणूक निकालांनी ज्या नेत्यांच्या राजकीय कारकिर्दीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत, त्यामध्ये बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. यावेळी त्यांच्या पक्षाला एकही जागा तर जिंकता आली नाहीच; पण मतांची टक्केवारीही चांगलीच घसरली. काही वर्षांपूर्वी राष्ट्रीय पातळीवर कॉंग्रेस व भारतीय जनता पक्षाखालोखाल बहुजन समाजवादी पक्षाचा दबदबा होता; परंतु २०१४ मध्ये नरेंद्र मोदी यांचा राष्ट्रीय राजकारणाच्या क्षितिजावर उदय झाला आणि मायावतींच्या  कारकिर्दीला ग्रहणच लागले.

गत लोकसभा निवडणुकीत समाजवादी पक्षाशी युती करून बसपने १० जागा जिंकल्या होत्या. यावेळी मात्र मायावतींनी कोणत्याही पक्षाशी युती करण्यास नकार दिला होता. त्याशिवाय आणखीही बरेच अनाकलनीय निर्णय त्यांनी निवडणुकीदरम्यान घेतले. उमेदवारांची निवड आणि घोषणा यामध्येही बरेच घोळ घातले. राष्ट्रीय पक्षांमध्ये सर्वाधिक म्हणजे तब्बल ४८८ जागा बसपने देशभर लढविल्या; पण पक्ष निवडणूक लढवतोय, असे जाणवलेच नाही. मायावतींनी गतवर्षी त्यांचा राजकीय उत्तराधिकारी म्हणून भाचा आकाश आनंद याच्या नावाची घोषणा केली होती; पण ऐन लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरू असताना मायावतींनी त्याला थेट बेदखलच केले. कधीकाळी गळ्यातील ताईत असलेल्या सतीशचंद्र मिश्रा यांना स्टार प्रचारकांच्या यादीत स्थान देऊनही प्रचारापासून अलिप्तच ठेवले.

निवडणूक निकालांनंतरही मायावतींचे अनाकलनीय वागणे सुरूच आहे. मोठ्या प्रमाणात उमेदवार देऊनही मुस्लिमांची मते मिळाली नाहीत, म्हणून यापुढे त्यांना फारच काळजीपूर्वक उमेदवारी देऊ, अशी धक्कादायक पोस्ट त्यांनी निकालाच्या दुसऱ्याच दिवशी समाजमाध्यमांवर केली. गत लोकसभा निवडणुकीत सप-बसप युतीला उत्तर प्रदेशात मिळालेल्या १५ जागांपैकी दहा जागा एकट्या बसपला मिळाल्या होत्या. तरीही मायावतींनी युती तोडण्याची घोषणा केली. ती युती कायम राहिली असती तर गत कामगिरीच्या बळावर बसपला जागा वाटपात सन्मानजनक वाटा मिळू शकला असता आणि पक्षाचे काही खासदार तरी नक्कीच निवडून आले असते. यावेळीही काँग्रेसने बसपला इंडिया आघाडीत आणण्याचा प्रयत्न केला; पण मायावतींनी त्या प्रस्तावालाही ठाम नकार दिला.

इंडिया आघाडीपासून दूर राहाण्याचा निर्णय घेतल्याने बसप ही भारतीय जनता पक्षाची ‘बी टीम’ असल्याच्या आरोपाला बळ मिळाले आणि बसपचा परंपरागत जाटव मतदारही पक्षापासून दूर गेला. परिणामी पक्षाने केवळ जागाच गमावल्या नाहीत, तर मतांच्या टक्केवारीतही पक्ष लक्षणीयरीत्या माघारला. वस्तुतः उत्तर प्रदेशात बसपची हक्काची अशी किमान २० टक्के मते आहेत; पण यावेळी त्याच्या अर्धीही पक्षाला मिळू शकली नाहीत. त्याचा थेट लाभ सप-कॉंग्रेस युती आणि चंद्रशेखर आजाद यांना मिळाला आहे. आजाद लोकसभेत पोहचले आहेत, तर सप आणि कॉंग्रेसच्या जागांमध्ये लक्षणीय भर पडली आहे. बसपची हक्काची दलित मते त्यांच्याकडे वळल्याचा त्यासाठी मोठा हातभार लागला. पोकळी ही गोष्ट केवळ ब्रह्मांडातच असते. इतर कोठेही पोकळी निर्माण झाली, तरी ती अल्पावधीतच भरून निघत असते. बसपला तो अनुभव लोकसभा निवडणुकीत आला आहे. त्यापासून धडा न घेतल्यास मायावतींच्या राजकीय शेवटास सुरुवात होऊ शकते.

टॅग्स :mayawatiमायावतीUttar Pradesh Lok Sabha Election 2024उत्तर प्रदेश लोकसभा निवडणूक निकाल २०२४lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४lok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकाल