शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: अनेक मतदारसंघांमध्ये उलथापालथ; या क्षणाला कोणी घेतली आघाडी? सर्व अपडेट्स
2
बीडमधून मोठी अपडेट; परळी विधानसभेत धनंजय मुंडे पहिल्या फेरीत आघाडीवर!
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : ३५ मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी थेट लढत; कोण मारणार बाजी?
4
माहीममधून मोठी बातमी! अमित ठाकरेंची आघाडी, सदा सरवणकर पिछाडीवर
5
Maharashtra Assembly Election 2024 Result Dahisar Vidhansabha : दहिसरमधून भाजपच्या मनीषा चौधरी आघाडीवर, तिसऱ्यांदा उतरल्यात मैदानात; उबाठाचे विनोद घोसाळकर पिछाडीवर
6
Maharashtra Assembly Election Result 2024: पहिल्या १३० जागांचे कल हाती, महायुती आणि मविआत काटे की टक्कर, भाजपा वरचढ
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results: निकालापूर्वीच शरद पवार-उद्धव ठाकरेंचं सावध पाऊल; दगाफटका टाळण्यासाठी महत्त्वाचा निर्णय!
8
पोस्टल मतदानात युगेंद्र पवार आघाडीवर; बारामतीत काय होणार? सर्वांचे लक्ष लागले
9
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 ५१ मतदारसंघात एकनाथ शिंदे- उद्धव ठाकरे आमनेसामने; खरी शिवसेना कुणाची जनता ठरवणार
10
पुन्हा २३ नोव्हेंबर! आताही असेच काही घडले तर?
11
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
12
'शाका लाका बूम बूम' फेम संजू अडकला लग्नाच्या बेडीत, मराठी पद्धतीने पार पडला विवाहसोहळा
13
...तर आम्हालाही आत्मरक्षणाचा अधिकार; मणिपूरचे मंत्री मैतेई यांनी दिला इशारा
14
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
15
जगभर : ‘चिरतरुण’ होण्यासाठी चरबीचं ‘इंजेक्शन’!
16
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
17
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
18
विशेष लेख: ‘प्रोजेक्ट गॅदर’ : एकटेपणावर ‘अमेरिकन’ उपाय
19
अमोल पालेकर नावाच्या ‘थोड्याशा रुमानी’ ‘आक्रिता’ची कहाणी

निवडणुकीच्या निकालाआधीच लोकशाहीचा विजय!

By विजय दर्डा | Published: June 03, 2024 8:05 AM

Lok Sabha Elections 2024 : निवडणुकीत हार-जीत झाल्यानंतर शत्रुत्व विसरून देशाच्या विकासासाठी सत्तारूढ आणि विरोधी पक्षांनी एकत्र आले पाहिजे.

- डाॅ. विजय दर्डा (चेअरमन, एडिटोरियल बोर्ड, लोकमत समूह)

आता फक्त एका दिवसाची प्रतीक्षा उरली आहे. भारतीय मतदारांनी कोणाला सत्तेवर येण्याचा आदेश दिला, हे उद्या दुपारपर्यंत स्पष्ट झालेले असेल; परंतु एक गोष्ट अगदी नक्की आहे, निकाल लागण्याच्या आधीच या देशातील लोकशाही पुन्हा एकदा विजयी झाली आहे. आपल्या लोकशाहीचे  वैशिष्ट्य हेच की, तिला कोणीही ओलीस ठेवू शकत नाही. कारण या देशातला मतदार सतर्क, शक्तीशाली आहे.लोकसभेच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाल्यापासून सुमारे अडीच महिने नको त्या गोष्टी घडल्या, नेत्यांच्या तोंडून कडवट वक्तव्ये बाहेर पडली, शेवटी निवडणूक आयोगाला हस्तक्षेपही करावा लागला. उशिरा का होईना, अनेक पक्षाच्या प्रमुखांना आयोगाने दटावलेही. अशा गोष्टी बोलल्या गेल्या की, त्यांचा तपशील इथे लिहिणेही उचित नाही. 

महाराष्ट्राला ‘शिमगा’ काही नवा नव्हे. त्या दिवशी लोक समजून उमजून एकमेकांना शिव्या देतात,  राग मोकळा करतात. पण, तो दिवस सरला, की पुन्हा एकमेकांना प्रेमाने रंगही लावतात! या  निवडणुकीचे रंग शिमग्यासारखे दिसत होते. पण, तो शिमगा सरल्यावर  ही मंडळी एकमेकांना जवळ करतील का, कोण जाणे! ज्यांनी विष ओकले, त्यांच्याकडून स्नेहाची अपेक्षा कशी करावी? मी राजकीय कुटुंबामध्ये जन्माला आलो. अठरा वर्षे संसदीय लोकशाहीचे प्रतिनिधीत्व केले. १९६२ नंतर झालेल्या सगळ्या निवडणुका जवळून पाहिल्या. यावर्षीच्या निवडणुकीत भाषा अगदीच रसातळाला गेलेली पाहिली.  दोष कोणाला द्यावा? - सत्ताधाऱ्यांना की विरोधी पक्षाच्या नेत्यांना? - खरा न्याय शेवटी मतदारच करतो, यावर माझा विश्वास आहे. 

निवडणुकीच्या काळात प्रचारामुळे आधीच भडकलेले वातावरण सूर्याच्या उष्णतेने आणखीन तापवले. नेते मंडळींची डोकी गरम झालेली दिसत होती. भयंकर शब्द वापरले जात होते. नेत्यांनी कष्टही पुष्कळ घेतले. सभा आणि रोड शोच्या बाबतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वयाच्या या टप्प्यावर दाखविलेला उत्साह अन्य कोणात दिसला नाही. दोनशेपेक्षा जास्त सभा त्यांनी केल्या. रोडशोही केले. शिवाय ८० पेक्षा जास्त मुलाखती दिल्या. ही कमालीची उर्जा म्हटली पाहिजे. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल आणि प्रियांका गांधी यांनीही सभा आणि रोड शोच्या बाबतीत शतक झळकवले. यावेळी नेते स्वतःबद्दल कमी आणि आपल्या विरोधकांबद्दल जास्त बोलत होते. समोरचा अतिशय बेकार आहे, हे सिद्ध करण्याची अहमहमिका लागली होती.

या सगळ्यात मला जवाहरलाल नेहरू यांच्या पहिल्या निवडणुकीतील काही गोष्टी आठवल्या. चुकीच्या पद्धतीने जिंकण्यापेक्षा योग्य प्रकारे पराभूत होणे केव्हाही चांगले, असे ते म्हणत. १९६२ साली काँग्रेसचे उमेदवार रिखबचंद शर्मा यांच्या प्रचारासाठी पंडितजी नागपूरला आले होते. त्यांनी सभेत शर्मा यांच्याविषयी फार काही सांगितले नाही. पण, अपक्ष उमेदवार लोकनायक बापूजी अणे हा भला माणूस असल्याचे उद्गार काढले. त्या निवडणुकीत लोकनायक अणे विजयी झाले. अर्थात या सगळ्या घडून गेलेल्या गोष्टी आहेत.

मत द्यायला जे मतदार घराबाहेर पडले नाहीत, त्यांच्याबद्दल माझा आक्षेप जरूर आहे. लोकसभा निवडणुकीच्या एकूण सात फेऱ्या पार पडल्या. पहिल्या सहा फेऱ्यांची आकडेवारी पाहता २९ कोटी लोकांनी मतदान केले नाही. हा आकडा अमेरिकेत नोंदल्या गेलेल्या सुमारे २४ कोटी मतदारांपेक्षा पाच कोटींनी अधिक आहे. हा संदर्भ अशासाठी दिला, की आपली लोकशाही किती विशाल आहे हे आपणास समजावे. 

अमेरिका आणि मेक्सिकोच्या दौऱ्याच्या दरम्यान लोकांनी मोठ्या आश्चर्याने मला विचारले की, इतक्या मोठ्या प्रमाणावर शांततापूर्ण रीतीने तुमच्याकडे निवडणुका कशा घेतल्या जातात? भारतीय लोकशाहीची भव्यता संपूर्ण जगासाठी आश्चर्यजनक आहे. ही भव्यता सांभाळावयाची असेल तर मतदान का आवश्यक आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. जो मतदान करणार नाही, त्याला काही अधिकारांपासून वंचित केले तरी काही हरकत नाही.

मतदानाकडे मी पूजा, प्रार्थना आणि इबादत म्हणून पाहतो. लोकशाही हे आपले भाग्य आहे. जगातील ५०पेक्षा जास्त देशांमध्ये लोकांकडे आजही मताचा अधिकार नाही. तेथील जीवन गुलामांसारखे आहे. म्हणून तर स्वच्छ पद्धतीने, शांततापूर्ण रीतीने निवडणुका होणे, हीच भारतीय लोकशाहीची विजय पताका मानली गेली पाहिजे. केंद्रात सत्ता कोणाची राहणार हे उद्या कळेल. निवडून येणाऱ्यांचे आधीच अभिनंदन! परंतु, जे सत्तेपासून दूर राहतील, त्यांनी आपली जबाबदारी समजून घेतली पाहिजे. तेही आपल्या मतदारसंघातील लोकांच्या आशा अपेक्षा घेऊन संसदेत येणार आहेत. देशाबद्दल जेवढी जबाबदारी सरकारची असेल तेवढेच विरोधी पक्षांचीही असेल.

तूर्तास ही वेळ सर्वांनी एकत्र येऊन लोकशाहीचा महोत्सव दिवाळीसारखा साजरा करण्याची आहे. आपण जगातील तिसरी महाशक्ती व्हावे आणि त्या संपत्तीतून सामान्य माणसाचे घर आबादीआबाद व्हावे. ८० कोटी लोकांना धान्य फुकट देण्याची गरजच राहू नये. यासाठी देशाला विकासाच्या रस्त्यावर पुढे घेऊन जावे लागेल. सशक्त आणि समर्थ भारताची कल्पना आपण सर्वांनी एकत्र येऊन साकार केली पाहिजे.

टॅग्स :Votingमतदानlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४