शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
2
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
आधी ‘बटेंगे तो कटेंगे’ला विरोध, आता मोदींच्या सभेला दांडी, अजित पवारांच्या मनात चाललंय काय?  
4
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
5
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
6
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
7
पोलिसांनी शूटरलाच विचारले ‘कोणाला पाहिलं काय?’; बाबा सिद्दिकी प्रकरणातील धक्कादायक माहिती उघड
8
गजकेसरी योगात सूर्य-शनी गोचर: ७ राशींना अनुकूल, सकारात्मक काळ; लक्ष्मी कृपा अन् यश प्रगती!
9
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
10
तरुणीने बोलावले म्हणून लॉजवर गेला; मात्र नंतर तरुणासोबत घडला धक्कादायक प्रकार!
11
अग्निशमन दलातील माणसांचं वेदनादायी आयुष्य! 'अग्नी'चा ट्रेलर; जितेंद्र जोशी-सई ताम्हणकरची खास भूमिका
12
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
13
Maharashtra Election 2024 Live Updates: 'लाडकी बहीण'सारख्या योजनांचे सरकारने नीट नियोजन केलं आहे- मुख्यमंत्री शिंदे
14
सोयाबीनला सहा हजाराचा हमीभाव देणार; PM मोदींची मोठी घोषणा
15
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
16
Ola Electric CCPA Notice : Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
17
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
18
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य
19
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
20
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!

‘मविआ’त कोणता भाऊ धाकटा, कोण जुळे आणि कोण तिळे? वेळ चुकतेय, भाजप सावध होणार

By यदू जोशी | Published: May 26, 2023 12:18 PM

महाविकास आघाडीत कोण मोठा, कोण लहान यावरून वाद सुरू आहे. त्यावर ‘आम्ही तिळे’ हा पर्याय काढण्यात आला खरा; पण तो सर्वांना मान्य होण्याची शक्यता नाही.

- यदु जोशी, सहयोगी संपादक, लोकमत

महाविकास आघाडीत नवीन भावकी सुरू झाली आहे. कोण मोठा, कोण लहान यावरून वाद पेटला आहे. जन्मतारखेवरून लहान- मोठा भाऊ ठरवता येतो; पण पक्षांबाबत तो निकष लागत नाही. लहान- मोठ्याच्या वादात ‘आम्ही तर तिळे भाऊ’ हा ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांचा युक्तिवाद वादावर पडदा टाकण्यासाठी योग्य वाटला; पण तो तिन्ही पक्षांकडून स्वीकारला जाण्याची शक्यता नाही. दुसरे चव्हाण म्हणजे पृथ्वीराजबाबांनी आधी राष्ट्रवादी मग काँग्रेस अन् शेवटी शिवसेना, असा क्रम लावत मातोश्रीला धाकली पाती ठरवले. काँग्रेस व राष्ट्रवादी मिळून ठाकरेंच्या शिवसेनेला लहान ठरवत आहेत. 

ठाकरेंच्या बाजूने सहानुभूती दिसत असताना त्यांना लहान कसे करायचे, त्यांचे महत्त्व कमी कसे करायचे, हा प्रश्न भाजपला सतावत होता. हा प्रश्न सोडविण्यासाठी काँग्रेस व राष्ट्रवादी हे पक्षच भाजपला जणू आपणहून मदत करत आहेत. महाविकास आघाडीसाठी ठाकरेंबद्दलची सहानुभूती हा मोठा फॅक्टर आहे व त्यातूनच त्यांची प्रतिमा मित्रपक्षांच्या नेत्यांपेक्षा मोठी बनली आहे. ठाकरेंना मविआचे नेते मानले की, मग त्यांच्या पक्षाकडेच मविआचे नेतृत्व जाईल. म्हणजे पुन्हा आपल्याला क्रमांक दोन, तीनवर बसावे लागेल. हे काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांना नको आहे, त्यातूनच ठाकरेंना लहान ठरवणे सुरू झाले आहे. भाजपला तेच हवे आहे.

हे सगळे सुरू होण्याआधी साधारणत: दोन महिने आधी इथेच लिहिले होते की, कोण लहान, कोण मोठा यावरून महाविकास आघाडीत वाद पेटेल. १५ आमदार अन् ५ खासदारांच्या शिवसेनेला मुख्यमंत्रिपद देण्याची वा लोकसभेच्या जागा देण्याची इतर दोघांची तयारी नसेल. तसेच घडत आहे. 

आपल्या ताकदीची कल्पना नसलेली शिवसेना गतवैभवाच्या आधारे अडून बसली आहे. ‘आम्ही तिन्ही भाऊ एकत्र राहतो, फक्त किचन वेगवेगळे आहे’ असे काही जण सांगतात; तिघांनी वेगवेगळे होणे हा त्यानंतरचा टप्पा असतो. महाविकास आघाडी सध्या किचन एक असण्याच्या टप्प्यात आहे. देशपातळीवर भाजपच्या विरोधात सगळे पक्ष एकवटत असताना महाराष्ट्रातील मविआचे नेते एकमेकांवर टीका करत सुटले आहेत. भाजपच्या विरोधातील वातावरणाचा एकत्रित फायदा मविआला महाराष्ट्रात घेता आला नाही, हे विश्लेषण समोर येईल तेव्हा उशीर झालेला असेल. 

भिन्न विचारांचे पक्ष भाजपच्या विरोधात एकवटून सत्तेत येऊ शकतात हे मॉडेल महाराष्ट्राने २०१९ मध्ये देशाला दिले. भाजपला सत्तेतून खाली खेचण्यासाठीचा शंखनाद महाराष्ट्रातून होऊ शकतो, हा विश्वास घेऊन देशभरातील दिग्गज नेते मुंबईत येऊन शरद पवार, उद्धव ठाकरेंना भेटत आहेत.   

नितीशकुमार, तेजस्वी यादव, अरविंद केजरीवाल, भगवंत मान हे तीन- तीन मुख्यमंत्री- उपमुख्यमंत्री येऊन गेले. आणखीही काही नेते येतील. एकीकडे महाराष्ट्राबद्दल हा विश्वास देशातील नेत्यांना वाटत असताना महाविकास आघाडीचे नेते मात्र एकमेकांना सान- थोर  ठरवत फिरत आहेत. 

हा विरोधाभास महाविकास आघाडीचे कार्यकर्ते, मतदारांना अस्वस्थ करणारा आहे. कर्नाटकच्या निकालानंतर काँग्रेसचा आत्मविश्वास खूपच वाढला आहे. ठाकरेंच्या नेतृत्वात निवडणुकीला सामोरे जाणे काँग्रेसला मान्य नसणार. राष्ट्रवादीही ते मान्य करणार नाही. त्यावर सामूहिक नेतृत्व हाच तोडगा असू शकेल. 

ती चर्चा भाजपच्या पथ्यावरलोकसभेची निवडणूक आणखी दहा महिन्यांनी आहे. विधानसभा निवडणुकीला तर आणखी १७ महिने आहेत. मग मविआतील जागावाटपाची चर्चा आतापासूनच कशासाठी? तीन पक्षांत कोणते मतदारसंघ कोणाला, हे आतापासूनच ठरले, तर ते महाविकास आघाडीसाठी धोक्याचे ठरू शकते. त्यामुळे कोणत्या मतदारसंघात कोणता पक्ष लढणार व कोणता उमेदवार असू शकेल, याचा नेमका अंदाज भाजपला ८-९ महिने आधीच येईल आणि आपला उमेदवार ठरविणे सोपे जाईल. मविआला तयारीसाठी जास्त अवधी मिळेल, हे खरे असले तरी आपल्या पक्षाला जागा न मिळालेले; पण इच्छुक असलेले नेते भाजपच्या गळाला लागू शकतील. जागावाटपाची बोलणी आताच करण्यामागे बाहेरच्या कुणाचा वा आतल्या कुणाचा चक्रव्यूव्ह तर नाही हेही तपासले पाहिजे.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेसBJPभाजपा