- सुधीर महाजन
मराठवाड्यात भाजपने शिवसेनेवर केलेली कुरघोडी हे गेल्या विधानसभा निवडणुकीचे फलित म्हणता येईल. सेनेची केवळ पीछेहाटच झाली नाही, तर बालेकिल्ला समजला जाणाºया औरंगाबादमधील एक जागा ‘एमआयएम’ने हिसकावून घेतली. ही ओहोटी सेनेला रोखता आली नाही आणि आता लोकसभेची औरंगाबादची जागा जिंकून एमआयएमने तर सेनेच्या अस्तित्वालाच आव्हान दिले आहे. चंद्रकांत खैरेंसारखा उमेदवार पराभूत होण्याची नामुष्की सेनेवर आली, यावरूनच सेनेच्या अवस्थेची कल्पना येते आणि आता या पार्श्वभूमीवर सेना निवडणुकीला सामोरी जात आहे. पाच वर्षांच्या राजकारणात भाजपने शिवसेनेची ठिकठिकाणी कोंडी केली.
या निवडणुकीसाठी अशोक चव्हाण, पंकजा मुंडे, धनंजय मुंडे, देशमुख, संभाजी पाटील निलंगेकर, या लढतींकडे सर्वांचे लक्ष असेल. अशोक चव्हाण लोकसभा निवडणुकीतील पराभवाचे उट्टे काढतात का याकडे लक्ष आहे, तर बीडमधील राजकारणाला भाऊबंदकीने ग्रासले आहे. तेथे पंकजा आणि धनंजय या बहीण-भावाच्या लढतीकडे साºया राज्याचे लक्ष असेल.
अशीच लढत बीडमध्ये जयदत्त क्षीरसागर आणि संदीप क्षीरसागर या काका-पुतण्यामध्ये अपेक्षित आहे. एमआयएम आणि वंचित आघाडी यांच्यामुळे एमआयएमला औरंगाबादेत सेनेचा पराभव करता आला; पण आता विधानसभेसाठी ही आघाडी तुटल्याने औरंगाबाद शहरातील राजकीय समीकरण बदलू शकते.
प्रचाराचे मुद्दे
1. दुष्काळ हा प्रमुख प्रचाराचा मुद्दा होऊ शकतो. पाच वर्षांपासून सततचा दुष्काळ हा मोठा प्रश्न आहे. त्या अनुषंगाने जगण्याचेच प्रश्न मोठे आहेत.
2. पीक विमा हा एक प्रश्न आहे. पीक विमा वाटपात घोटाळा झाला. मिळालेली मदत समन्याय पद्धतीने मिळाली नाही. प्रत्येक जिल्ह्यासाठी निकष बदलले. शिवाय सर्वांनाच विम्याचा लाभ मिळाला नाही.
3. पिण्याचे पाणी हा प्रचाराचा मुद्दा होऊ शकतो. अपुºया पावसामुळे एक जायकवाडी वगळता मराठवाड्यातील सर्व जलसाठे कोरडे आहेत. ऐन पावसाळ्यात टँकरने पाणी पुरवठा करावा लागतो आहे.
साधनसामुग्रीची समृद्धता आणि नियोजनावर हुकूम अंमलबजावणी हे भाजपत प्रकर्षाने जाणवते.
एकूण जागा 46
भाजप 18
शिवसेना 10
काँग्रेस01
राष्टÑवादी 08
एमआयएम 01